आजच्या शासन निर्णयानुसार यापुढील चालू असलेली 2022 ची बदली प्रक्रिया कशी होणार?

 2022 बदली PROCESS NOTE


१. सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांची १० अथवा १० पेक्षा जास्त वर्षे सेवा झाली आहे अशा शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली जाइल.


२. हे शिक्षक बदलीतून सूट मिळवण्यासाठी विशेष संवर्ग १ मधून अर्ज भरू शकतील व पडताळणीनंत व त्यांचा अर्ज वैध असेल तर त्यांना बदलीतून सूट मिळेल 

३. विशेष संवर्ग १ मधील शिक्षकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्राची वैधता पडताळण्यासाठी शिक्षण अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांनी ३० जून २०२२ ही तारीख प्रमाण धरावी. 


या बदली प्रक्रियेतून कोणाला वगळण्यात येईल ?

• २०२२ च्या बदली प्रक्रियेत ज्यांची आधीच्या राऊंडमध्ये बदली झालेली आहे . 

• ज्या शिक्षकांनी या राऊंड मध्ये विशेष संवर्ग १ मधून अर्ज भरून बदलीतून सूट घेतली आहे 

• या आधी विशेष संवर्ग १ मधून अर्ज भरून ज्या शिक्षकांनी आधीच सूट घेतली आहे 

• तसेच याआधी बदलीपात्र शिक्षकाने, विशेष संवर्ग १ मधून अर्ज भरताना बदलितून सूट हवी आहे का या प्रश्नाला नकार नोंदवला व पसंती क्रम न भरल्यामुळे ज्या शिक्षकाची विस्थापित होऊन बदली झाली


४. यानंतर विशेष संवर्ग १ मधील बदलीतून सूट घेतलेले शिक्षक वगळून अवघड क्षेत्रातील पदे भरण्यासाठी पात्र शिक्षकांची पुनः एकदा यादी पोर्टल वर जाहीर केली जाइल. 

५. वरील यादीत नाव आलेले शिक्षकच आपले पसंती क्रम पोर्टल वर भरू शकतील.

 


सूचना : आपला पसंतिक्रम देऊन तुम्ही पर्याय सुचवत आहात. परंतु तुमचा पसंतिक्रम उपलब्ध नसेल तर तुम्हाला उपलब्ध पदावर बदलीने नियुक्ती मिळेल. त्यामुळे पसंतिक्रमाप्रमाणेच तुम्हाला बदली मिळेल याची शाश्वती देता येणार नाही 

६. शिक्षकांनी आपला पसंतिक्रम भरल्यावर , संगणकीय प्रणालीद्वारे तुमच्या पसंतिक्रमाप्रमाणे तुमची बदली केली जाइल. परंतु तुमच्या पसंती क्रमातील शाळेत जागा उपलब्ध नसेल तर उपलब्ध जागेवर तुमची बदलीने नियुक्ती केली जाइल. पसंतिक्रम देण्यासाठी बंधन नाही. किमान १ आणि कमाल ३० पर्याय तुम्ही देऊ शकता. पसंतिक्रम दिला नाही तरी उपलब्ध जागेवर तुमची बदली होणारच.

 

७. त्यानंतर बदलीचे आदेश जाहीर केले जातील.


पुढील वर्ष म्हणजेच 2023 24 मधील बदली प्रक्रियेची वाट पाहणाऱ्यांना मात्र अजून एक महिना बदली प्रक्रिया सुरू होण्यासाठी वाट पाहावी लागेल.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.