वर्ग बारावी HSC बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी मार्च 2023 च्या निकालानंतर उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी छायाप्रत व पुनर्मूल्यांकन संधीबाबत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा. फेब्रु / मार्च 2023 ला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना संपादित गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत तसेच उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाची संधी उपलब्ध राहणार आहे. सदर संधीबाबत खालीलप्रमाणे माहिती नमूद करण्यात येत आहे. या परीक्षेच्या ऑनलाईन निकालानंतर खाली दर्शविलेल्या तारखांनुसार गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत प्राप्त करुन घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारण्यात येणार असून त्यासाठी भरावयाचे विहीत शुल्क, अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच यापत्रासोबत जोडलेले आहे.
ऑनलाईन साठी संकेतस्थळ इ. 12 वी साठी
http://verification.mh-hsc.ac.in
या प्रक्रियेसाठीचे विहित शुल्क Debit Card/Credit Card/UPI/Net Banking या व्दारे ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहे.
1
शुल्क प्रती विषय
रु.50/-
गुणपडताळणी
26/05/2023 ते 05/06/2023 पर्यंत
2
उत्तरपत्रिकाची छायाप्रत
26/05/2023 ते 14/06/2023 पर्यंत
रु.400/-
3
पुनर्मूल्यांकन
उत्तरपत्रिका छायाप्रती
प्राप्त झाल्यावर रू. 300/- कार्यालयीन कामाच्या 05 दिवसाच्या आत
उत्तरपत्रिकांच्या पुनर्मुल्यांकनाबाबत:-
उत्तरपत्रिकेची छायाप्रत प्राप्त झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विषय शिक्षकांच्या अभिप्रायासह अर्ज करावयाचा असल्याने उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीची तपासणी विहीत वेळेत विषय शिक्षकांकडून करुन घेण्याची व विषय शिक्षकाचा अभिप्राय प्राप्त करुन घेण्याची जबाबदारी प्राचार्यांची राहील. जेणेकरुन
विद्यार्थी पुनर्मुल्यांकनाच्या सुविधेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. विषय शिक्षकाने त्याच्या जवळच्या शाळेमध्ये / कनिष्ठ महाविद्यालयामध्ये संपर्क साधून नमूना उत्तरपत्रिका प्राप्त करुन घ्यावी. अभिप्रायाचा नमूना सोबत जोडण्यात आला आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेतील (इ. 12 वी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत व पुनर्मुल्यांकन करण्याबाबतच्या महत्वाच्या अटी व शर्ती तसेच कार्यपध्दती सोबत जोडले असून विद्यार्थ्यांच्या / पालकांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments