"शाळा प्रवेशोत्सव" हा उपक्रम राबविणे बाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांचे निर्देश २०/०५/२०२६

शाळा प्रवेशोत्सव" हा उपक्रम राबविणेबाबत शिक्षण संचालक प्राथमिक तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 20 मे 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे. 


क्र. प्रशिसं/८०२/शाळा प्रवेशोत्सव /२०२६/

दिनांक- १९/०५/२०२६

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना), जिल्हा परिषद (सर्व)

३. शिक्षण निरीक्षक (उत्तर, दक्षिण, पश्चिम)

४. प्रशासन अधिकारी / शिक्षण प्रमुख/शिक्षणाधिकारी, मनपा/नपा/नप (सर्व)

विषय:- "शाळा प्रवेशोत्सव" हा उपक्रम राबविणेबाबत

संदर्भ :- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-११२५/प्र.क्र. २५२/एसएम -१, दिनांक-१२/०३/२०२५

२) या कार्यालयाचे पत्र क्र १२५००५७ दिनांक १५.०५.२०२५

३) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पट वाढविण्यासाठी उपाययोजना समितीचा अहवाल दिनांक २५/०३/२०२६

उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्र १ शासन निर्णय दिनांक १२/०३/२०२५ नुसार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शाळेत मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी शासनाने निर्देश दिलेले आहेत. तसेच संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत, शाळा भेटी, दत्तक शाळा, पटनोंदणी याबाबत विस्तृत सूचना दिलेल्या होत्या.

शासन आदेशानुसार सन २०२५-२६ मध्ये "शाळा प्रवेशोत्सव" या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले. सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा भेट करून नवागत विदयाथ्यांचे स्वागत केले. शालेय उपक्रम व शासनाच्या विविध योजना यांचा प्रचार प्रसार केला. यामुळे सन २०२५-२६ मध्ये मागील वर्षीच्या तुलनेने पटसंख्येतील घट कमी झाली. UINSE नुसार २०२५-२६ मध्ये ६ जिल्हयांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत इ.१ ली चा पट वाढला आहे. UDISE + नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली च्या पटसंख्येची स्थिती खालीलप्रमाणे आहे.


गतवर्षी शासनाने राबविलेल्या शाळा प्रवेशामुळे वाढलेला विद्यार्थी पट विचारात घेता सन २०२६-२७ मध्ये शैक्षणिक वर्ष सुरु होतांना करावयाच्या शाळा भेटी, विद्यार्थ्यांचे स्वागत, दत्तक शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या पटामध्ये लक्षणीय वाढ करण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना या अनुषंगाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.

शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत :-

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दिनांक १५/०६/२०२६ पासून सुरु होणार आहेत. यानुसार शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास विभाग), मा. उपमुख्यमंत्री (राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास), सर्व मा. मंत्री व राज्यमंत्री, मा. खासदार, मा. आमदार, लोकप्रतिनिधी तसेच सर्व सनदी अधिकारी यांनी त्यांच्या मतदार संघातील किंवा नजीकच्या किमान एकेक शाळेमध्ये भेट देऊन सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करणेकरीता मा. आयुक्त (मनपा), मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे नियोजन करावे. यात नमूद मान्यवर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना एक संपर्क अधिकारी नेमून द्यावा. तसेच ते कोणत्या शाळेला / शाळांना भेटी देणार आहेत याबाबत पूर्व नियोजन करून आवश्यक पूर्व तयारी करावी. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद व प्रशासन अधिकारी, मनपा यांनी पुढील नमुन्यात अहवाल राज्यस्तरावर सादर करावा.


दत्तक शाळा :-

उपरोक्त नमूद शाळा सदर अधिकाऱ्यांना वर्षभरासाठी दत्तक शाळा म्हणून देण्यात येत आहेत. संबंधित अधिकारी यांनी या शाळांना वर्षभरात वेळोवेळी भेटी देऊन विद्यार्थी गुणवत्ता व शाळेच्या भौतिक सुविधा यांचा आढावा घ्यावा तसेच मार्गदर्शन करावे.

शिक्षण विभागातील अधिकारी [प्राचार्य, DIET, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक, योजना), ज्येष्ठ अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, अधीक्षक, विस्तार अधिकारी (शिक्षण)] यांना उपरोक्त नमूद शाळे व्यतिरिक्त अजून प्रत्येकी १ शाळा दत्तक म्हणून द्यावी. याबाबत पुढील नमुन्यात माहिती या कार्यालयाकडे सादर करावी.

पट नोंदणी / पटसंख्या वाढविण्यासाठी उपाययोजना :-

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत बालकांना मोफत सक्तीचे गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी राज्य शासन व स्थानिक प्राधिकरण यांची आहे. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम व योजनांची अंमलबजावणी केली जाते याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाच्या स्तरावरुन शाळाप्रवेशोत्सव सन २०२५-२६ हा उपक्रम राबविण्यात आला होता. शाळा प्रवेशोत्सव

उपक्रमाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी उपाययोजनाबाबत अहवाल सादर करण्यासाठी राज्यस्तर समितीची स्थापना करण्यात आली होती. या राज्य समितीने त्यांचा अहवाल शासनास दिनांक २५.०३.२०२६ रोजी सादर केला असून यामध्ये प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या पटसंख्या वाढविण्यासाठी मार्च ते जून कृती कार्यक्रम व शाळा सुरु झाल्यापासून वर्षभरासाठी राबविण्याचे उपक्रम / कृती कार्यक्रम नमूद केलेले आहे. याबाबत मा आयुक्त (शिक्षण) यांनी मा. आयुक्त (म.न.पा.) व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना अर्धशासकीय पत्राद्वारे सदर अहवालाच्या अनुषंगाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी आवश्यक उपक्रमांची अंमलबजावणी करणेबाबत कळविले आहे.

१०० टक्के विद्यार्थ्यांची पट नोंदणी व्हावी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इयत्ता १ ली च्या पटात लक्षणीय वाढ होण्याच्या दृष्टीने पुढील प्रमाणे उपाय योजना कराव्यात.

शाळेच्या परिसरातील अंगणवाडी व बालवाडी यांना शिक्षकांनी भेट देऊन त्यातील इयत्ता १ ली मध्ये दाखल पात्र विद्यार्थी यादी घ्यावी. शिक्षकांनी अंगणवाडी ताई व पालक यांना भेटून १००% विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद/ नगरपालिका/ महानगरपालिका शाळेत दाखल व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत.

जिल्हा परिषद/ नगरपालिका/ महानगरपालिका शाळांमधील सोयी, सुविधा, शिष्यवृत्ती, विविध उपक्रम याबाबत पालकांना माहिती द्यावी. समाज माध्यमात प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा परिषद / नगरपालिका/महानगरपालिका शाळेत दाखल होतील यासाठी प्रयत्न करावा.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही शाळा/शिक्षक यांनी इयत्ता १ ली मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी दाखल व्हावेत यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतीने जाहिरात करून समाज माध्यमावर प्रसिद्धी दिली आहे. यामध्ये शाळेचे यश, सोयी सुविधा, राबविले जाणारे विविध उपक्रम, विद्यार्थी सहभाग व यश याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली आहे. याच धर्तीवर सर्व शाळांनी प्रचार प्रसिद्धी करावी. यासाठी आवश्यक मार्गदर्शन करावे व त्याबाबत सूचना द्याव्यात.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवेशित व्हावेत यासाठी शाळा भेटीच्या वेळेस मा. लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांनी शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत सदस्य, सरपंच, नागरिक यांचेशी चर्चा करावी.

मा. आयुक्त (मनपा), मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत विशेष लक्ष देऊन आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद/ नगरपालिका/ महानगरपालिका शाळांमध्ये इयत्ता १ ली च्या पटात लक्षणीय वाढ व्हावी यासाठी उपरोक्त नमूद केले प्रमाणे उपक्रम सर्व शाळांमध्ये होतील यापद्धतीने नियोजन करावे. याव्यतिरिक्त इतर नाविन्यपूर्ण उपक्रमही घेता येईल यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रशासन अधिकारी यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. आयुक्त मनपा यांचे मार्गदर्शनानुसार कार्यवाही करावी.

शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.

शाळा सुरू होण्यापूर्वी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास विभाग), मा. उपमुख्यमंत्री (राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास), सर्व मा. मंत्री व राज्यमंत्री, मा. खासदार, मा. आमदार, लोकप्रतिनिधी तसेच सर्व सनदी अधिकारी यांच्या शाळा भेटी बाबत वर्तमानपत्रात प्रसिद्धी द्यावी. तसेच शाळा सुरु होण्याचा स्थानिक स्तरावर प्रचार प्रसार करावा.

सदर कार्यक्रमांतर्गत मा. लोकप्रतिनिधी व अधिकारी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा भेट करतील मा. लोकप्रतिनिधी यांना संपर्क अधिकारी निश्चित करून द्यावेत शाळा भेटीचे नियोजन करावे.

शाळा सुरु होणार असल्याबत ग्रामीण भागात दवंडी काढून सर्वांना कळविण्यात यावे. तसेच पालकांचे what's app ग्रुप व शालेय नोटीस बोर्ड यावर कळवावे.

४. शाळा सुरु होण्यापूर्वी शाळा व शालेय परिसराची स्वच्छता करावी.

५. शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी पालकांना बोलवावे, अंगणवाडी सेविका/ताई यांना बोलवावे.

६. शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढावी/आयोजन करावे.

७. नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे.

८. "पहिले पाउल" या संकल्पने अतर्गत इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा कागदावर घ्यावा. त्याची प्रत पालकांना द्यावी.

९. सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात यावे.

१०, शैक्षणिक गुणवत्ता विषयक उपक्रमाचा/नियोजनाचा आढावा घ्यावा.

११. निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा.

१२. शालेय भौतिक सुविधांचा आढावा घ्यावा. आवश्यकतेनुसार उपाययोजनांसाठी मार्गदर्शन करावे.

१३. शालेय स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी याबाबत आढावा घ्यावा.

१४. शालेय क्रीडा साहित्य, खेळाच्या सुविधा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, विविध स्पर्धा परीक्षा इत्यादी बाबींचा आढावा घ्यावा व मार्गदर्शन करावे.

१५. सर्व विद्यार्थ्यांकरीता शाळेचा पहिला दिवस हा उत्सवाप्रमाणे साजरा करून शाळेमध्ये तिथी भोजन आयोजन करावे.

तरी याबाबत, आपल्या जिल्ह्यामध्ये शाळा प्रवेशोत्सव" या उपक्रमाअंतर्गत आवश्यक कार्यवाही करून शाळांना भेटी दिल्याबाबतचा अहवाल शिक्षण संचालनालयास सादर करावा.


Digitally signed by

PALKAR MAHESH MADHUKAR Date: 20-05-2026 13:27:31

 (डॉ महेश पालकर)

शिक्षण संचालक (माध्य व उच्च माध्य) महाराष्ट्र राज्य, पुणे

Digitally signed by SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 20-05-2026 12:28:45

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


 प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयातून दिनांक 13 जून 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करणेबाबत  प्राथमिक शिक्षण संचालकांनी १) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग) २) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) सर्व जिल्हे ३) प्रशासन अधिकारी, महानगरपालिका/नगरपालिका - सर्व ४) शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम) यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दिनांक-१५/०६/२०२४ व विदर्भातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दिनांक ०१/०७/२०२४ रोजी प्रारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सत्र २०२४-२५ मध्ये इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाच्या प्रसंगी स्वागत करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने पुढील प्रमाणे आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी.

१. शाळेच्या परिसरातील (वयोगट ६ ते १४ वर्ष) वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश झाले असल्याची खात्री करण्यात यावी.

२. शाळाबाह्य झालेली किंवा असलेल्या बालकांचा शोध शाळापूर्व तयारीच्या कालावधी मध्ये करण्यात यावा.

निदर्शनास आल्यास अशा बालकांना शाळेत प्रवेश देण्यात यावेत. ३. नजीकच्या परिसरातील दगडखाणी, वीटभट्टी, बांधकामाचे स्थळ, उद्याने बाजारपेठा, पदपथ, सिग्नल, कुटीर उद्योग, कामगार वस्त्या या सारख्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात यावे,

४. शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आपण व आपल्या अधिनस्त प्रत्येक अधिकाऱ्यांनी व्यक्तिशः किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे/शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्बोधन/प्रबोधन करावे. ५. विद्यार्थ्यांचे स्वागत फुल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य, स्थानिक स्रोत मध्ये उपलब्ध उपयोगी सामुग्री देऊन करण्यात यावे.

६. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, सदस्य, पालक व शिक्षक यांचेशी विचार विमर्श करून अध्ययन निष्पत्ती साठी उपाय योजना, सेतू अभ्यासक्रम, इतर विविध शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उद्बोधन व सहकार्य करावे.

७. शाळा प्रवेशोत्सावाच्या कार्यक्रमाची स्थानिक पातळीवरील प्रसार माध्यमाद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी. ८. शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थ्यांचे, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्त इत्यादी यांचे सहकार्य घेण्यात यावे.

९. शाळा सुरु होण्याच्या दिवशी शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून प्रभातफेरी आयोजन, विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत, मोफत पुस्तक वितरण, मोफत गणवेश इत्यादी कार्यक्रम आयोजित करावेत. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था (युवक मंडळे, क्रीडा मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ) यांचे सहकार्य घ्यावे.

१०. दिनांक १५ जून, २०२४ रोजी राज्यात शाळा प्रारंभ होत आहेत. हा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्यात शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करावा.

११. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमधून या दिवशी मिष्ठान भोजन द्यावे.


(नंदकुमार बेडसे)

प्र. शिक्षण संचालक (प्राथमिक)

महाराष्ट्र राज्य, पुणे-०१


प्रत माहितीस्तव सविनय सादर मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, पुणे, महाराष्ट्र राज्य.



वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.