इयत्ता इ.२री, ३री, ४थी, ६वी शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करणेबाबत. (इ.६वी प्रशिक्षण नियोजन व राज्यस्तर ToT साठी जिल्हास्तर सुलभकांची नावे कळविणेबाबत) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 10 जून 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहे.
जा.क्र. E:२७६४८०३/अविवि/SE/२०२६/दिनांक- स्वाक्षरीखाली नमूद
प्रति,
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था. (सर्व)
विषयः इयत्ता इ.२री, ३री, ४थी, ६वी शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करणेबाबत. (इ.६वी प्रशिक्षण नियोजन व राज्यस्तर ToT साठी जिल्हास्तर सुलभकांची नावे कळविणेबाबत)
संदर्भः १. या कार्यालयाकडील पत्र जा.क्र. E:२७६४८०३/अविवि/SE/२०२६/दिनांक ०७/०५/२०२६
२. या कार्यालयाकडील पत्र जा.क्र. E:२७६४८०३/अविवि/SE/२०२६/दिनांक- २०/०४/२०२६
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, शासन निर्णय दि.१४/०७/२०२५ अन्वये सन २०२५-२६ पासून राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्याने करण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील इ.२री, ३री, ४थी, ६वी वर्गाना शिकविणाऱ्या शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यानुसार इ.२ री, ३ री, ४ थी साठीचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झालेले असून इ. ६ वी साठीचे बाकी आहे. राज्यात सुरु असलेल्या जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर पूर्वनियाजित जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षणे संदर्भ क्र.१ येथील पत्रान्वये पुढे ढकलण्यात आली होती.
शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण नियोजन करण्यात आलेले आहे. इ.६वी शिक्षक प्रशिक्षणाचा राज्यस्तर टप्पा आयोजनाबाबत करावयाची कार्यवाही याद्वारे कळविण्यात येत आहे.
A. प्रशिक्षणाचे माध्यम व प्रशिक्षण स्तर-
प्रस्तुत शिक्षक प्रशिक्षण मराठी, उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येईल. अन्य माध्यमांना मराठी माध्यमांसोबत सामावून घेतले जाईल. उर्दू माध्यमासाठी राज्यस्तर व जिल्हा स्तर असे दोनच स्तर असतील तर मराठीसोबत अन्य माध्यमांसाठी प्रशिक्षण राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर अशा क्रमाने आयोजित करण्यात यावे.
B. प्रशिक्षण कालावधी व वेळापत्रक-
प्रत्येक वर्गात अपेक्षित विषयांच्या निर्धारित तासिका पूर्ण होण्यासाठी इ.६वी साठी ०४ दिवसांचा प्रशिक्षण कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. उर्वरित प्रशिक्षण नियोजन पुढीलप्रमाणे असेल.
C. प्रशिक्षण घटकसंच व वाचन साहित्यः
प्रशिक्षक / सुलभक यांचेसाठी मराठी माध्यमाचे प्रशिक्षण घटकसंच जिल्हा स्तरापर्यंत (जिल्हा मुख्यालयाच्या तालुका वाहतूकीसोबत) वितरित करण्यात येतील. उर्दू माध्यमाचे घटकसंच राज्यस्तर ToT वेळी वितरित करण्यात येतील. वाचन साहित्य म्हणून पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ (भाग-१ व भाग-२) यांच्या प्रती सन २०२५-२६ मध्ये शाळांना पुरविण्यात आलेल्या आहेत. शालेय शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम इयत्ता तिसरी, चौथी तसेच सहावी प्रत्येक शाळेसाठी एक संच तालुका स्तरापर्यंत पोच करण्यात येत आहे. त्याचे वितरण शाळा स्तरापर्यंत होईल याची दक्षता घ्यावी व प्रशिक्षणास येताना त्याची प्रत सोबत आणणेबाबत प्रशिक्षणार्थी यांना कळवावे. मराठी माध्यमातील अभ्यासक्रमाची प्रत सर्व माध्यमाच्या शाळांना पुरविण्यात येईल. अभ्यासक्रमाचा एक संच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्तरावर ठेवण्यासाठी जिल्हा मुख्यालयाच्या तालुका वाहतूकीसोबत पाठविण्यात येईल.
D. प्रशिक्षणार्थी व सुलभक-
जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनाची जबाबदारी संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था DIET यांची राहील. माध्यमनिहाय प्रशिक्षणार्थी संख्या व तपशीलवार नियोजन सोबत जोडलेले आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांच्या एकूण संख्येनुसार ६० प्रशिक्षणार्थ्यांचा एक वर्ग याप्रमाणे आवश्यक बॅचेस तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार प्रशिक्षण स्थळ व तज्ज्ञांची निवड करावी व अन्य पूर्वतयारी करावी.
उर्दू माध्यमांसाठी तालुकास्तरावर वर्गासाठी पुरेशी संख्या होऊ शकत नसल्याने त्यांचेसाठी राज्यस्तर व जिल्हास्तर असे दोनच टप्पे असतील. संख्येनुसार वर्ग पूर्ण होण्यासाठी काही ठिकाणी एकापेक्षा अधिक जिल्ह्याचे प्रशिक्षण नियोजन एकत्र दिलेले आहे. सदर प्रशिक्षण ज्या जिल्ह्यात असेल त्या DIET मार्फत सदर प्रशिक्षणाचे आयोजन होईल.
प्रशिक्षणार्थी संख्या, उपलब्ध सुलभक संख्या यांनुसार एकापेक्षा जास्त टपप्यांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करुन घ्यावे. शिक्षकांना जनगणना, मतदार नोंदणी इत्यादी राष्ट्रीय कामकाज सोपविलेले असल्यास त्याचा विचार करुन प्रशिक्षणाचे एक अथवा अधिक टप्प्यांमध्ये नियोजन करावे. तथापि दिलेल्या कालमर्यादेत सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
E. पर्यवेक्षण व समन्वय-
राज्यस्तर तज्ज्ञांचा जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षणासाठी आवश्यकतेनुसार उपयोग करुन घेता येईल. विभागातील प्रशिक्षण परिणामकारक व नियोजनानुसार होत असलेबाबत क्षेत्रीय विद्या प्राधिकरण (RAA) व DIET यांनी समन्वय साधावा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी सर्व सहभागी प्रशिक्षणासाठी वेळेत उपस्थित राहतील याबाबत आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात.
राज्यातील शासकीय व खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षक प्रशिक्षणासाठी निधीची उपलब्धता झाल्यानंतर आपणास कळविण्यात येईल. खाजगी विना अनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांतील शिक्षकांसाठी सदर प्रशिक्षण स्वतंत्रपणे आयोजित करता येईल त्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद उपलब्ध असणार नाही.
प्रशिक्षणासाठी प्रशासकीय व आर्थिक तरतूदीबाबत सूचना यथावकाश निर्गमित करण्यात यतील. त्याचप्रमाणे इ.६वी प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
F. राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण TOT नियोजन
इयत्ता सहावी नवीन अभ्यासक्रम राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (ToT) साठी अपेक्षित संख्या.
प्रशिक्षण
प्रशिक्षणार्थी
राज्यस्तर ToT मराठी माध्यम
२४४
राज्यस्तर ToT उर्दू माध्यम
२४०
राज्यस्तरावरील ToT प्रशिक्षणासाठी जिल्ह्याच्या गरजेनुसार इ.६वी साठी प्रतिवर्ग ४ या प्रमाणात सुलभकांची संख्या निश्चित करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार दिलेल्या संख्येच्या मर्यादेत जिल्हास्तर ToT साठी सुलभक यांची निवड आपले स्तरावरुन करण्यात यावी व त्यांची नावे राज्यस्तर TOT साठी या कार्यालयास कळविण्यात यावीत.
