राज्यातील शाळांची पटपडताळणी साठी ऑनलाइन नोंदणी लिंक स्टेप बाय स्टेप सूचना..

महाराष्ट्र शाळा पटपडताळणी आणि स्टुडंट पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 🏫📚

नमस्कार शिक्षक आणि अधिकारी महोदयांनो, 🙏

महाराष्ट्र राज्यातील शाळांची पटपडताळणी ११ एप्रिल, १६ एप्रिल आणि २२ एप्रिल रोजी होणार आहे. या पटपडताळणीनंतर ऑनलाइन नोंदणी कशी करावी, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

१. लॉगिन प्रक्रिया 

सर्वात आधी

https://www.education.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जा.

'विद्यार्थी पोर्टल' (Student Portal) वर क्लिक करा.

तुम्ही HM, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी (BEO) किंवा शिक्षणाधिकारी (EO) यांपैकी कोणत्याही एका लॉगिन आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन करू शकता.

२. भेट दिलेल्या शाळेची माहिती भरणे (Step 1)

'Attendance' टॅबवर जाऊन 'Mark Student Attendance' वर क्लिक करा.

ज्या शाळेला भेट दिली तिचा U-DISE कोड टाका.

तुमचे पद (Designation), नाव, भेटीचा दिनांक निवडा आणि 'Save & Continue' करा.

३. वर्गांनुसार हजेरी नोंदवणे (Step 2 & 3) ✍️

शैक्षणिक वर्ष, वर्ग आणि तुकडी निवडून 'Load Students' वर क्लिक करा.

विद्यार्थ्यांची यादी समोर येईल. जो विद्यार्थी हजर आहे त्याला 'Present' आणि जो गैरहजर आहे त्याला 'Absent' मार्क करा.

प्रत्येक वर्गासाठी 'Submit Attendance' करणे अनिवार्य आहे.

४. अटेंडन्स कार्ड आणि पडताळणी (Step 4) 📋

सर्व वर्गांची माहिती भरल्यानंतर 'View/Print Attendance Card' वर क्लिक करून माहिती तपासा.

यानंतर विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो अपलोड करावा लागेल.

⚠️ महत्त्वाची टीप: फोटो 'जिओ टॅगिंग' (Geo-tagging) असलेला असावा. यासाठी 'Time Stamp Camera' ॲप वापरा, ज्यावर लोकेशन, तारीख आणि वेळ येईल.

सर्व फोटो एकत्र करून एक PDF फाईल (१०० MB पेक्षा कमी) तयार करा आणि ती पोर्टलवर अपलोड करा.

*५. ओटीपी व्हेरिफिकेशन आणि माहिती लॉक करणे (Step 5)📲

स्वतःचा मोबाईल नंबर टाकून 'Send OTP' वर क्लिक करा.

प्राप्त झालेला OTP टाकून 'Verify OTP' करा.

शेवटी 'Refresh & Go' वर क्लिक करा. एकदा माहिती LOCK झाली की ती पुन्हा बदलता येणार नाही, याची नोंद घ्यावी .

काही महत्त्वाच्या टिप्स: ✅

फोटो घेताना प्रत्येक वर्गाचा स्वतंत्र फोटो असावा.

सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच डेटा लॉक करा.


राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य कार्यालयातून दि १०/०४/२०२६ रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आला आहे. 

क्र-आशिका/आस्था-अ/वनामती/१०१/२०२६/१८४१४२८

दिनांक:- स्वाक्षरीखाली नमुद आहे.

प्रति,

सर्व परिविक्षाधीन शिक्षणाधिकारी/उपशिक्षणाधिकारी (सीपीटीपी १०)

विषय:- राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत..

