जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत अखेर संवर्ग ३ ला मिळणार न्याय.....!

 जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत अखेर संवर्ग ३ ला मिळणार न्याय.....!





महेश ठाकरे 

राज्याध्यक्ष 

प्रहार शिक्षक संघटना,महाराष्ट्र

यांनी दिलेल्या माहितीनुसार.. 



जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया २०२२-२३ अंतर्गत बदली संवर्ग ३ बाबत न्याय कार्यवाही करिता नुकतीच सविस्तर चर्चा प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने ग्रामविकास उपसचिव मा.श्री.दे.लोंढे साहेब व बदली अभ्यास गट अध्यक्ष मा.आयुष प्रसाद साहेब यांचेशी पार पडली आहे .या चर्चेचा सविस्तर वस्तुनिष्ठ वृत्तान्त या ठिकाणी महितीस्तव देण्यात येत आहे.


जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिये मधील संवर्ग ३ मधील शिक्षकांना म्हणजेच अवघड मधील बदली अधिकार प्राप्त शिक्षक बांधवांना बदलीपात्र सह संवर्ग १ व २ मधील बदलीने रिक्त झालेली व निव्वळ रिक्त पदे उपलब्ध करून देण्याबाबत ची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.अन्यथा ते शिक्षक बदली पासून वंचित राहतील .आणि तो त्या शिक्षकांवरील अन्याय असेल .यावर तत्काळ पर्यायी व्यवस्था अथवा काही तरतूद होऊ शकते का याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.याबाबत चर्चे प्रसंगी मा.आयुष प्रसाद साहेबांनी संवर्ग १ व २ मधून रिक्त झालेली पदे दिल्यास ती खो - खो प्रक्रिया होईल , खो प्रक्रिया टाळण्यासाठी व संवर्ग ४ मधील मोठ्या संख्येने असलेल्या शिक्षकांना न्याय देण्यासाठीच शासन निर्णयात हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले .मात्र यामुळे संवर्ग ३ वर अन्याय होत असून काही जिल्ह्यांमध्ये संवर्ग ३ करिता अगदी बोटावर मोजण्याइतकेच बदलीपात्र जागा आहेत.अमरावती जिल्ह्यात तर १ बदलीपात्र आणि १०७७ बदली अधिकार प्राप्त आहेत.अश्या परिस्थिती मध्ये ज्यांना खरी गरज आहे अश्या अवघड क्षेत्रातील शिक्षकच बदली पासून वंचित राहतील .तेंव्हा किमान अश्या जिल्ह्यांचा तरी विचार करून त्यांना बदली प्रक्रियेत न्याय देण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.


अखेर प्रहार च्या मागणीची दखल घेत अमरावती सह अश्या सात ते आठ जिल्ह्यांना संवर्ग ३ मध्ये रिक्त पदे अथवा इतर काही पर्यायी व्यवस्था पोर्टल वर उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच ग्रामविकास शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही यावेळी संघटनेला देण्यात आली आहे.


तेंव्हा लवकरच अमरावतीसह ज्या जिल्ह्यात अतिशय कमी बदलीपात्र पदे संवर्ग ३ करिता उपलब्ध आहेत अश्या सात ते आठ जिल्ह्यांतील संवर्ग ३ मधील शिक्षकांना अखेर  न्याय मिळणार आहे.याबाबत लवकरच शासन स्तरावरून कळविण्यात येणार आहे.या जिल्ह्यामध्ये अमरावती , गडचिरोली , चंद्रपूर ,नंदुरबार , पुणे , सातारा , नाशिक , पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे .(यासह गोंदिया , नांदेड व ठाणे या जिल्ह्यांचा सुध्दा समावेश होऊ शकतो.) 


पुढील बदली प्रक्रियेत म्हणजेच २०२३-२४ ची बदली प्रक्रिया या प्रक्रिये नंतर मात्र योग्य तो बदल करुनच सुरू करण्यात येणार आहे.यात संघटनेने यापूर्वी सुचविलेल्या मुद्द्यांचा समावेश करण्यात येणार असल्याची ग्वाही सुध्दा यावेळी देण्यात आलेली आहे.


जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत बदली झालेल्या शिक्षकांना प्रक्रिये नंतर कार्यमुक्त करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आलेली आहे .यावर लवकरच शासन स्तरावरून निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले .




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏









Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.