प्रसन. २०२६-२७ मध्ये इ.३ री, ४ थी व ६ वी साठी सेतू अभ्यास अंमलबजावणीबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी दिनांक 10 जून 2026 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
जा.क्र. २८११५५९/अविवि/सेतू/२०२६/240' दिनांक- 10 JUN 2026
प्रति,
१. प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
२. शिक्षणाधिकारी, प्राथमिक / माध्यमिक (सर्व)
विषय- सन. २०२६-२७ मध्ये इ.३ री, ४ थी व ६ वी साठी सेतू अभ्यास अंमलबजावणीबाबत. तसेच इ. ६ वी प्रशिक्षण घटकसंच वितरणाबाबत.
संदर्भ-
१. शासन निर्णय क्रमांक-२०२५/प्रक्र. ९४/एस.डी.४ दि.१४/०७/२०२५
२. राज्यस्तरीय समन्वय समिती बैठक दि.०१/०६/२०२६.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंमलबजावणी अंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दि.१४/०७/२०२५ अन्वये सन २०२५-२६ पासून राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. सन. २०२६-२७ पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, सहावी वर्गासाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे.
नवीन अभ्यासक्रम प्रथमच लागू होणाऱ्या इयत्ता (३री, ४थी, ६वी) मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बदललेल्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी सुकर व्हावी म्हणून तसेच, नवीन अभ्यासक्रमात वाढलेली शैक्षणिक पातळी, भाषिक समज आणि स्व-अभ्यासाची सवय यांची जुळवणूक सहज व्हावी यासाठी २१ दिवसांचा सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये ३ री, ४ थी, ६ वी वर्गांसाठी सदर सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सेतू अभ्यासाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यातील शिक्षकांसाठी याद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत (सोबत संलग्न). सदर सूचना आपल्या अधिनस्त सर्व शाळांपर्यंत पोहोचवाव्यात. सेतू अभ्यास अंमलबजावणी सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सुव्यवस्थितपणे व वेळेत पूर्ण होईल यासाठी प्रभावी पर्यवेक्षण करावे. सेतू अभ्यास पुस्तिका राज्यातील सर्व शासकीय व खाजगी अनुदानित शाळांना प्रत्येकी एक प्रत याप्रमाणे उपलब्ध करून देण्यासाठी तालुका स्तरापर्यत पोहचविण्यात येत आहेत. त्यांचे वितरण शिक्षणाधिकारी यांनी आपल्या यंत्रणेमार्फत शाळांपर्यत
तात्काळ पूर्ण करावे. त्यासोबत इ. ६ वी चे शिक्षक प्रशिक्षण घटकसंच जिल्हा स्तरापर्यंत पोचविण्यात येत आहेत, ते आपल्या ताब्यात ठेवून जिल्हास्तर प्रशिक्षणावेळी त्याचा उपयोग करावा. तालुकानिहाय वितरण तपशील यासोबत देण्यात आलेला आहे.
सोबत - शिक्षकांसाठी सेतू अभ्यास मार्गदर्शक सूचना व तपशील.
(डॉ. हेमंत वसेकर भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रत,
गट शिक्षणाधिकारी, (सर्व)
३/- सेतू अभ्यास अंमलबजावणी सर्व शाळांमध्ये प्रभावी होईल यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणेस सूचना द्याव्यात.
सेतू अभ्यास २०२६-२७ शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना-
1) राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार निर्मित नवीन अभ्यासक्रमातील बदलामुळे जुन्या व नवीन संकल्पना, क्षमता, अध्यययन निष्पती यामध्ये योग्य सांगड घालण्यासाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आला आहे.
2) सेतू अभ्यास उपलब्धताः सदर सेतू अभ्यास परिषदेच्या www.maa.ac.in संकेतस्थळावर PDF स्वरुपात उपलब्ध करण्यात आला असून सर्वांसाठी खुला आहे, त्याचा शिक्षकांनी उपयोग करावा. सेतू अभ्यास पुस्तिकांची प्रत्येकी एक प्रत याप्रमाणे राज्यातील सर्व शासकीय व खाजगी अनुदानित शाळांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
साहित्य / पुस्तिका
माध्यम
१ सेतू अभ्यास (इ. तिसरी- सर्व विषय)
मराठी व उर्दू माध्यम
२ सेतू अभ्यास (इ. चौथी- सर्व विषय)
मराठी व उर्दू माध्यम
३ सेतू अभ्यास (इ. सहावी- भाषा)
मराठी व उर्दू माध्यम
४ सेतू अभ्यास (इ. सहावी- गणित व विज्ञान)
मराठी व उर्दू माध्यम
५ सेतू अभ्यास (इ. सहावी- सामाजिक शास्त्रे)
मराठी व उर्दू माध्यम
3) इंग्रजी माध्यमासाठी इंग्रजी भाषा २१ आणि मराठी भाषा R२ यांसाठी केवळ PDF स्वरुपात पुस्तिका स्वतंत्रपणे संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. अन्य माध्यमांनी मराठी माध्यमातील सेतू अभ्यास पुस्तिकेचा उपयोग करावा.