संदर्भ:- १) मा. शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचे पत्र क्र. शिसंमा/टि-८ब/ २०२५-२६/१८२०१२९ दि. ३१.०३.२०२६

उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन पत्रान्वये राज्यातील सर्व शाळांमधील पटपडताळणी दिनांक ११/०४/२०२६, दिनांक १५/०४/२०२६ व दिनांक २२/०४/२०२६ या तीन दिवशी करण्याच्या अनुषंगाने इयत्ता ९ वी चे मराठी, गणित व इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा अनुक्रमे दि. ११ एप्रिल २०२६, १५ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य, योजना), लेखाधिकारी, अधीक्षक (शालेय पोषण आहार), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) चे अधिव्याख्याता वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक चे अधीक्षक व विस्तार अधिकारी संवर्ग इ. यांची नेमणूक शाळेस भेट देणारे पथक करून शाळेस प्रत्यक्ष भेट देवून पटपडताळणी करण्यासाठी नेमणूक करणेबाबत कळविण्यात आले आहे.

त्यानुसार सोबत दिलेल्या नियोजनानुसार आपणास देण्यात आलेल्या जिल्हयातील पटपडताळणी संदर्भात सुरू असणा-या कामाकाजाचा आढावा घेण्यासाठी/सदर कामकाज सुरू असताना संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना तांत्रिक अडचण आल्यास त्यासंदर्भात राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी आपली नेमणूक करण्यात येत आहे. संबंधित सर्व अधिकारी यांनी आपणास नेमूण देण्यात आलेल्या जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक/ शिक्षण निरीक्षक तसेच संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याशी संपर्क साधवा. संबंधित अधिका-यांची यादी सोबत जोडण्यात येत आहे. सबब सदर ३ दिवस आपले प्रशिक्षणाचे कामकाजासोबत उपरोक्त नमूद कामकाज बिनचूकपणे करण्यात यावे.

सोबत- यादी

Digitally signed by Harun Ismail Atar Date: 10-04-2026 19:04:45

 (हरून आतार)

शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन)


प्रती-

१. मा. संचालक सर्व

२. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक

३. सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक/योजना जिल्हा परिषद


महाराष्ट्र शासन

शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉअॅनी. बेझंट मार्ग, पुणे ४११००१

दूरध्वनी क्रमांक: 020-26121394/96

ईमेल: doesecondary1@gmail.com/doehighersec@gmail.com

क्र. शिसंमा/टि-८व/२०२५-२६/1830202

दिनांक: 06 APR 2026

प्रति, विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर) बृहन्मुंबई

विषयः - राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत.

संदर्भ:- १. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासनपत्र क्रमांकः लवेसु-१२२५/प्र.क्र.१०/२५/एसएम.३. दिनांक ०३.११.२०२५

२. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/टि-८ब/२०२५-२६/१८२०१२९, दिनांक ३१.०३.२०२६.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याबाबत संदर्भ क्र.२ अन्वये सूचना देण्यात आल्या होत्या. संदर्भ क्र.२ अन्वये इ. २ री ते इ.९ व इ. ११ वी या वर्गाची पटपडताळणी ११ एप्रिल २०२६, १५ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२६ रोजी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

इयत्ता १ ली बाबतची पटपडताळणी ही उपरोक्त तारखांच्या दिवशीच (११ एप्रिल २०२६, १५ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२६) करण्याचे नियोजन करावे.

सदर पटपडताळणी करण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या इतर विभागातील अधिकारी / कर्मचारी यांची सेवा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) यांच्या माध्यमातून उपलब्ध करुन घ्यावी.


Digitally signed by

SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 06-04-2026 19:21:06

(शरद गोसावी) 

शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे


Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 06-04-2026 18:20:45 (डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रतः- १. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

- विषयांकित प्रकरणी आपल्या कडील इतर विभागातील कार्यरत अधिकरी / कर्मचाऱ्यांच्या सेवा उपरोक्त नमूद कालावधीत पटपडताळणी करणेकामी उपलब्ध करुन देण्यात याव्यात ही नम्र विनंती.


राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी संयुक्तपणे काढलेल्या दिनांक 31 मार्च 2026 रोजीच्या आदेशानुसार पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


प्रति, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद (सर्व) 

विभागीय शिक्षण उपसंचालक

विषयः राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत.

