RTE 25% Admission update - सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीईनुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज या कालावधीत करता येणार

 सन 2023 24 या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीईनुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज या कालावधीत करता येणार.


महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी सन 2023 24 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल वंचित घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश कर्ज भरणे आणि सादर करावयाच्या कागदपत्रांबाबत सर्व समावेशक सुधारित मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे दिल्या आहेत.

प्रवेश प्रक्रिया अंतर्गत त पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे सबब बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागणीची प्रक्रिया दिनांक एक मार्च 2023 दुपारी तीन ते दिनांक 17 मार्च 2023 रात्री बारा वाजेपर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.


ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना:-

1) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12.1 सी नुसार दुर्बल वंचित घटकातील बालकांना स्वयम अर्थसाहित्य शाळा खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअंक गणित छान मध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग स्तरावर 25% प्रवेश प्रक्रिये करिता पालकांनी

https://student.maharashtra.gov.in

वरील संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी.

वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो.

1) अनुसूचित जाती

2) अनुसूचित जमाती.

3) विमुक्त जाती अ

4) भटक्या जमाती ब

5) भटक्या जमाती क

6) भटक्या जमाती ड

7) इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी

8) विशेष मागास वर्ग म्हणजेच एसबीसी

9) दिव्यांग बालके

10 एचआयव्ही बाधित किंवा एचआयव्ही प्रभावित बालके.

11) अनाथ बालके.

12) कोविड प्रभावित बालक ज्याचे एक किंवा दोन्ही यांचे निधन एक एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले असे.


वरील वंचित गटातील बालकांच्या प्रवेशाकरिता वार्षिक कमाल  उत्पन्नाची मर्यादा लागू नाही.

आर्थिक वर्षामध्ये पालकांची आर्थिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो.

25% प्रवेश प्रक्रिया करता विचारपूर्वक दहा शाळांची निवड करण्यात यावी.

पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतची हवाई अंतर हे गुगल मॅप ने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरता तो बलून जास्तीत जास्त पाच वेळाच निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे.

प्रवेश प्रक्रिये बाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी अर्ज सादर करण्याच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यक्ती येण्याची शक्यता न करता येत नाही सर्व शक्य तितक्या लवकर परिपूर्ण अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी.

प्रवेश प्रक्रिया बाबत आपणास काही समस्या असल्यास आर टी पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे त्यांच्याशी संपर्क करून समस्यांचे निराकरण करण्यात यावे.

पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक खरी माहिती भरावी उदाहरणार्थ घराचा पत्ता जन्मदिनांक उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र इत्यादी.

ज्या पालकांनी यापूर्वी आरटीई पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.

यापूर्वी 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच पालकांना एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही.

पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यात येऊ नये.


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया करता आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

1) निवासाचा पुरावा:- 25% प्रवेश करता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास निवासी पुराव्या करिता रेशमी कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स टेलिफोन दे एक प्रॉपर्टी टॅक्स देख घरपट्टी आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इत्यादी यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल.

2) जर स्वतःची मालकीची जागा नसेल भाडेकरार ग्राह्य धरण्यात येईल सदरचा भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे अनिवार्य आहे. भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असलेला असावा जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकरांची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकाविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल.

2) जन्मतारखेचा पुरावा:- ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपालिका यांचा दाखला रुग्णालयातील एएनएम रजिस्टर मधील दाखला अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन ग्राह्य धरण्यात येईल.

सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे किंवा बालकांचे सादर करावयाची कागदपत्रे:- 

तहसीलदार उपजिल्हाधिकारी उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा म्हणजेच वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला. पर राज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रिये करता ग्राह्य धरण्यात येणार नाही.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातून प्रवेशा करता वार्षिक उत्पन्नाचा दाखला हा 2021 22 वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला किंवा उत्पन्नाच्या दाखल्या करिता पगाराचा दाखला कंपनीची किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल.

दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा:-

शिल्लक वैद्यकीय अधीक्षक अनु सूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.


संपूर्ण माहिती करता प्राथमिक शिक्षण संचालकांचे दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी चे संपूर्ण परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.