2022-23 संच मान्यतेमध्ये 0 मंजूर पदे आलेल्या शाळेवर करावयाच्या कार्यावाहीबाबत शिक्षण संचालक यांचे निर्देश

 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातून निर्गमित दिनांक 20 जून 2023 रोजीच्या परिपत्रकानुसार संच मान्यतेमध्ये मंजूर पदे शून्य असलेल्या शाळेवर करावयाच्या कार्यवाहीबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.


उपरोक्त विषयास अनुसरून असे निदर्शनात आलेले आहे की, काही शाळेच्या संच मान्यतेमध्ये गतवर्षी पदे मंजूर असताना पुढील वर्षामध्ये मात्र मंजूर पदे आलेले आहेत. यासाठी आपण सदर शाळेचे गतवर्षीचे व सध्याच्या वर्षाचे व्यवस्थापन प्रकार तपासून पहावे सदर व्यवस्थापन प्रकारामध्ये बदल झालेला आढळून आलेला असेल तर शिक्षणाधिकारी कार्यालयाने सदर शाळेचे व्यवस्थापन प्रकार बदल करत असताना त्याचबरोबर सदरील पदे त्या त्या व्यवस्थापन प्रकारात शिफट न केल्याने त्या शाळेच्या पुढील संच मान्यतेमध्ये मंजूर पदे ० आलेले असल्याचे निदर्शनात येत आहेत.


अशा प्रकारे २०२२-२३ मध्ये व्यवस्थापन प्रकार बदलेल्या शाळा परत व्यवस्थापन प्रकार बदल व पद शिफटसाठी Reprocess करुन शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करुन देण्याबाबतचे पत्र शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे देण्यात यावे व अशाच कारणसाठी ज्या शाळेचे व्यवस्थापन प्रकार व पदे शिफ्ट २०१७-१८ ते २०२१-२२ या कालावधीमध्ये करावयाची आहेत अशा शाळा व्यवस्थापन प्रकार बदल व पद शिफटसाठी उपसंचालक लॉगिनला उपलब्ध करुन देण्याबाबतचे पत्र शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून संचालक कार्यालयाकडे खालील दिलेल्या फॉरमेंट सह सादर करण्यात यावे. 



त्यासोबतच सदर शाळेचे व्यवस्थापनाची योग्य पुरावे सादर करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी कार्यालयाने सादर करावे असे निर्देश माननीय डॉ.वंदना वाहूळ शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिले आहेत.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.