सन 2022-23 यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळा शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती संगणकीकृत करणे बाबत राज्य प्रकल्प समन्वयकांचे नवीन निर्देश.

सन 2022-23 यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळा शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती संगणकीकृत करणे बाबत राज्य प्रकल्प समन्वयकांचे नवीन निर्देश.


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई च्या दिनांक 21 फेब्रुवारी 2023 च्या रोजीच्या पत्रानुसार सन 2022 23 यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळा शिक्षक व विद्यार्थी यांची माहिती संगणकीकृत करणे बाबत पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहे.


भारत सरकार शिक्षा मंत्रालयाकडून समग्र शिक्षा योजनेचे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत यु-डायस प्लस ची सर्व माहिती भरण्याच्या सूचना या कार्यालयात कडून देण्यात आल्या होत्या तरी अद्याप स्टुडन्ट एन्ट्री चे काम फक्त 32 टक्के पूर्ण झाले आहे.

जिल्हास्तरावर प्रोग्रामर व तालुका स्तरावर एम आय एस कॉर्डिनेटर यांनी पूर्णवेळ सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांकडे यु-डायस प्लस च्या कामाचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. याशिवाय तालुकास्तरावरील सर्व बीआरसी कर्मचारी यांना देखील या कामात पूर्णवेळ सहकार्य करावयाचे आहे. तरी या संदर्भात आपण गटशिक्षणाधिकारी यांना आपल्या स्तरावरून आदेशित करावे. आपल्या जिल्ह्याचे स्टुडन्ट एन्ट्री चे काम दिनांक 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण करावे अशी सूचना वजा आदेश राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद सर्व व शिक्षणाधिकारी किंवा प्रशासन अधिकारी महानगरपालिका सर्व यांना दिले आहेत.
विद्यार्थी माहिती यु-डायस प्लस पोर्टलवर अपलोड करण्यासाठी जवळपास 53 मुद्दे एका विद्यार्थ्यांशी संबंधित आहेत.

आपण डायरेक्ट ऑनलाइन यु-डायस पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती भरली किंवा एक्सल शीट डाउनलोड करून विद्यार्थ्यांची माहिती एक्सेल शीट मध्ये भरली तरी देखील सारखीच माहिती तेवढीच माहिती दोन्ही ठिकाणी भरावी लागते.

सदर डेटा एन्ट्रीचे काम करण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे.


यु-डायस प्लस मध्ये विद्यार्थी माहिती भरण्यासाठी विद्यार्थी माहिती संकलन कोरे प्रपत्र. 

Download


सुधारित👇


Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.