बदली अपडेट २०२३-२४ सुधारित बदली धोरण आंतर जिल्हा व जिल्हा अंतर्गत...

 जिल्हा परिषद शिक्षकांचे नवे सुधारित बदली धोरण मे -२०२३ मध्ये होणार निर्गमित ...!
👉सुधारित ऑनलाईन बदली धोरणाने २०२३-२४ ची बदली प्रक्रिया मे अखेर.


👉आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पार पडल्यावर जिल्हांतर्गत बदली.✍️थेट ग्रामविकास मंत्रालय स्तरावरून...


महेश ठाकरे 

राज्याध्यक्ष 

प्रहार शिक्षक संघटना


यांनी दिलेल्या माहितीनुसार.. 


जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया प्रथमच २०१७ मध्ये ऑनलाईन धोरणाने राबविण्यात आली.तदनंतर ७ एप्रिल २०२१ मधील सुधारित धोरणाची अंमलबजावणी करीत दोन्ही बदली प्रक्रिया पार पडली मात्र यात काही त्रुटी बदली प्रक्रियेत दिसून आल्याने अथवा बदली प्रक्रियेत काही संवर्ग ला न्याय मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर पुन्हा सुधारित सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यासाठी ग्रामविकास शासन स्तरावरून दि.१४ मार्च २०२३ रोजी पत्र निर्गमित झाले आहे. सहा सदस्यीय अभ्यास गट नव्याने यासाठी शासन स्तरावर नेमण्यात आलेला आहे.शासन स्तरावरून नुकत्याच सुधारित धोरणाच्या अनुषंगाने सूचना/सुधारणा शिक्षक संघटनांना मागविण्यात आलेल्या होत्या.


त्या अनुषंगाने प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने ग्रामविकास मंत्री महोदय यांचेसह ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना आंतरजिल्हा बदली बाबत २० व जिल्हा अंतर्गत बदली बाबत १७ महत्वपूर्ण सुधारणा निवेदनाद्वारे सुचविण्यात आलेल्या आहेत.या सर्वसमावेशक सुधारणांची दखल शासन स्तरावरून घेण्यात आलेली आहे.असे असले तरी नेमके धोरण कधी निश्चित होणार व बदली प्रक्रिया प्रत्यक्षात कधी सुरू होणार याबाबत अनेक शिक्षक संघटनेकडे विचारणा करीत असल्याने , थेट ग्रामविकास मंत्रालय स्तरावरून ही माहितीपर पोस्ट देण्यात येत आहे .➡️दोन्ही बदली प्रक्रिया नवीन धोरणाने..


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदलीबाबतचे नवीन बदली धोरण निश्चित करण्याचे काम शासन स्तरावर सुरू अभ्यास गटाच्या माध्यमातून सुरू आहे.यामध्ये जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्याबाबत सुधारित धोरण निश्चित करण्यात येणार आहे.शिक्षक बदली अभ्यास गटाकडे ८ हजार चे वर सूचना/सुधारणा आलेल्या असून त्या सूचनांची माहिती एकत्रित करण्याचे व वर्गीकरण करण्याचे काम सुरू आहे.त्यासाठी ४ अधिकाऱ्यांची टीम शासन व प्रशासन स्तरावर काम करत आहे.मात्र मे -२०२३ मध्येच सर्वसमावेशक बदली धोरण जाहीर करण्यात येणार आहे.तर प्रत्यक्ष ऑनलाईन बदली प्रक्रिया सुधारित धोरणानुसार संगणकीय प्रणाली मध्ये बदल करून त्याप्रमाणे ट्रायल रन घेऊनच सुरू होणार आहे. मे महिन्यात प्रत्यक्ष बदली प्रक्रिया सुरू करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत.मात्र वेळीच सर्व प्रक्रिया पार न पडल्यास मे अखेर पर्यंत बदली प्रक्रिया सुरू होईल.आंतरजिल्हा बदली ची फेरी पार पडल्यावर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया घेण्यात येणार आहे.


➡️बदली प्रक्रियेत काही महत्वपूर्ण बदल असे....आंतरजिल्हा बदली प्रक्रिया :-


👉बदली अहर्ता ३१ मे ऐवजी ३० जून .३० जून अखेर किमान सेवा ३ वर्ष अथवा ४ वर्षे यापैकी एक सर्व संवर्ग करिता निश्चित होईल.


👉बदली इच्छुक शिक्षकांना पाच किमान जिल्ह्यांची निवड करण्याची संधी.


👉बदली बाबतचे एकच कालमर्यादेत वेळापत्रक .


👉आंतरजिल्हा बदली नंतर सेवाज्येष्ठता कायम बाबत मुद्दा विचाराधीन .


👉सिंगल एन ओ सी असणाऱ्या शिक्षकांना एक निश्चित कोटा देण्यात येईल.


👉संवर्ग १ मधील आजारांबाबत अधिक स्पष्टता येणार , आजारांची यादी समाविष्ट होण्याचे संकेत.


👉पती पत्नी एकत्रीकरण अंतर्गत ६०:४० नुसार बदल्या असल्या तरी सर्व संवर्ग २ मध्ये.


👉पदस्थापना बाबत नव्याने सुधारित धोरण , पूर्वी नक्षलग्रस्त ,आदिवासी भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांना दिलासा.जिल्हा अंतर्गत बदली बाबत :-


👉अवघड क्षेत्र बाबत निकष अधिक स्पष्ट होणार .


👉बदली करिता ३० जून हा बदली संदर्भ दिनांक धरून बदली प्रक्रिया.


👉बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना अवघड क्षेत्रातील वास्तव सेवाज्येष्ठता धरून बदल्या.अजून सेवा काळातील अवघड क्षेत्रात जितकी सेवा झाली असेल अश्या सेवाज्येष्ठता यादिने बदल्या .


👉अवघड क्षेत्रातील शिक्षकांना म्हणजेच बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना प्राधान्याने बदली देण्याचे धोरण .सर्व रिक्त व बदलीपात्र ची पदे मिळणार.


👉संवर्ग १ मधील आजाराबाबत अधिक स्पष्टता येणार.


👉सुगम मधील बदलीपात्र बाबत व्याख्या बदलणार , सुगम मधील एकूण १० वर्षे पूर्ण झालेले शिक्षक अथवा एकूण सेवा १० वर्षे व एका शाळेवर ३ वर्षे असा बदल शक्य.


👉संवर्ग १ व २ ला प्रथम बदली वेळी ३ वर्ष पूर्ण ची अट नाही , मात्र एकदा बदली लाभ घेतल्यावर ३ वर्षे बदली नाही.


👉विस्थापित शिक्षकांचा शेवटचा टप्पा जिल्हा परिषद स्तरावर घेण्याचा निर्णय विचाराधीन .


👉पूर्वी अवघड मध्ये आता सुगम मधील शाळांना अवघड मधून बदलीची पुन्हा एक संधी.


👉खोटी माहिती भरून बदली घेणाऱ्यांवर कठोर कार्यवाहीची तरतूद.


👉बदली प्रक्रियेतील तांत्रिक बाबींसाठी जिल्हा व तालुका स्तरावर कार्यक्रम अधिकारी .


👉संवर्ग १ मध्ये मज्जातंतू वेदना ( trigeminal neuralgia ) या दुर्धर आजाराचा समावेश होण्याची शक्यता.


या प्रमुख शक्य बदलांसह इतर अनुषंगिक बदल विचाराधीन आहेत.तरी याबाबत ची अधिक स्पष्टता शासन धोरण निर्गमित झाल्यावर समोर येणार आहे.उपरोक्त माहितीपर पोस्ट थेट ग्रामविकास स्तरावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चे अंती सर्व बदली इच्छुक शिक्षकांच्या महितिस्त्व देण्यात येत आहे.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.