पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाज/कर्तव्य-करावयाची कामे यादी शिक्षण संचालक तथा शासन आदेशानुसार

 पूर्वीची शालेय पोषण आहार योजना तथा आताची प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाजाबाबत शिक्षण संचालकांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


शालेय पोषण आहार योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. योजनेअंतर्गत इ. ०१ ली ते ०८ वी मधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात येत असतो. अन्न शिजवून विद्यार्थ्यांना वाटप करणे व त्याअनुषंगाने इतर कामकाज करणे करीता शाळास्तरावर स्वयंपाकी तथा मदतनीसांची शाळा व्यवस्थापन समितीमार्फत नियुक्ती करण्यात येते. तथापि स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे विविध संघटनांकडून शाळा प्रशासनाकडून इतर कामे (उदा. शाळा उघडणे व बंद करणे. स्वच्छतागृहांची सफाई, शालेय वर्ग खोल्यांची सफाई करणे इ.) त्यांचकडून करुन घेण्यात येत असलेबाबत निवेदने प्राप्त होत आहेत.


संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ९ मध्ये स्वयंपाकी तथा मदतनीसांच्या कामाचे स्वरूप विशद करण्यात आलेले आहे.


अ. अन्न शिजविण्याचे काम करणे.


ब. तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे


क. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे व जेवणाच्या जागेवर करणे


ड. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर साफसफाई करणे (स्वयंपाकगृहासह ) तसेच सांडलेल्या अन्नाची योग्य विल्हेवाट लावणे.


इ. भांड्यांची साफसफाई करणे व जेवल्यानंतर ताटांची स्वच्छता करणे.


ई. पिण्याचे पाणी भरणे व जेवताना विद्यार्थ्यांना पाणी पुरविणे,


उ. शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे.


ऊ. अन्न शिजविणा-या यंत्रणेच्या आहारविषयक नोंदी ठेवणे.


वरील प्रमाणे उल्लेखित केलेल्या कामव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरुपाची कामे स्वयंपाकी तथा मदतनीस यांचेकडून करुन घेण्यात येऊ नयेत, याबाबत आपल्या अधिनस्त योजनेस पात्र असणा-या सर्व शाळांना योग्य ते निर्देश निर्गमित करण्यात यावेत व भविष्यात अशा स्वरुपाच्या तक्रारी उद्भवणार नाहीत याची दक्षता घ्यावी.


(महेश पालकर)


शिक्षण संचालक (प्राथमिक)


महाराष्ट्र राज्य, पुणे

वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadशैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.