राज्यस्तर (ToT) प्रशिक्षकांचे प्रशिक्षणासाठी आपल्या जिल्ह्यासाठी निर्धारित संख्येनुसार राज्यस्तर प्रशिक्षणार्थी (जिल्हास्तर सुलभक) यांची निवड करताना त्यामध्ये, उत्तम प्रशिक्षक कौशल्ये असणारे, अभ्यासक्रम निर्मितीमध्ये सहभागी सदस्य, अनुभवी व्याख्याता, पर्यवेक्षकीय अधिकारी, शिक्षक, अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्य, इ. तज्ज्ञांचा समावेश करावा. राज्यस्तरासाठी निवड करण्यात येणारे प्रशिक्षणार्थी हे जिल्हास्तर (ToT) साठी प्रशिक्षक म्हणून कामकाज करण्यासाठी सक्षम असावेत. ही निवड करताना सर्व विषयांचे तज्ज्ञ समाविष्ट होतील याची दक्षता घ्यावी. तसेच प्रत्येक इयत्तेसाठी DIET मधील किमान एक तज्ज्ञ समन्वयक म्हणून निवड करणे अनिवार्य असेल.
राज्यस्तर ToT मराठी व उर्दू माध्यम जिल्हानिहाय अपेक्षित संख्या तपशील सोबत लिंक मध्ये संलग्न आहे. त्यानुसार सदर प्रशिक्षणासाठी तज्ज्ञांची निवड करुन त्यांना पहिल्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत प्रशिक्षण स्थळी उपस्थित राहणेसाठी कार्यमुक्त करणेबाबत आपले स्तरावरून संबंधितांना आदेशित करावे व ते उपस्थित राहतील याची खात्री करावी.
सदर प्रशिक्षणासाठी उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना नियमानुसार प्रवास भत्ता अदा करण्यात येईल. त्यासाठी संबंधितांना स्वतःचा UID, PAN, बँक खाते तपशील सोबत घेऊन येणेबाबत कळवावे.
G. अन्य सूचना-
प्रत्येक वर्गाच्या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यात कार्यरत विशेष शिक्षक तसेच साधन व्यक्ती यांचाही समावेश करावा. त्यांना नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण दिले जाईल याची दक्षता घ्यावी.
प्रशिक्षणाबाबत या कार्यालयाचे पत्र दि.२०/०४/२०२६ अन्वये देण्यात आलेल्या सूचना कायम राहतील. त्यामधील इ.३री-४थी साठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना इ.६वी साठी विचारात घ्याव्यात.
इ.६वी राज्यस्तर प्रशिक्षकांचे (ToT) प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी यांचा तपशील परिषदेस वरील इमेल पत्त्यावर स्वाक्षरीत आदेश आणि ती नावे यासोबतच्या Speadsheet लिंक मध्ये दिनांक. १५ जून २०२६ पर्यंत अचूक देण्यात यावीत. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याच्या निर्धारित संख्येनुसारच प्रशिक्षणार्थी राज्यस्तरीय प्रशिक्षणास उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी.
Digitally signed by Kamaladevi Shridhar Awate Date: 10-06-2026 15:34:58
(डॉ. कमलादेवी आवटे)
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
Spreadsheet for State ToT info.
Spreadsheet Link-
https://docs.google.com/spreadsheets/d/1x2LeK8Yu5-lIwAYGREkCEPkwq7aRH8Oi5QE0Sq_ES8E/edit?usp=sharing
वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी Download वर क्लिक करा
नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता २री, ३री-४थी शिक्षकांसाठी पूर्वनियोजित प्रशिक्षण तारखांमध्ये बदल करणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य संचालकांनी दिनांक 7 मे 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
जा.क्र. E:२७६४८०३/अविवि/SE/२०२६/
दिनांक- ०७/०५/२०२६
प्रति,
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था. (सर्व)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व
विषयः नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता २री, ३री-४थी शिक्षकांसाठी पूर्वनियोजित प्रशिक्षण तारखांमध्ये बदल करणेबाबत.
