शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा प्रजासत्ताक दिनी होणार पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणगौरव.

 शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा प्रजासत्ताक दिनी होणार पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणगौरव.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी च्या परिपत्रकानुसार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी जुलै 2022 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी मध्ये स्पृहणीय संपादन करून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा सत्कार समारंभ दिनांक 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर अथवा त्याच दिवशी स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित करून संबंधित जिल्ह्याच्या माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते करावा तसेच सदर सत्कार समारंभाची सर्व व्यवस्थापना संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी करावी असे शासन निर्णयात नमूद आहे.

तथापि सदर परीक्षेचे आयोजन उशिरा झाल्याने सदर गुणगौरव कार्यक्रम दिनांक 15 ऑगस्ट रोजी करता आलेला नाही परंतु विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमापासून वंचित राहू नये याकरिता सदर गुणगौरव कार्यक्रम दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी ध्वजारोहणानंतर अथवा त्याच दिवशी स्वतंत्रपणे आयोजित करता यावा याकरिता शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी जुलै 2022 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी पर्यंत शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्यातील राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्याच्या दृष्टीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना परीक्षा परिषदेच्या आयुक्त माननीय शैलजा दराडे यांनी सदर पत्रानुसार सूचित केले आहे.
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.