PM-Poshan Update - प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देणे बाबत संचालक आदेश

 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पात्र शाळेतील इ. ०१ ली ते ८ वी च्या विद्यार्थाना मध्यान्ह भोजन दिले जाते. योजनेस पात्र असणाऱ्या सर्व शाळांना आवश्यक तांदूळ भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) गोदामातून उचलून शाळा / केंद्रीय स्वयंपाकगृह स्तरावर वितरित करणे व नागरी भागातील स्वयंपाकगृह उपलब्ध असलेल्या शाळा आणि ग्रामीण भागातील शाळामध्ये धान्यादी मालाचा पुरवठा करणेसाठी सन २०२३ २४ या कालावधीकरीता पुरवठेदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संदर्भिय परिपत्रकानुसार सर्व जिल्ह्यांना माहे मार्च २०२३ व एप्रिल २०२३ करीता तांदूळ व धान्यादी मालाची मागणी संबंधित संस्थेकडे नोंदविण्यात येऊन योजनेची अंमलबजावणी अखंडितपणे सुरु ठेवण्याकरीता आवश्यक ते निर्देश देण्यात आलेले आहेत. तथापि माहे फेब्रुवारी, मार्च व एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये तांत्रिक कारणास्तव काही जिल्ह्यांतील विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले असण्याची शक्यता आहे. अशा विद्यार्थ्यांना अनुज्ञेय आहार खर्च रक्कम देण्याच्या दृष्टीने आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे.


१. माहे डिसेंबर २२ जानेवारी २३ कालावधीच्या पुरवठ्यातील शिल्लक तांदुळ व धान्यादी माल संपुष्टात आल्यानंतर पुढील पुरवठा होईपर्यंतच्या कालावधीमध्ये ज्या शाळेतील विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले असतील. अशा शाळांतील इ. १ ली ते ५ वी व इ. ६ वी ते ८ वी निहाय वंचित लाभार्थी संख्येची माहिती संकलित करावी.


२. उक्त कालावधीमध्ये लोकसहभागातून / इतर शाळांकडून उसणवारीवर तांदुळ व धान्यादी माल घेवून आहार शिजवून दिलेले दिवस वगळण्यात यावेत. ३. दिनांक १५/११/२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार इ. १ ली ते ५ वी व इ. ६ वी ते ८ वी निहाय संकलित केलेली लाभार्थी संख्या तात्काळ संचालनालयास कळवावी.


१४. आपल्या जिल्ह्यातील योजनेंतर्गत वंचित असलेल्या सर्व शाळांकडून सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्टातील विहित नमुन्यामध्ये संबंधित कालावधीतील योजनेच्या अंमलबजावणी बाबतची माहिती तात्काळ संकलित करण्यात येऊन हार्ड कॉपी व एमएस एक्सेल नमुन्यामध्ये संचालनालयास दिनांक ०५/०७/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंत सादर करावी.


सोबत माहितीचा विहित नमुना.


प्रत माहितीसाठी सविनय सादर :


१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई, २. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, पुणे..


(शरद गोसावी


शिक्षण संचालक (प्राथमिक)

वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadशैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.