या कर्मचाऱ्यांना मिळणार दिनांक 1 डिसेंबर 2022 ते 10 डिसेंबर 2022 पर्यंत 10 दिवसाच्या विशेष नैमित्तिक रजा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश.
जिल्हा परिषद बुलढाणा च्या सामान्य प्रशासन विभागा च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अलिबाग येथे आयोजित राज्यस्तरीय दिव्यांग स्नेहसंमेलन व दिव्यांग कार्यशाळा यामध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक १ डिसेंबर 2022 ते 10 डिसेंबर 2022 या 10 दिवसांची विशेष किरकोळ रजा मंजूर करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग अधिकारी व कर्मचारी संघटना यांचे वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अलिबाग जिल्हा रायगड येथे राज्यस्तरीय दिव्यांग स्नेहसंमेलन व दिव्यांग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले असल्याने सदर कार्यशाळेत दिव्यांग कर्मचारी यांना उपस्थित राहण्यासाठी दिनांक एक डिसेंबर 2022 ते 10 डिसेंबर 2022 या कालावधीत विशेष किरकोळ रजा मंजूर करणेबाबत कळविले आहे. शासन परिपत्रक दिनांक 11 जुलै 2008 नुसार राज्यस्तरीय अपंग विषयक अधिवेशन संमेलन प्रशिक्षण कार्यशाळा यासाठी उपस्थित राहण्याकरता एका वर्षात दहा दिवसांची विशेष किरकोळ जा दिनांक 14 नोव्हेंबर 2007 च्या परिपत्रकांमुळे मंजूर करणेबाबत तरतूद असल्याचे नमूद आहे.
त्यानुसार जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत आपले अधिनस्त दिव्यांग अधिकारी कर्मचारी जाण्यास इच्छुक असल्यास त्यांना उपरोक्त कालावधीसाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करणेबाबत नियमानुसार उचित कार्यवाही करण्यात यावी. तसेच अधिवेशनास उपस्थित राहणारे अधिकारी कर्मचारी यांनी
रुजू होतात अधिवेशनास उपस्थित राहिले बाबत उपस्थिती प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. संबंधित आस्थापना शाखेने असे उपस्थिती प्रमाणपत्र जतन करून ठेवावे.
असे निर्देश जिल्हा परिषद बुलढाणा च्या सर्व खातेप्रमुखांना, व सर्व पंचायत समिती च्या गटविकास अधिकाऱ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांनी दिले आहेत.
वरील आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments