सुवर्णसंधी! राज्य अभ्यासक्रम आराखडे विकसित करण्यासाठी तज्ञ व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज करणे बाबत एस सी ई आर टी चे पत्र/link.

 राज्य अभ्यासक्रम आराखडे विकसित करण्यासाठी तज्ञ व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज करणे बाबत एस सी ई आर टी चे पत्र.


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयातून निर्गमित दिनांक 23 मार्च 2023 रोजी च्या परिपत्रकानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडे विकसित करण्यासाठी तज्ञ व्यक्तींच्या निवडीबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मितीची प्रक्रिया सर्व समावेशक व राज्यातील विविध क्षेत्रातील तज्ञ यांच्या समवेत तयार करण्यात येणार आहे.

त्यानुसार ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आलेल्या तज्ञ निवड प्रक्रियेसाठी या कार्यालयास खालील चार राज्य अभ्यासक्रम आराखडे विकसनासाठी लिंक द्वारे एकूण 4512 अर्ज प्राप्त झालेले आहे ज्यांना यापूर्वी लिंक वर ऑनलाईन अर्ज सादर केला आहे त्यांच्या अर्जावर विचार केला जाणार असल्याने सदर व्यक्तींनी पुन्हा लिंक भरण्याची आवश्यकता नाही.

1) राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण

2) राज्य अभ्यासक्रम आराखडा बालपणातील काळजी व शिक्षण

3) राज्य अभ्यासक्रम आराखडा शिक्षक शिक्षण

4) राज्य अभ्यासक्रम आराखडा प्रौढ शिक्षण

वरील प्रमाणे चार राज्याभ्यासक्रम आराखडे विकसित करण्यासाठी तसेच विषय समित्या अभ्यास मंडळे गठित करण्यासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमधील प्राचार्य वरिष्ठ अधिव्याख्याता अधिव्याख्याता अध्यापक विद्यालयातील प्राचार्य व अध्यापकाचार्य शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी विषय तज्ञ विशेष तज्ञ केंद्रप्रमुख प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक तसेच विद्यापीठातील प्राध्यापक वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक शासनाच्या विविध विभागातील अधिकारी अशासकीय संस्थांचे सदस्य यामधील इच्छुक तज्ञांचे सहकार्य घेतले जाणार आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसन कार्यात योगदान देण्यासाठी राज्यातील उपरोक्त तज्ञ व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

https://scertmaha.ac.in/scf/

वरील वेबसाईटवर आवेदन करावे सदर आवेदन पत्र भरण्यासाठी दिनांक 27 मार्च 2023 ते 31 मार्च 2023 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत कालावधी देण्यात येत आहे.


25 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयानुसार पाठ्यक्रम अभ्यासक्रम अध्ययन अध्यापन साहित्य विकसनसाठी अभ्यास मंडळ व विशेष समित्यांचे गठन विषय योजनेनुसार गरजेनू करण्यात येणार आहे तरी याबाबत आपल्या अधिनिष्ठ असणाऱ्या कार्यक्षेत्रातील इच्छुक तज्ञ व्यक्तींना उपरोक्त वेबसाईटवर अचूक माहिती भरण्याबाबत अवगत करण्यात यावे.

अर्ज केलेल्या तज्ञांमधून विहित पद्धतीने आवश्यक तज्ञांची निवड प्रक्रिया सदर कार्यालयावर पार पाडण्यात येईल प्रस्तुत निवड प्रक्रियेला सुकाणू समितीची मान्यता घेण्यात येईल तसेच निवड करण्यात आलेल्या संबंधितांना ई-मेल किंवा पत्राद्वारे पुढील प्रक्रिये बाबत सूचित करण्यात येईल.


वरील प्रमाणे निर्देश माननीय डॉक्टर नेहा बेलसरी उपसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी संबंधितांना दिले आहे.


अर्थात वरील संधी ही सुवर्णसंधी आहे ज्यांना अभ्यासक्रम बदल सुचवायचे आहेत किंवा अभ्यासक्रम कसा असावा हे ज्यांचे स्पष्ट मत आहे त्यांनी सदर अर्ज ऑनलाईन भरून सबमिट करावा म्हणजे राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मितीसाठी आपल्या तज्ञत्वाचा फायदा होईल.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.