महाज्योती कडे MHT-CET/JEE/NEET 2025 ऑनलाइन पूर्व तयारीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी महाज्योती संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करणे बाबत.

 महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडुन MHT-CET/JEE/NEET - 2025 या परीक्षेच्या मोफत ऑनलाईन पुर्व तयारीसाठी OBC/VJNT / SBC या संवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. 10 वी पास झाल्याची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याची पावती आणि बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच जातीचे वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र | अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदारांनी महाज्योतीने मागविण्यात आलेल्या कागपत्राची पूर्तता करावी. या करिता विद्यार्थ्यांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध " MHT-CET / JEE / NEET 2025 Training | Document Update Link" यावर जाऊन दिनांक 30/06/2023 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अपलोड करावी.


टिप:- टपालद्वारे / प्रत्यक्ष किंवा मेल वर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.


(राजेश खवले) व्यवस्थापकीय संचालक महाज्योती, नागपूर



इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, महाज्योती, महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्यावतीने विज्ञान शाखेच्या अल्प उत्पन्न गटातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब व इंटरनेट सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची तारीख 31 मार्च 2023 ही आहे. 




लाभार्थ्यांसाठी पात्रता - 

उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 

उमेदवार हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा. 

उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावा.  

जे विद्यार्थी सन 2023 मध्ये दहावीची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्यांनी अर्ज करताना दहावीचे प्रवेश पत्र व नववीची गुणपत्रिका जोडावी. 

विद्यार्थी हा विज्ञान शाखेतील प्रवेश घेणारा असावा.  

ज्या बाबतची कागदपत्रे त्यांनी भविष्यात सूचनेनुसार अपलोड करणे आवश्यक आहे. 




अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे - 

नववीची गुणपत्रिका.

दहावी परीक्षेचे ओळखपत्र.

आधार कार्ड.

रहिवासी दाखला जातीचे प्रमाणपत्र.

वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. 


www.mahajyoti.org.in 


या महाज्योती च्या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड मधील एप्लीकेशन फॉर MHT-CET/JEE/NEET 2025 यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.  

अर्जासोबत कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 मार्च 2023 आहे.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.