संदर्भ:- शालय शिक्षण व किता विभाग, शासनपत्र क्रमांक: लवेतु-१२२०५/प्र.क्र.१०/२४/एसएम. ३, दिनांक 03,49,7024

उपरोक्त विषयाच्या अनुषगाने राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याबाबत खालील प्रमाणे सूचना देण्यात येत

५. इयत्ता १० वी इयत्ता १२ वी विद्याध्यांची पटपडाळणी करण्याची आवश्यकता नाही. वोडांच्या परीक्षेमधील विद्यार्थी उपस्थिती ही ग्राह्य धरणयात येईल,

२. शैक्षणिक सत्र २०२५-२६ माइमा ११ वी मधील विद्याथ्यांच्या वार्षिक परीक्षेतील मराठी, इंग्रजी आणि भौतिकशास या विषयाच्या दिवशी पटपडताळणी करण्यात यावी.

३. इयत्ता २ री इयत्ता ८वीयानामतीन राज्य क्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मूलकनी PAT) परीक्षेच्या दिनांकादिवशी म्हणजेच ११/०४/२०२६. १५/०४/२०२६,२२/५/२० रोजी करणयात यावी. 

४.इयतादीतील पटपडताळणी उपरोक्त तारखांच्या (११/०४/२०२६, १५/०४/२०२६,२२/०१/२०२० दिवशी करणे नियोजित आहे.

५. राज्यातील नर्वशी पटपडताळणी दिनांक ११/०४/२०२६, दिनांक १५/०४/२०२६ व दिनांक २२/०४/२०२६ या तीन दिवशी करण्याच्या अनुषंगाने इयत्ता ९ वी से मराठी, गणित व इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा अनुक्रम दि. ११ एप्रिल २०२६, ११ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२६, रोजी आयोजित करण्यात यावी. 

६. सरोग इयत्ता ११ दीच्या बाबतीत मराठी, भौतिकभाव व इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षासुध्दा अनुक्रमे दि.११ एप्रिल २०२६, १५ एविल २०२१, २२ एप्रिल २०२६, रोली आयोजित करण्यात यावेत. जेणेकरुन राज्यातील सर्व शाळांनी इतर में नेहमी पटपडताळणी उपरीका तीन दिवशी पुर्ण होईल,

३. राज्यातील शाळांनी पप करने अनुमाइंट पोर्टलवर HM Logn, Cluster Head Logn, BEO Logn EDL वर सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पटपडताळणीच्या अनुषंगाने शाळेस पेट देणारे पथक उपरोक्त लॉगीनचा वापर करुन हजार व गैरहजार विद्यार्थ्यांची नोंद करतील. या सुविधेबाबत सविस्तर माहीती / सूबना आपणास ७ एप्रिल २०२६ रोजी किंवा तत्पूर्वी कळविण्यात येईल.

८. राज्यातील शाळांची पटपडताक्षणी करण्यासाठी पुरेसे मनुष्य आवश्यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्र प्रमुख, गट दिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ/पाध्य योजना), लेखाधिकारी, अधीक्षक (शालेय पोषण आहार, जिल्ला शिक्षण व प्रशिक्षण संस्था (1) अधियाख्याता वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक चे अधीक्षक व विस्तार अधिकारी संवर्ग इ. ग्रांची नेमणूक शाळेस भेट देणारे पथक म्हणून करावी व शाळेस प्रत्यक्ष भेट देवून पटपडताक्षणी करण्यासाठी नेमणूक करण्यात यावी,

९. शिक्षणाधिकारी (माध्य/ प्राथ यांनी शाळा निहाय पटपडताळणीचे नियोजन आपल्या पातळीवरुन एकत्रितपणे करावे. अंगलबजावणी प्रभावीपणे होईल याकडे लक्ष द्यावे.


Digitally signed by

SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 31-03-2026 13:27:16

(शरद गोसावी) शिक्षण संचालक

प्रायनिक शिक्षण संचालनालय, पुणे


Digitally signed by

PALKAR MAHESH MADHUKAR Date: 30-03-2026 20:25:54

(डॉ. महेश पालकर) 

शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक


संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा

Download

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.