4) अंमलबजावणीः सेतू अभ्यासासाठी २१ दिवसांचा कालावधी विहित करण्यात आला असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७च्या सुरुवातीस म्हणजेच शाळा सुरु झाल्यापासून २१ दिवसांमध्ये हा सेतू अभ्यास संबंधित इयत्तांमधील विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घ्यावा.
5) अध्ययन निष्पत्तीवर भरः सेतू अभ्यासातील प्रत्येक कृतिपत्रिका सोडवून घेताना त्यातील क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती साध्य होत आहेत याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे. प्रत्येक कृतिपत्रिकेच्या सुरुवातीला पाठ्यक्रमातील घटकांशी संबंधित अभ्यासक्रम ध्येय, क्षमता विधाने व अध्ययन निष्पत्ती देण्यात आलेल्या आहेत.
6) संकल्पनांची समजः विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाची व्याप्ती या अभ्यासात अधोरेखित केलेली आहे. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार अध्यापन करावे. कृतिपत्रिकेतील केवळ उत्तरे लिहून न घेता विद्यार्थ्यांच्या ज्ञान, आकलन आणि कौशल्याचा विकास होईल अशा पद्धतीने संकल्पनांची मांडणी समजावून सांगावी.
7) शिक्षकांनी सुलभकाच्या भूमिकेत राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थी स्वतः कृती करतील यावर भर देणे अपेक्षित आहे. सेतू अभ्यास अंमलबजावणी वर्षारंभी वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
8) सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर इयत्तेच्या नियमित अभ्यासक्रमाच्या अध्यापनाला सुरुवात करावी.
(डॉ. हेमंत वसेकर भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्याची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. यासठी मागील दोन वर्षात ऑनलाईन स्वरुपात सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळालेले आहेत. त्यामुळे या वर्षीही सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३ - २४ मध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी सेतू अभ्यास छापील स्वरुपात देण्यात येत आहे. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय शाळा याचा समावेश असणार आहे. अन्य शाळा व्यवस्थापनासाठी सेतू अभ्यास परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार त्याचा वापर शाळा/ संस्था करू शकतात. सेतू अभ्यास (२०२३-२४) स्वरूप :-
१. सदर सेतू अभ्यास हा २० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर सेतू अभ्यास मराठी आणि उर्दू माध्यमासाठी तयार करून छापील स्वरुपात देण्यात आलेला आहे.
3. इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी प्रथम भाषा, गणित, आणि इंग्रजी तर इयत्ता सहावी ते दहावीसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.
३. सदर सेतू अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहे.
४. सदर सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यास पुस्तिकेच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.
५. सदर सेतू अभ्यासातील कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता काही विषयांनी ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.
६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षकांनी सदर सेतू अभ्यास विद्यार्थ्याकडून सोडवून घेणे आवश्यक आहे.
7. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त संतु अभ्यासाची पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. २७ जून २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच उत्तर चाचणी दि. २४ जुलै २०२३ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. सेतू अभ्यास (२०२३-२४) अंमलबजावणी कालावधी .
सेतू अभ्यासाची अंमलबजावणी :-
1) दिवसांचा सेतू अभ्यास उत्तर चाचणी सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.
२. सदर सेतू अभ्यास मराठी व उर्दू व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात.
३. मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या २० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात याची.
४. सदर कृतिपत्रिका (worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात.
५. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे. काही विषयातील अधिक माहिती घेऊ या मधील प्रश्न विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.
६. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात. पूर्व व उत्तर चाचणी गुणांचा तुलनात्मक तक्ता तयार करून शिक्षकांनी आपल्या स्तरावर ठेवावा.
७. सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करावी.
उपरोक्त प्रमाणे सदर सेतू अभ्यासाबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्वाना अवगत करावे. सदर सेतू अभ्यासाची प्रभावी। अंमलबजावणी होण्यासाठी योग्य ती सर्व कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. सेतू अभ्यासाची अमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर शाळा भेटींच्या आधारे जिल्हानिहाय सेतू अभ्यास २०२३- २४ अहवाल शिक्षणाधिकारी व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयाने अंमलबजावणी झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत प्रस्तुत कार्यालयास ईमेलद्वारे विनाविलंब सादर करावा.
(कौस्तुभ दिवेगावकर, भा.प्र.से.)
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ३०.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.





0 Comments