जिल्हांतर्गत बदल्या संदर्भात विन्सेस कंपनीतील कॉर्डिनेटर यांच्याशी फोनवरून झालेली चर्चा.

 जिल्हांतर्गत बदल्या संदर्भात विन्सेस कंपनीतील कॉर्डिनेटर यांच्याशी फोनवरून झालेली चर्चा.


जिल्हांतर्गत बदल्या संदर्भात थोडेसे....

    विन्सेस कंपनीतील कॉर्डिनेटर यांच्याशी फोनवरून रविवार दिनांक - 22 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजता झाली चर्चा.  





१) संवर्ग चार मध्ये बदली पात्र असणाऱ्या सर्व शिक्षकांच्या शाळा तसेच निव्वळ रिक्त असणाऱ्या सर्व जागा बदली पात्र शिक्षकांना दाखविल्या जाणार.


२) बदली पात्र शिक्षक ज्या शाळेमध्ये कार्यरत असेल ती शाळा त्याच शिक्षकांना दिसणार नाही किंवा मागता येणार नाही.


३) बदली पात्र असणाऱ्या सर्वच शिक्षकांच्या शाळा सर्वच बदली पात्र शिक्षकांना दाखवल्या जाणार. शाळा निवडताना सीनियर ज्युनियर असा विषय असणार नाही. कोणताही शिक्षक कोणतीही शाळा मागू शकणार. 


४) बदली पात्र असणाऱ्या शिक्षकांना पोर्टलवर दिसणाऱ्या कोणत्याही शाळा निवडता येणार.


५) ज्या बदली पात्र शिक्षकांना संवर्ग एक दोन व तीन मधून खो मिळाला असेल त्या शिक्षकांनी विनंती बदलीचा अर्ज भरणे आवश्यक. 


६) बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या सीनेरीटीनुसारच होणार. विनंती बदल्या पहिल्यांदा व प्रशासकीय नंतर असे काही होणार नाही. 


७) संवर्ग चार च्या बदल्या होत असताना विनंती बदली  मागणाऱ्या शिक्षकांची शंभर टक्के बदली होणार किंवा ज्या शिक्षकांना खो बसला आहे त्या शिक्षकांना विनंती बदलीचाच अर्ज भरावा लागणार. 


८) विनंती बदली अर्ज करूनही नोंदविलेल्या शाळा मिळाल्या नाहीत तर सदर शिक्षक विस्थापित होणार व पुन्हा त्यांना टप्पा क्रमांक पाच मधील संवर्ग चारच्या बदल्या झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या शाळा दाखवून नव्याने  पुन्हा विस्थापित राऊंड मधून अर्ज भरण्यास संधी दिली जाणार. 


९) ज्या शिक्षकांना  संवर्ग एक दोन व तीन मधील शिक्षकांकडून खो मिळाला नाही अशा शिक्षकांनी विनंतीनुसार बदली मागितली तर मागितलेल्या शाळांमधील शाळा सीनेरीटीनुसार उपलब्ध असतील तर मिळणार अन्यथा ते शिक्षक विस्थापित होणार. 


१०) ज्या शिक्षकांना संवर्ग एक दोन तीन मधून खो मिळाला नाही व त्यांनी  मला बदली नको आहे पण प्रशासकीय बदली झाली तर खालील शाळांवर बदली मिळावी असा अर्ज केला असेल  आणि कोणी खो दिला तर सिनेरीटीनुसार सदर शाळा  उपलब्ध असतील तर बदली होईल. उपलब्ध नसतील तर सदर शिक्षक विस्थापित होणार. 


११) बदली हवी आहे व बदली नको आहे यामधून  कोणी खो दिला आणि भरलेल्या शाळा जर मिळाल्या नाहीत आणि सदर शिक्षक विस्थापित झाले तर त्यांना विस्थापित शिक्षकांच्या स्वतंत्र राउंड मधून पुन्हा बदलीसाठी फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध होणार. त्या राऊंडमध्ये बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागा सुद्धा दाखवल्या जाणार.


१२) सदर विस्थापित राऊंडमध्ये पुन्हा बदली हवी आहे काय किंवा नको आहे काय असे दोन ऑप्शन असणार. टप्पा क्रमांक पाच मधील बदल्यात ज्यांना खो मिळाला आहे  त्यांनी बदली हवी आहे असे विनंती बदलीने शाळा मागितल्या तर नोंदविलेल्या शाळा सिनॅरिटीने बदली प्रक्रिया राबवून दिल्या जाणार जर मागितलेल्या शाळा मिळाल्या नाहीत अशावेळी मागितलेल्या शाळाव्यतिरिक्त इतर शाळा रिक्त असतील तर अशा शिक्षकांना सिनेरिटी नुसार इतर कोणतीही रिक्त असणारी शाळा दिली जाणार.


१३) बदली पात्र शिक्षकांना संवर्ग एक दोन व तीन मधील कोणत्याही शिक्षकांनी खो दिला नाही त्यामुळे संवर्ग चार मधील बदली पात्र शिक्षकांनी या पाचव्या राऊंडमध्ये मला बदली नको आहे पण प्रशासकीय बदली झाली तर खालील शाळा मिळाव्यात असा अर्ज भरला असेल  आणि याही पाचव्या राऊंड मध्ये त्यांना कोणी खो दिला नाही व अवघड क्षेत्रातील शाळाही रिक्त राहिल्या नाहीत तर  त्या शिक्षकांची त्या शाळेतून बदली होणार नाही. पण अवघड क्षेत्रातील शाळा रिक्त असतील तर आशा शिक्षकांमधून उपलब्ध रिक्त जागे एवढे शिक्षक सिनॅरिटीने अवघड क्षेत्रातील शाळेत बदलीने नियुक्त केले जाणार.सदर शिक्षकांपर्यंत सिनेरीटीनुसार नंबर आला नाही तर ते शिक्षक त्याच शाळेमध्ये राहणार. 


१४) संवर्ग चार मधून  अर्ज भरताना मला बदली नको आहे पण प्रशासकीय बदली मधून बदली झाली तर खालील शाळा मिळाव्यात असे अर्ज करणाऱ्या शिक्षकांना  बदली पात्र शिक्षकांच्या टप्पा क्रमांक पाच मधून बदली पात्र कोणत्याही शिक्षकाकडून खो मिळाला तर पुन्हा विस्थापित राऊंड मधून त्यांना संधी दिली जाणार. विस्थापित राऊंडमध्ये अशा शिक्षकांना कंपल्सरी विनंती बदलीचाच अर्ज करावा लागणार अशा विस्थापित राऊंड मधून त्यांनी मागितलेल्या शाळा मिळाल्या नाहीत तर रिक्त असणाऱ्या कोणत्याही शाळेवर त्यांची बदली केली जाणार.


१५) एकंदरीत या बदली प्रक्रियेत मी सीनियर आहे मला कोणी खो देऊ शकत नाही असे कोणी म्हणायचे कारण नाही. बदली पात्र असणारे सीनियर किंवा ज्युनियर शिक्षक हे प्रत्येक जण बदली प्रक्रियेतून जाणार आहेत. 


१६) अपवादात्मक परिस्थितीमध्येच एखाद्या बदली पात्र शिक्षकाला संवर्ग एक दोन तीन व चारच्या बदल्या होताना किंवा विस्थापितांचा राऊंड होताना  प्रत्येक राऊंडमध्ये प्रशासकीय बदलीचा अर्ज भरला आहे आणि अशा शिक्षकाला कोणत्याही राऊंडमध्ये खो मिळालाच नाही व  अवघड क्षेत्रातील शाळेमधील जागाही पूर्ण भरल्या आहेत असे असेल तरच सदर शिक्षक आहे त्याच शाळेवर राहणार.


१७) अशाप्रकारे संवर्ग चार मधील शिक्षकांच्या बदल्या व विस्थापित राऊंड मधील शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा झाली. 


१८) सदर शिक्षकांना कधी कार्यमुक्त करणार या संदर्भात अद्याप धोरणात्मक निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले. 


🔹✌️2023 मधील होणाऱ्या यावर्षीच्या नवीन बदल्या संदर्भात ही केली चर्चा व काही प्रश्नही मांडले✌️🔹


👉 ही बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर पुन्हा यावर्षीच्या बदल्यांची प्रक्रिया फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 


👉 ज्या शाळा मागील वर्षी अवघड क्षेत्रात होत्या आता त्या सर्वसाधारण क्षेत्रात आहेत अशा शाळेतील शिक्षकांची करंट एरिया जॉइनिंग डेट ही येणाऱ्या बदली प्रक्रियेत ज्या दिवशी सदर शाळा अवघड क्षेत्रातून काढून सर्वसाधारण क्षेत्रात घातली त्या दिवशीपासून नोंदविले जाणार. असे झाल्यामुळे सदर शिक्षकाचा एरिया बदलल्यामुळे पुन्हा त्याच शाळेत सदर शिक्षकाला दहा वर्ष सेवा करावी लागणार. एखाद्या शिक्षकाला त्या शाळेत राहायचं नसेल त्याच्यासाठी ती शाळा गैरसोयीची असेल तर अशा शिक्षकाला हा नियम शिथिल करून त्याला विनंती बदलीची संधी देण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली. या मुद्द्यावर सकारात्मकता दाखवली गेली असून लवकरच चर्चा करून धोरणात्मक निर्णयावर सन्माननीय मंत्री महोदय व  कमिटी समोर चर्चा होऊन ठरवले जाईल असे सांगण्यात आले. 


👉वरील सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा  होऊन विन्सेस कंपनीच्या कॉर्डिनेटर यांच्या कडून माहिती देण्यात आली. बदली प्रक्रिये संदर्भात निर्माण झालेल्या काही शंका विचारण्यात आल्या त्या शंकांचे निरसन केले गेले.

               सध्या ग्रुप वर फिरत असणारे आठ पानाचे लेखी  मार्गदर्शक सूचनांचे पत्र याविषयी चर्चा झाली.असे सूचनांचे कोणतेही लेखी पत्र आम्ही काढले नाही असे विन्सेस कंपनीकडून सांगण्यात आले. निर्माण होणारे प्रश्न व त्यावर मार्गदर्शन मिळणाऱ्या लेखी सूचना देण्यात याव्यात अशी शिक्षक संघाच्या वतीने मागणी करण्यात आली.


  


           

🔹 टीप - हे फोनवरून झालेले संभाषण असून हे अधिकृत न मानता बदली संदर्भात जिल्हास्तरावरील नोडल अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी अधिकृत सूचना दिल्या जातील त्या ग्राह्यधराव्यात. 



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.