संदर्भ:
१. या कार्यालयाकडील पत्रे क्र. E:२७६४८०३//दि.०९/०४/२०२६, दि.२०/०४/२०२६ व दि.३०/०४/२०२६ २.मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि मा. मुख्य जनगणना अधिकारी, महाराष्ट्र यांचेकडील मुंबई येथील बैठक दि.०५/०५/२०२६ मधील निर्देश.
राज्यातील इ.२री, ३री, ४थी वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी सन. २०२६-२७ मध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणाचे आयोजन करण्याबाबत सूचना व राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणांचे वेळापत्रक संदर्भ क्र. १ येथील पत्रांन्वये निर्गमित करण्यात आले आहे.
राज्यात सुरु असलेले जनगणना २०२७ तसेच मतदार यादी पुनरीक्षण कामकाज करण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर,
१. राज्यस्तरीय प्रशिक्षण दि.०८ ते ११ मे, २०२६ या कालावधीत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, कोकमठाण, ता. कोपरगाव, जिल्हा. अहिल्यानगर या ठिकाणी होणार आहे.
२. जिल्हास्तरीय प्रशिक्षणांच्या तारखांबाबत पुनर्विचार करण्यात येत असून याबाबत लवकरच कळविण्यात येईल.
३. तालुकास्तरीय प्रशिक्षण उपरोक्त पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात येत असून त्याबाबत स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.
डॉ. हेमंत वसेकर (भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
प्रत, माहितीस्तव सादर
मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
मा. मुख्य जनगणना अधिकारी तथा संचालक, जनगणना कार्य संचालनालय, महाराष्ट्र, मुंबई.
मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
जा.क्र. E:२७६४८०३/अविवि/SE/२०२६/
दिनांक- ३०/०४/२०२६
प्रति,
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था. (सर्व)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व
विषयः इयत्ता २ री, ३ री-४ थी शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजन कालावधी सुधारित करणेबाबत सूचना.
संदर्भ: या कार्यालयाकडील पत्रे क्र. E:२७६४८०३/अविवि/SE/२०२६/दि.०९/०४/२०२६ व दि.२०/०४/२०२६
सन २०२६-२७ मध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार राज्यातील इ.२ री. ३ री, ४ थी वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावयाचे आहे. त्याबाबत सूचना संदर्भीय पत्रान्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
राज्यस्तर प्रशिक्षण आयोजनासाठी प्रशिक्षणार्थी यांचे जनगणना प्रशिक्षण तसेच स्थळ निश्चिती या कारणास्तव यापूर्वी देण्यात आलेल्या प्रशिक्षण तारखांमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. त्यानुसार कार्यवाही करावी.
माध्यम
प्रशिक्षण स्तर
इ.२ री नियोजित कालावधी
इ.३ री-४ थी नियोजित कालावधी
मराठी व उर्दू
राज्यस्तर TOT
८ ते १० मे २०२६
०८ ते ११ मे २०२६
मराठी
जिल्हास्तर TOT
१८ मे ते २० मे २०२६
१८ मे ते २१ मे २०२६
मराठी व अन्य
तालुकास्तर प्रशिक्षण
२५ मे ते १२ जून (३दिवस)
२५ मे ते १२ जून (४दिवस)
उर्दू
जिल्हास्तर प्रशिक्षण
१८ मे ते १२ जून (३दिवस)
१८ मे ते १२ जून (४दिवस)
प्रशिक्षण आयोजन व संनियंत्रण वावत संदर्भीय पत्रान्वये देण्यात आलेल्या अन्य सूचना कायम राहतील.
राज्यस्तर ToT :- दि.०८ ते ११ मे २०२६
स्थळ- आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, शिर्डी-कोपरगाव रोड, कोकमठाण,
ता. कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर, ४२३६०१.
वेळ- स. १० वा ते सायं. ०६ वा.
Digitally signed by
Hemant Sharachchandra Vasekar
Date: 01-05-2026 11:04:00
(डॉ. हेमंत वसेकर)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
प्रत, माहितीस्तव सादर
मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
इयत्ता २ री, ३ री, ४ थी शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करणेबाबत. (STATE TOT/ राज्यस्तर TOT साठी जिल्हास्तर सुलभकांची नावे कळविणेबाबत) राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
जा.क्र. ६:२७६४८०३/अविवि/SE/२०२६/
दिनांक- ०९/०४/२०२६
प्रति,
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सवं)
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था. (सर्व)
विषयः इयत्ता २ री, ३ री, ४ थी शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करणेबाबत. (STATE TOT/ राज्यस्तर TOT साठी जिल्हास्तर सुलभकांची नावे कळविणेबाबत)
संदर्भ: शासन निर्णय क्रमांक-२०२५/प्रक्र.९४/एस.डी.४ दि.१४/०७/२०२५
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, संदर्भाधिन शासन निर्णयान्वये सन २०२५-२६ पासून राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्याने करण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील इ. २ री, ३ री, ४ थी वर्गाना शिकविणाऱ्या शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे.
शैक्षणिक वर्ष दि. १५ जून २०२६ पासून सुरु होणार असलेमुळे त्यापुर्वी नवीन अभ्यासक्रम लागू होणाऱ्या वर्गाच्या शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होणे आवश्यक आहे. इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी च्या सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण नियोजन पुढीलप्रमाणे करण्यात आलेले आहे.
A. प्रशिक्षणाचे माध्यम व प्रशिक्षण स्तर-
प्रस्तुत शिक्षक प्रशिक्षण मराठी, उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येईल. अन्य माध्यमांना मराठी माध्यमांसोबत सामावून घेतले जाईल. उर्दू माध्यमासाठी राज्यस्तर व जिल्हा स्तर असे दोनच स्तर असतील तर मराठीसोबत अन्य माध्यमांसाठी प्रशिक्षण राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर अशा क्रमाने आयोजित करण्यात यावे.
B. प्रशिक्षण कालावधी व वेळापत्रक-
प्रत्येक वर्गात अपेक्षित विषयांच्या निर्धारित तासिका पूर्ण होण्यासाठी दुसरीसाठी ०३ दिवसांचा आणि तिसरी व चौथीसाठी ०४ दिवसांचा प्रशिक्षण कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.
क्र इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथी प्रशिक्षण स्तर
माध्यम
नियोजित कालावधी
राज्यस्तर ToT
मराठी व अन्य
४ ते ७ मे २०२६
जिल्हास्तर TOT
मराठी व अन्य
११ ते १४ मे २०२६
तालुकास्तर प्रशिक्षण
मराठी व अन्य
१८ ते ३० मे २०२६
उर्दू
२. राज्यस्तर ToT
४ ते ७ मे २०२६
४ जिल्हास्तर प्रशिक्षण
११ ते ३० मे २०२६
इ. २ री साठी एक दिवसाचा कालावधी कमी असला तरी वरीलपैकी TOT प्रशिक्षण सुरु होण्याची दिनांक समान राहील.
३.२ री साठी प्रशिक्षण समाप्ती एक दिवस अगोदर होईल.
C. प्रशिक्षण घटकसंच व वाचन साहित्यः
प्रशिक्षक / सुलभक यांचेसाठी मराठी माध्यमाचे प्रशिक्षण घटकसंच जिल्हा स्तरापर्यंत (जिल्हा मुख्यालयाच्या तालुका वाहतूकोसोबत) वितरित करण्यात येतील. उर्दू माध्यमाचे घटकसंच राज्यस्तर TOT वेळी वितरित करण्यात येतील. वाचन साहित्य म्हणून पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ (भाग-१ व भाग-२) यांच्या प्रती सन २०२५-२६ मध्ये शाळांना पुरविण्यात आलेल्या आहेत. शालेय शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम इयत्ता तिसरी (भाग-१ व भाग-२) तसेच इयत्ता चौथी (भाग-१ व भाग-२) प्रत्येक शाळेसाठी एक संच तालुका स्तरापर्यंत पोच करण्यात येत आहे. त्याचे वितरण शाळा स्तरापर्यंत होईल याची दक्षता घ्यावी व प्रशिक्षणास येताना त्याची प्रत सोबत आणणेबाबत प्रशिक्षणार्थी यांना कळवावे. मराठी माध्यमातोल अभ्यासक्रमाची प्रत सर्व माध्यमाच्या शाळांना पुरविण्यात येईल. अभ्यासक्रमाचा एक संच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्तरावर ठेवण्यासाठी जिल्हा मुख्यालयाच्या तालुका वाहतूकीसोबत पाठविण्यात येईल.
D. प्रशिक्षणार्थी व सुलभक-
जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनाची जबाबदारी संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था DIET यांची राहील. माध्यमनिहाय प्रशिक्षणार्थी संख्या व तपशीलवार नियोजन सोबत जोडलेले आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांच्या एकूण संख्येनुसार ६० प्रशिक्षणार्थ्यांचा एक वर्ग याप्रमाणे आवश्यक बॅचेस तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार प्रशिक्षण स्थळ व तज्ज्ञांची निवड करावी व अन्य पूर्वतयारी करावी.
उर्दू माध्यमांसाठी तालुकास्तरावर वर्गासाठी पुरेशी संख्या होऊ शकत नसल्याने त्यांचेसाठी राज्यस्तर व जिल्हास्तर असे दोनच टप्पे असतील. संख्येनुसार वर्ग पूर्ण होण्यासाठी काही ठिकाणी एकापेक्षा अधिक जिल्ह्याचे प्रशिक्षण नियोजन एकत्र दिलेले आहे. सदर प्रशिक्षण ज्या जिल्ह्यात असेल त्या DIET मार्फत सदर प्रशिक्षणाचे आयोजन होईल,
प्रशिक्षणार्थी संख्या, उपलब्ध सुलभक संख्या यांनुसार एकापेक्षा जास्त टपप्यांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करुन घ्यावे, शिक्षकांना जनगणना, मतदार नोंदणी इत्यादी राष्ट्रीय कामकाज सोपविलेले असल्यास त्याचा विचार करुन प्रशिक्षणाचे एक अथवा अधिक टप्प्यांमध्ये नियोजन करावे. तथापि दिलेल्या कालमर्यादित सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
E. पर्यवेक्षण व समन्वय-
राज्यस्तर तज्ज्ञांचा जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षणासाठी आवश्यकतेनुसार उपयोग करुन घेता येईल. विभागातील प्रशिक्षण परिणामकारक व नियोजनानुसार होत असलेबाबत क्षेत्रीय विद्या प्राधिकरण (RAA) व DIET यांनी समन्वय साधावा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी सर्व सहभागी प्रशिक्षणासाठी वेळेत उपस्थित राहतील याबाबत आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात.
राज्यातील शासकीय व खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षक प्रशिक्षणासाठी निधीची उपलब्धता झाल्यानंतर आपणास कळविण्यात येईल. खाजगी विना अनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांतील शिक्षकांसाठी सदर प्रशिक्षण स्वतंत्रपणे आयोजित करता येईल त्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद उपलब्ध असणार नाही.
प्रशिक्षणासाठी प्रशासकीय व आर्थिक तरतूदीबाबत सूचना यथावकाश निर्गमित करण्यात यतील, त्याचप्रमाणे इ.६वी प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
F. राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण ToT नियोजन
इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी नवीन अभ्यासक्रम राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (ToT) साठी अपेक्षित संख्या.
प्रशिक्षण
इयत्ता दुसरी
२६८
इयत्ता तिसरी व चौथी
१८०
राज्यस्तर TOT मराठी माध्यम
१८३
राज्यस्तर TOT उर्दू माध्यम
१३८
राज्यस्तरावरील ToT प्रशिक्षणासाठी जिल्ह्याच्या गरजेनुसार (इ.२ री साठी प्रतिवर्ग ३) व (इ. ३ री, ४ थी साठी एकत्रित प्रतिवर्ग ४) या प्रमाणात सुलभकांची संख्या निश्चित करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार दिलेल्या संख्येच्या मर्यादेत जिल्हास्तर ToT साठी सुलभक यांची निवड आपले स्तरावरुन करण्यात यावी व त्यांची नावे राज्यस्तर TOT साठी या कार्यालयास कळविण्यात यावीत.
राज्यस्तर (ToT) प्रशिक्षकांचे प्रशिक्षणासाठी आपल्या जिल्ह्यासाठी निर्धारित संख्येनुसार राज्यस्तर प्रशिक्षणार्थी (जिल्हास्तर सुलभक) यांची निवड करताना त्यामध्ये, उत्तम प्रशिक्षक कौशल्ये असणारे, अभ्यासक्रम निर्मितीमध्ये सहभागी सदस्य, अनुभवी व्याख्याता, पर्यवेक्षकीय अधिकारी, शिक्षक, अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्य, इ. तज्ज्ञांचा समावेश करावा. राज्यस्तरासाठी निवड करण्यात येणारे प्रशिक्षणार्थी हे जिल्हास्तर (ToT) साठी प्रशिक्षक म्हणून कामकाज करण्यासाठी सक्षम असावेत. ही निवड करताना सर्व विषयांचे तज्ज्ञ समाविष्ट होतोल याची दक्षता घ्यावी. तसेच प्रत्येक इयत्तेसाठी DIET मधील किमान एक तज्ज्ञ समन्वयक म्हणून निवड करणे अनिवार्य असेल.
राज्यस्तर TOT मराठी व उर्दू माध्यम जिल्हानिहाय अपेक्षित संख्या तपशील सोबत लिंक मध्ये संलग्न आहे. त्यानुसार सदर प्रशिक्षणासाठी तज्ज्ञांची निवड करुन त्यांना पहिल्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत प्रशिक्षण स्थळी उपस्थित राहणेसाठी कार्यमुक्त करणेबाबत आपले स्तरावरून संबंधितांना आदेशित करावे व ते उपस्थित राहतील याची खात्री करावी.
सदर प्रशिक्षणासाठी उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना नियमानुसार प्रवास भत्ता अदा करण्यात येईल. त्यासाठी संबंधितांना स्वतःचा UID, PAN, बँक खाते तपशील सोबत घेऊन येणेबाबत कळवावे.
राज्यस्तर प्रशिक्षकांचे (ToT) प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी यांचा तपशील परिषदेस वरील इमेल पत्त्यावर स्वाक्षरीत आदेश आणि ती नावे यासोबतच्या Speadsheet लिंक मध्ये दिनांक, २० एप्रिल २०२६ पर्यंत अचूक देण्यात यावीत. याव्यतिरिक्त कोणासही सदर राज्यस्तर प्रशिक्षणात सहभागी होता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याच्या निर्धारित संख्येनुसारच प्रशिक्षणार्थी राज्यस्तरीय प्रशिक्षणास उपस्थित राहतील याची दक्षता घेण्यात यावी. प्रशिक्षण तारखांबाबत संबंधितांना कळवावे.
Spreadsheet for State ToT info.
Digitally signed by KAMALADEVI SHRIDHAR AWATE Date: 10-04-2026 18:42:28
(डॉ. कमलादेवी आवटे)
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन वप्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
https://docs.google.com/spreadsheets/d/1x2LeK8Yu5-IIwAYGREKCEPkwq7aRH8Oi5QE0Sq_ESSE/edit?usp=sharing
Spreadsheet Link-
वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी Download वर क्लिक करा
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.






0 टिप्पण्या