संवर्ग तीन बदली अपडेट :- 30 ऑप्शन भरावीच लागतील काय? यासंदर्भात मा. आयुष प्रसाद यांची भेट.

संवर्ग तीन बदली अपडेट :- 30 ऑप्शन भरावीच लागतील काय? यासंदर्भात मा. आयुष प्रसाद यांची भेट.



 

सर्व संवर्ग 3 च्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना कळविण्यात येते की,आपल्या शिक्षक संघ बदली मदत  केंद्राचे मार्गदर्शक  पुणे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब मारणे यांनी पुणे जिल्हा बदली नियंत्रण कक्ष चे को-ओरडीनेटर श्री.मुकुंद देडगे साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आयुष प्रसाद साहेब यांच्याशी संवर्ग 3 चे बदली अर्ज भरताना ३० शाळाच भरल्या तरच फॉर्म सबमिट होत आहे.कमी शाळा भरल्यातर फॉर्म सबमिट होत नाही ह्या समस्या वर सविस्तर चर्चा केली असता त्यांनी संवर्ग ३ मधील शिक्षकांना ३० शाळा भरणे गरजेचे नाही.संवर्ग १ आणि संवर्ग २ प्रमाणेच ३० पेक्षा कमी शाळा भरता येतील आणि फॉर्म सेव्ह होऊन सबमिट सुद्धा होईल.याची सूचना बदली पोर्टल ला कळविली जाईल आणि उद्या दुपारपर्यंत ही समस्या दूर करून बदली फॉर्म भरण्याची सुविधा चालू केली जाईल असे सांगितले आहे. तरी बदली अर्ज भरणाऱ्या संवर्ग ३ च्या शिक्षकांनी कृपया उद्या पर्यंत थोडी वाट पहावी     

शिक्षकसंघ बदली मदत केंद्र, बारामती.


 संवर्ग 3 मधील शिक्षक बंधू - भगिणीवर झालेल्या अन्यायाविरूद्ध दाद मागण्यासाठी आम्ही मावळातील सर्व मावळे व मावळच्या रणरागिणींनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.आयुष प्रसाद साहेब यांची भेट घेतली.भेटीत त्यांनी आमचे खालील बाबतीत शंकांचे निरसन केले.


➡️ संवर्ग 3 मधील शिक्षकांना  30 शाळा भरणे गरजेचे नाही ..संवर्ग 1 व 2 प्रमाणेच 30 पेक्षा कमी शाळा भरता येतील. व फार्म save होईल. याची सूचना बदली पोर्टल ला कळवली जाईल.


➡️ संवर्ग 3 साठी या वर्षी ज्या शाळा दुर्गम आहेत त्या शाळा पुढील वर्षी म्हणजे येत्या 1 मार्च पासून बदली होण्यासाठी ग्राह्य धरणार..थोडक्यात आजअखेरच्या म्हणजेच पूर्वीच्या 2018 साली ज्या शाळा दुर्गम होत्या .त्या शाळा दुर्गमच राहणार


➡️ या वर्षी होणाऱ्या बदल्यात संवर्ग 1,2,3,4 बदल्या झाल्यानंतर 5 वा स्पेशल बदली राउंड घेणार ..ज्यांना मनासारख्या शाळा मिळणार नाहीत त्या सर्व संवर्गांना म्हणजे 5 व्या राउंडला सर्वांनी बदलीसाठी ( सर्व संवर्गाचा एकच संवर्ग करून ) रिक्त जागा दाखवणार.


➡️ यासर्व विषयावर कँबीनेट मिटिंगमध्ये चर्चा झाली आहे , त्यामुळे कोणत्याही संवर्गावर अन्याय होणार नाही.


 ताजा कलम 

या मिटिंगनंतर समाजशास्र पदवीधर बांधवांचा बदलीसाठी भेडसावणा-या  प्रश्नावरही चर्चा करण्यात आली.

त्यावर त्यांनी पुढील माहिती दिली.


➡️ अगोदर मुख्याध्यापक प्रमोशन करणार आणि समाजशास्र शिक्षक बंधू भगिणींचा प्रश्न,सोडविला जाईल.कोणीही काळजी करू नये .कोणावरही अन्याय होणार नाही ..



आमच्या सर्वांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मावळातील जे बंधू - भगिणी CEO साहेबांना भेटण्यासाठी आले होते.त्यांचे मनापासून आभार..


➡️ ज्यांना या बाबत काही शंका असल्यास मा. CEO साहेबांचे आजच्या  मिटिंगचे सर्व Audio रेकाँर्ड उपलब्ध आहे....कोणावरही विश्वास ठेऊ नये..ही नम्र विनंती कळावे 

              आपला 

    आण्णासाहेब ओहोळ


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

2 Comments

  1. पाचव्या राऊंडला समानीकरनाची पदे दाखवणार आहेत का

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.