प्राथमिक शिक्षकांच्या वेतना संदर्भात शिक्षण संचालकांचे महत्वपूर्ण परिपत्रक....
प्राथमिक शिक्षकांची वेतन माहे ऑक्टोबर 2022 पासून अनियमित होत आहे याचे मूळ कारण म्हणजे शासन स्तरावरून वेतनासाठी मिळणारा अपुरा निधी. या संदर्भात शिक्षक संघटनांनी शिक्षण संचालक यांना निवेदन दिले असता व कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याबाबत सांगितले असता.
प्राथमिक शिक्षण संचालक यांनी संघटनेच्या निवेदनाला उत्तर देणारे परिपत्रक दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी दिले आहे ते पुढील प्रमाणे.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी पुरेशा निधीची तरतूद न केल्यामुळे संचालक यांचे कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणे बाबत निवेदन संघटनेने दिले होते.
संचालकांनी त्यावर उत्तर देणारे परिपत्रक वाचले असता संचालनालय स्तरावरून सन 2021 22 चे अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित केलेल्या रकमेपैकी कमी रक्कम संचालनालयाला प्राप्त झालेली आहे असे उत्तर देण्यात आलेले आहे.
आर्थिक वर्ष 2022 23 या वार्षिक वर्षातील माही मार्च 2022 ते डिसेंबर 2022 महिन्याचे सर्व शिक्षकांचे वेतन करण्यासाठी संचालक स्तरावर मूळ मंजूर तरतुदीच्या फक्त 85 टक्के अनुदान प्राप्त झाले आहे सदर अनुदान जिल्हा परिषद सर्व यांना संचालक स्तरावरून वितरित केले आहे. संचालक स्तरावरून सदर तरतुदी मधून जिल्हा परिषद शिक्षकांचे फक्त नियमित वेतन अदा करण्याबाबत निर्देश दिले होते परंतु काही जिल्हा परिषदांनी सातव्या वेतन आयोगात चा पहिला व दुसरा हप्ता सनग्रीम वैद्यकीय देव के थकीत देव के इतर बाबी वर खर्च केलेला असल्याने शिक्षकांच्या नियमित वेतनासाठी तरतूद कमी पडत आहे ज्या जिल्हा परिषदांना नियमित वेतनाशिवाय इतर देयके अदा केलेली आहेत त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही सुरू आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी जेवढ्या तरतुदीची आवश्यकता आहे तसेच शिक्षकांचा तिसरा हप्ता अदा करण्यासाठी जेवढ्या तरतुदीची आवश्यकता आहे ती तरतूद व वैद्यकीय व इतर थकीत देयके अदा करण्यासाठी आवश्यक तरतूद यासाठी संचालनालय स्तरावरून पुरवणी मागणी प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे असा संचालकांच्या पत्रात उल्लेख आहे.
शासन स्तरावरून पुरवणी मागणी प्रस्ताव नुसार तरतूद मंजूर झालेली असल्याचे देखील संचालकांनी म्हटले आहे.
त्यामुळे मंजूर तरतुदीतून शिल्लक असलेली व पुरवणी मागणी द्वारे मंजूर 100% रक्कम संचालनालयाला प्राप्त झाल्यास माही फेब्रुवारी 2023 पर्यंतचे वेतन पदा करण्यासाठी प्राप्त तरतूद जिल्हा परिषद त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगून धरणे आंदोलन स्थगित करण्यात यावे अशी सूचना संचालकांनी केली आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments