पुढील सत्रासाठी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये बाबत ग्रामविकास विभागाचा दिनांक 13 जानेवारी 2023 चा अधिकृत शासन निर्णय

पुढील सत्रासाठी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये बाबत ग्रामविकास विभागाचा दिनांक 13 जानेवारी 2023 चा अधिकृत शासन निर्णय. 


आपण आपल्या ब्लॉगवर या अगोदरच माहिती दिल्यानुसार ग्राम विकास विभागाने आज दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या यापुढील बदल्यांबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाइन प्रक्रियेद्वारे जिल्हा अंतर्गत बदलांबाबतचे धोरण दिनांक ७ एप्रिल 2021 च्या शासन निर्णय विहित करण्यात आले आहे सद्यस्थितीत शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांची कार्यवाही दिनांक 20 डिसेंबर २०२२ च्या वेळापत्रकानुसार सुरू असून बदली प्राण्यांमध्ये टप्पा क्रमांक एक दोन व तीन मधील कार्यवाही पूर्ण झालेली आहे सद्यस्थितीत टप्पा क्रमांक चार मधील अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू आहे दिनांक सात एप्रिल 2021 च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ४.४.५ नुसार बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या या बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंती मधील प्राधान्यक्रमानुसार केला जातील असे नमूद असल्यामुळे तसेच बदली प्रक्रियेमधील टप्पा क्रमांक दोन व तीन मध्ये बदली पात्र शिक्षकांच्या जागांची भूतांचे पर्याय वापरली गेल्यामुळे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना अर्ज सादर करताना पुरेसे पर्याय उपलब्ध होत नसल्याचे दिसून येते त्यामुळे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या जागांसह उपलब्ध रिक्त जागा दाखवण्याबाबत शिक्षक आणि शिक्षक संघटनांकडून सातत्याने मागणी केली जात आहे. 

शिक्षकांची जिल्हा बदली प्रक्रिया 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सुरू असल्यामुळे शिक्षक आणि शिक्षक संघटना कडून प्राप्त होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने आता शासन निर्णयामध्ये किंवा बदली पोर्टलवर सुधारणा किंवा बदल करणे उचित होणार नाही तथापि जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमधील त्रुटी बाबत शिक्षक वेळी प्राप्त झालेली निवेदने व मागण्यांच्या अनुषंगाने शिक्षक संघटनांकडून वेळो शासनाने स्थापन केलेल्या अभ्यास गटाकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत त्या अनुषंगाने अभ्यास गटाकडून प्राप्त होणाऱ्या शिफारशी विचारात घेऊन त्यानुसार उचित निर्णय घेण्यात येईल व त्यानुसार शिक्षकांची सन 2023 24 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यात येईल ही बाब संबंधित शिक्षक संघटनांच्या निदर्शनास आणण्यात यावी असे निर्देश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments