राज्यातील सर्व शाळांना सारखा गणवेश होणार. छोट्या शाळांसाठी क्लस्टर शाळेचा प्रयोग. शिक्षण आयुक्त

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात क्लस्टर शाळेचा प्रयोग राबविला जाणार. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी एका कार्यक्रमात केले आहे.


महाराष्ट्रातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या सुमारे साडेचार हजाराहून अधिक शाळा त्यासाठी विचारात घेणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत नुसत्यास ॲम्बी व्हॅली येथे झालेल्या कार्यशाळेत शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी हा विषय चर्चेला आणला. राज्यभरात वीस विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 4895 शाळा अधिक आहेत त्या शाळांमध्ये 826 शिक्षक आहेत, तर सुमारे पन्नास हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्या प्रत्येकाला शिक्षण ही सरकारची जबाबदारी असली तरी कमीपट संख्येमुळे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात अडचणी येतात, अशी शिक्षण विभागाची धारणा आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये आणावी अशी चर्चा या कार्यशाळेत झाली. पुणे जिल्ह्यात पानशेत जवळ असा पतसंदर्शी प्रयोग केला असून तो यशस्वी झाला आहे आता राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाने विचार सुरू केला आहे.

क्लस्टर शाळा म्हणजे काय? 

आणि छान मधील विद्यार्थ्यांना एकत्रित आणणारी एक शाळा म्हणजे क्लस्टर शाळा कमी पटसंख्येच्या शाळा असलेल्या भागातील काही अंतरावरील एक मध्यवर्ती शाळा निवडून त्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातील. त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावापासून या शाळेत यावे लागते क्लस्टर शाळेपर्यंत पोहोचण्या साठी विद्यार्थ्यांना देण्यात अडचणी येऊ नये म्हणून त्यांना प्रवास खर्च सरकारतर्फे करण्याच्या पर्यायाचा विचारही केला जात आहे या प्रक्रियेत कमी पटसंख्येच्या शाळांमधील शिक्षकांना कोणतीही अडचण येणार नाही. त्यांचे क्लस्टर शाळेत किंवा अन्य ठिकाणच्या शाळेत समायोजन करावे असा पर्याय यावेळी निश्चित करण्यात आला.

अर्थात वरील प्रयोग म्हणजे पुन्हा एकदा वीस पटसंखेच्या आतील शाळा बंद करण्यासाठी नवीन प्रयोग तर नाही ना? अशी शंका मात्र घेता येते.

यापुढे सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सारखाच गणवेश.

खाजगी शाळांत माने काही जिल्हा परिषद शाळा आणि अनुदानित शाळांनी त्यांच्या गणवेशाचे रंग बदलले आहेत यातून शाळेचे वेगळेपण दिसण्यापेक्षा मुलांमध्ये उच्चनीचीतेची भावना निर्माण होते यावर कार्यशाळेत चर्चा झाली. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली राज्यातील सर्व शाळांमध्ये एकच प्रकारचा गणवेश करण्याविषयी अधिकाऱ्यांनी मते मांडली.

सर्व शाळांमध्ये मुलांसाठी खाती पॅन्ट पांढरा शर्ट आणि मुलींसाठी निळा पांढरा ड्रेस असा हा गणवेश करण्यात येणार आहे.

शिक्षणाबरोबरच मुलांचा सर्वांनी विकास समाजात मिसळण्याची वृत्ती सामाजिक भान खेळाडू वृत्ती आणि परस्परांना समजून घेण्याची कला देखील विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे परंतु एक दोन किंवा पाच दहा पटसंखेच्या शाळांच्या माध्यमातून ही उद्दिष्टे साध्य करणे कठीण असते.

अनेक खेळ आणि क्रीडाविषयक संधी त्यांना उपलब्ध होत नाही म्हणून राज्यात क्लस्टर शाळांचा प्रयोग राबविण्याचा विचार करीत आहोत तसेच विद्यार्थ्यांना एकाच रंगांचे चांगल्या गुणवत्तेचे गणवेश देण्यावर भर दिला जाणार आहे.

वरील प्रमाणे माहिती माननीय सुरज मांढरे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिली आहे.नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.