ब्रेकिंग न्यूज - संप कालावधी असाधारण रजा ऐवजी अर्जित रजा करण्याबाबत आजचा सामान्य प्रशासन विभागाचा बहुप्रतीक्षित शासन आदेश

 संप कालावधी असाधारण रजा ऐवजी अर्जित रजा करण्याबाबत आजचा सामान्य प्रशासन विभागाचा बहुप्रतीक्षित शासन आदेश.


आज दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपत सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत सुधारित शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित करून.


संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपवली आहे.

आजच्या शासन आदेशानुसार संप कालावधीतील अनुपस्थिती ही असाधारण रजा ऐवजी अर्जित रजा म्हणून समजण्यात यावी असे निर्देश पुढीलप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाने दिले आहे.


बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या दि. १४ मार्च ते २० मार्च, २०२३ या कालावधीत संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी/अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते, त्यांची अनुपस्थिती संदर्भ क्र. २ येथील दि. २८ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयान्वये "असाधारण रजा" म्हणून नियमित करण्यात आली होती. या आदेशात सुधारणा करून अनुपस्थितीचा कालावधी "असाधारण रजा" ऐवजी "अर्जित रजा" म्हणून समजण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय :-


बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र

यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक १४ मार्च, २०२३ ते २० मार्च,

२०२३ या कालावधीत पुकारलेल्या संपामध्ये जे शासकीय कर्मचारी / अधिकारी सहभागी झाले होते, त्यांची

अनुपस्थिती एक विशेष बाब म्हणून व पुर्वोदाहरण होणार नाही या अटीवर "असाधारण रजा" ऐवजी "अर्जित रजा" करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. २. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २०२३०४१३१६१२५१६९०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे..


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सदर आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

या शासन आदेशामुळे आता कोणत्याही कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याची गरज उरली नाही. फक्त त्याच्या खाती असलेल्या सात अर्जित रजा त्यांच्या सेवा पुस्तकात नोंदवल्या जातील.


बऱ्याच कर्मचाऱ्यांची पगार देखील अद्याप झालेले नाहीत त्यामुळे पगार कपात होण्याची शक्यता नाही.



वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.