उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षा सुधारित दिनांक 29 मार्च 2026 बाबत शिक्षण संचालक योजना यांनी दिनांक 12 मार्च 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
FLNAT 2026/2025-26/02304
दिनांक : 12/03/2026.
प्रति,
1) शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद (सर्व)
2) शिक्षण निरीक्षक, मुंबई (दक्षिण/पश्चिम/उत्तर)
3) शिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी, मनपा/नपा (सर्व)
विषय :- उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षा सुधारित दिनांक 29 मार्च 2026 बाबत...
संदर्भ :-
1) शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र F.No. 6-1/2023-AE-2 दि. 20/02/2026.
2) अवर सचिव आणि समन्वयक शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याशी झालेली चर्चा दि. 10/3/2026.
उपरोक्त विषयानुसार, केंद्र शासनाच्या शिक्षण विभाग व साक्षरता विभागाचे पत्र व शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये राज्यास दिलेले भौतिक उद्दिष्ट 6.20 लक्ष गाठण्याच्या अनुषंगाने भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाची अवर सचिव यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आपल्या राज्याचे यावर्षी दिलेले उद्दिष्ट प्रयत्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार दिनांक 15 मार्च, 2026 रोजी घेण्यात येणारी परीक्षा ही आता रविवार दिनांक 29 मार्च, 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
तरी असाक्षर नोंदणी व जोडणी (Tagging) चे कामकाज तात्काळ 100% पूर्ण करण्यात यावे. साक्षरता वर्ग नियमित सुरू ठेवावेत. साक्षरता वर्गांना भेटी द्याव्यात. FLNAT प्रश्नपत्रिकांचा पुरेसा सराव करून घ्यावा. पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेस नोंदणी झालेले, पूर्वीच्या परीक्षेस उपस्थित न राहू शकलेले व कामगिरीत सुधारणा आवश्यक (Need Improvement) शेरा प्राप्त असे सर्व 100% असाक्षर प्रविष्ट होतील यासाठी प्रयत्न करावेत.
(कृष्णकुमार पाटील)
शिक्षण संचालक,
शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत माहितीस्तव सविनय सादर :
1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-32.
2. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
3. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
प्रत माहितीस्तव :
1. विभागीय उपसंचालक (सर्व)
2. राज्य साक्षरता केंद्र, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 Comments