अत्यंत महत्त्वाचे बदली अपडेट - जिल्हा अंतर्गत बदली करता प्रकाशित करण्यात आलेल्या याद्यांवर अपील दाखल करणे बाबत शिक्षणाधिकारी यांचे आदेश

अत्यंत महत्त्वाचे बदली अपडेट - जिल्हा अंतर्गत बदली करता प्रकाशित करण्यात आलेल्या याद्यांवर अपील दाखल करणे बाबत शिक्षणाधिकारी यांचे आदेश.


शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांनी दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित केलेले आहे आदेशानुसार जिल्हा अंतर्गत बदली करिता प्रकाशित करण्यात आलेल्या याद्यांवर अपील दाखल करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.

जिल्हा अंतर्गत बदली करिता बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त याद्या पुन्हा प्रकाशित तसेच विशेष संवर्ग एक व दोन याद्या या कार्यालयाकडून दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी प्रकाशित करण्यात आलेले आहे सदर यादीवर शिक्षकांना काही आक्षेप असल्यास त्यांचे ऑनलाइन बदली प्रणाली मधील लॉगिन वरून अपील करण्याची सुविधा दिनांक 30 नोव्हेंबर 2022 ते 3 डिसेंबर 2022 पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. दिनांक 3 डिसेंबर 2022 नंतर कुठल्याही परिस्थितीत कपिल करता येणार नाही त्या अनुषंगाने आपल्या पंचायत समिती अंतर्गत सर्व शिक्षकांना आपल्या स्तरावरून अवगत करण्यात यावे.

ज्या शिक्षकावर ज्याबाबतीत अपील करावयाची आहे त्यासंबंधी सर्व कागदपत्रे आवश्यक आहे अपील निकाली काढताना जर कागदपत्र अथवा पुराव्या अभावी अपील खाडीज किंवा मागे घ्यावी लागल्यास अपील करणाऱ्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल.

ज्या शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे त्या अपील निकाली काढण्याकरिता या स्तरावरून अवधी लागणार असल्यामुळे संबंधिताने दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा येथे आवश्यकता कागदपत्र किंवा पुराव्यासह कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणे बाबत गटशिक्षणाधिकारी स्तरावरून अवगत करणे बाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी निर्देश दिले आहेत.



 

वरील शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.