राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षण (SLAS) 2022 23 च्या आयोजनाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांचे पत्र

राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षण (SLAS) 2022 23 च्या आयोजनाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांचे पत्र.17 मार्च 2023 रोजी राज्यातील तिसरी पाचवी व आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षण SLAS 2022 23 च्या आयोजनाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

राज्यातील तिसरी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती जाणून घेण्यासाठी राज्यस्तरीय संपादन सर्वेक्षण चे आयोजन दिनांक 17 मार्च 2023 रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे मार्फत करण्यात येणार आहे सदर सर्वेक्षण चाचणीचे स्वरूप दिनांक व वेळ पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.

इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांसाठी सदर सर्वेक्षण चाचणी मध्ये भाषा विषयासाठी वीज प्रश्न गणित विषयाचे 25 प्रश्न असे एकूण 45 प्रश्न व या 45 प्रश्नांची चाचणी एकूण 90 मिनिटात दिनांक 17 मार्च 2023 रोजी शालेय कामकाजाच्या वेळेत घेण्यात येणार आहे.

इयत्ता पाचवी साठी प्रथम भाषा विषयासाठी 20 प्रश्न व गणित विषयाचे 25 प्रश्न असे एकूण 45 प्रश्नांची चाचणी सोडवण्यासाठी 90 मिनिटे उपलब्ध असतील व सदर चाचणी दिनांक 17 मार्च 2023 रोजी शालेय कामकाजाच्या वेळेत घेण्यात येईल.

तर आठव्या वर्गात च्या संपादनूक सर्वेक्षणासाठी प्रथम भाषेचे 25 प्रश्न गणिताचे 35 प्रश्न असे एकूण 60 प्रश्न सोडवण्यासाठी 120 मिनिटे वेळ मिळेल व सदर चाचणी दिनांक 17 मार्च 2023 रोजी शालेय कामकाजाच्या वेळेत घेण्यात येईल.
सदर सर्वेक्षण हे मराठी माध्यमा ंसाठीच्या शाळांमध्ये होणार असून प्रथम भाषा मराठी व गणित या दोन विषयांमधील अध्ययन निष्पत्ती वर आधारित असणार आहे.
सदर सर्वेक्षणाची पूर्वतयारी म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व प्रादेशिक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई मुंबई शहर व मुंबई उपनगर प्रत्येकी दोन अधिकारी या कार्यालयातील प्रत्येकी दोन अधिकारी वरिष्ठ अधिव्याख्याता अधिव्याख्याता यांची जिल्हा समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी एका तालुका समन्वयकाची नेमणूक करण्यात आलेली आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व जिल्हे व प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांनी जिल्हा निहाय इयत्ता तिसरी पाचवी व आठवीच्या शाळांची यादृच्छिकपणे निवड करून यादी कळविण्यात आलेली आहे. यादीतील प्रत्येक शाळेसाठी एक याप्रमाणे क्षेत्रीय अन्वेषक यांची निवड करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. जिल्ह्यासाठी एकूण निवडण्यात आलेल्या क्षेत्रीय अन्वेषकांच्या संख्येनुसार 5% क्षेत्रीय अन्वेषक राखीव ठेवण्यात यावे राज्यस्तरावरून जिल्हा समन्वयक यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिनांक 3 मार्च 2023 रोजी देण्यात येईल याबाबतची जुंगलिंक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयाच्या मेलवर एक दिवस अगोदर कळवण्यात येईल राज्यस्तरीय प्रशिक्षणानंतर जिल्हा समन्वयक यांनी तालुका समन्वयक व क्षेत्रीय अनिवेषक यांचे सर्वेक्षण विषयक प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात द्यावे.
क्षेत्रीय अन्वेषक निवड करताना खालील व्यक्तींची निवड करण्यात यावी.
1) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी, 

2) विस्तार अधिकारी शिक्षण
3) केंद्रप्रमुख
4) बी आर सी यु आर सी साधन व्यक्ती विशेषतज्ञ विशेष शिक्षक.
5) अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य व छात्र अध्यापक.
6) आवश्यकता भासल्यास प्राथमिक शाळा मुख्याध्यापक व शिक्षक.

मुख्याध्यापक व शिक्षक यांना त्यांची स्वतःची शाळा सर्वेक्षणासाठी मिळणार नाही याची दक्षता घ्यावी क्षेत्रीय अन्वेषक यांना मराठी भाषा अवगत असावी त्याचबरोबर ज्या शाळा सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या त्या शाळेचा पट माध्यम यांची पडताळणी करण्यात यावी निवड झालेल्या शाळेतील संबंधित वर्गाचा पट पाच किंवा पाचपेक्षा कमी असल्यास किंवा माध्यम दुसरे असल्यास तसे परिषदेस कळवावे परिषदेकडून सर्वेक्षणासाठी शाळा बदलून दिली जाईल.
सदर सर्वेक्षणाच्या अनुषंगाने प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक गटशिक्षणाधिकारी जिल्हा समन्वयक प्रशासनाधिकारी तालुका समन्वयक यांच्या आवश्यकतेनुसार बैठका घेऊन नियोजन व आवश्यक ती कार्यवाही परिषदेच्या सूचनेनुसार करावी.
सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या शाळांना याबाबत अवगत करावे. प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या दिवशी निवड झालेल्या इयत्तेचे सर्व विद्यार्थी हजर राहतील याची दक्षता घ्यावी सर्वेक्षणाच्या दिवशी सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या शाळेत दहावी अथवा बारावी परीक्षा केंद्र असेल तरी त्या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात यावे मात्र दहावी अथवा बारावी परीक्षा त्यांना डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्यावी किंवा सकाळ-सत्रामध्ये सर्वेक्षण करण्यात यावे.वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.