संचमान्यता अपडेट - संच मान्यते बाबत तांत्रिक अडचणी सोडवणे संदर्भात शिक्षण संचालकांचे पत्र

संचमान्यता अपडेट - संच मान्यते बाबत तांत्रिक अडचणी सोडवणे संदर्भात शिक्षण संचालकांचे पत्र.


महाराष्ट्राचे शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 17 मार्च 2023 रोजी संच मान्यता 2021 22 बाबत पुढील प्रमाणे महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष सन 2021 22 ची तात्पुरती संच मान्यता दिनांक 14 जून 2021 च्या शासनपत्रांवर आधार क्रमांक असलेले विद्यार्थी गृहीत धरून करण्याचे निर्देश आहेत.

शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 नुसार सन 2022 23 च्या संजय मान्यता आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवरून करण्यात येणार आहे त्यामुळे आपल्या विभागाच्या अधिनियस जिल्ह्यातील ज्या शाळा तुकड्या शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 अन्वये अनुदानावर घोषित करण्यात आलेल्या तसेच त्या शाळांच्या संचमान्यता सन 2021 22 च्या अद्यापही तांत्रिक अडचणीमुळे संचमान्यता प्रिंट उपलब्ध झाली नाही त्या शाळांच्या काय अडचणी आहे याबाबत कागदपत्रे घेऊन खालील प्रमाणे विभागनिहाय जबाबदार अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.

सदरचे शिबिर हे शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 मधील घोषित केलेल्या शाळा तुकड्या यांच्याकरिता आयोजित करण्यात आलेल्या असल्यामुळे या शाळांच्या प्रलंबित संचमान्यतेबद्दल आवश्यक अभिलेखासह पुणे मुंबई नाशिक व लातूर या विभागांनी 23 मार्च 2023 रोजी कार्यालयीन वेळेत शिक्षण संचालक कार्यालयात उपस्थित राहायचे आहे व अमरावती नागपूर कोल्हापूर औरंगाबाद या विभागातील शाळांनी दिनांक 24 मार्च 2023 रोजी कार्यालयीन वेळेत शिक्षण संचालक प्राथमिक कार्यालयात उपस्थित राहायचे आहे.

 नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.