मुख्याध्यापक प्रभार कुणाकडे द्यावा याबाबत पाच जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र

मुख्याध्यापक प्रभार कुणाकडे द्यावा याबाबत पाच जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र. 

दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी निर्गमित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांचे पत्रानुसार.. 

मुख्याध्यापकाचा पदभार सेवा जेष्ठ शिक्षकांकडे सोपविण्यात यावा तसेच पदभार स्वीकारण्यास नकार देणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात शिस्तभंग कार्यवाही करण्याची प्रस्तावित करावी.  असे निर्देश दिले आहेत. 



मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनी दिनांक 27 जून 2018 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार. 
शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी एकूण सेवा झालेल्या सेवा जेष्ठ शिक्षकांकडे पदभार देण्यात यावा.  शिवाजीचे शिक्षकांनी पदभार घेण्यास नकार दर्शविल्यास त्यांची महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम 1964 चे दोन मधील तरतुदीनुसार एक वार्षिक वेतन वाढ बंद करून प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश दिले आहे. 



शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांनी दिनांक 26 सप्टेंबर 2018 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सर्वसाधारणपणे शाळेवरील सेवा जेष्ठ शिक्षकाकडे देण्यात यावा मुख्याध्यापक पदाचा प्रभार देताना सेवा जेष्ठ महिला शिक्षिका असल्यास संबंधित शिक्षकेला प्रभार देण्यात यावा शाळेतील सेवा जेष्ठ शिक्षिकेने जर लेखी स्वरूपात प्रभार घेण्यास नकार दिला तर त्यानंतर च्या सेवाजेष्ठ शिक्षकांकडे शाळेचा प्रभार देण्यात यावा. 


मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांचे आठ जून 2018 चे पत्रानुसार ज्या केंद्रातील केंद्रप्रमुखांचे पद रिक्त आहे त्या केंद्राचा पदभार नजीकच्या केंद्राच्या केंद्रप्रमुख किंवा केंद्रातील सेवा जेष्ठ मुख्याध्यापक प्राथमिक पदवीधर शिक्षकास देण्यात यावा व केंद्राचे काम सुरू राहील याची दक्षता घ्यावी. 
तसेच ज्या शाळेत मुख्याध्यापक कार्यरत नाही त्या शाळांचा मुख्याध्यापकाचा पदभार जिल्हा सेवाजेष्ठ शिक्षकास देण्यात यावा.  असे निर्देश दिले आहेत. 




 मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांचे आदेशाचा संदर्भ देऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांचे दिनांक 16 मे 2016 चे पत्रानुसार मुख्याध्यापक पद कायमस्वरूपी अथवा सेवा जेष्ठतेनुसार पदभार देण्याबाबत श्री शकरोड पी सी, माध्यमिक शिक्षक यांच्याकडे प्रभारी मुख्याध्यापक या पदाचा अतिरिक्त पदभार अहरण व संवितरण सोपवण्यात आला होता. सबब जिल्हा परिषद धर्माबाद तालुका धर्माबाद येथील प्रभारी मुख्याध्यापक या पदाचा अतिरिक्त कार्यभार शाळेतील सेवाजेष्ठतेनुसार श्री कांबळे एन एच माध्यमिक शिक्षक यांच्याकडे अहरण व संवितरणासह सोपविण्यात येत आहे. असे निर्देश दिले आहेत. 





दिनांक 25 जानेवारी 2017 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद शाळेवरील मुख्याध्यापकाचा प्रभार सेवा जेष्ठ शिक्षकांकडे देण्यात यावा जर सेवा सेवा जेष्ठ शिक्षक मुख्याध्यापकाचा प्रभार योग्य करण्याशिवाय परभार घेण्यास नकार देत असेल तर संबंधिताविरुद्ध प्रचलित नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. असे निर्देश दिले आहेत..

 



वरील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व अमरावती विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे पत्रानुसार शाळेत मुख्याध्यापक कार्यरत नसल्यास, जिल्ह्याच्या सेवाजेष्ठतेनुसार शाळेवरील सेवाजेष्ठ शिक्षकांकडे शाळेचा मुख्याध्यापक पदाचा प्रभार सोपविण्यात यावा असे निर्देश आढळून येतात. 


बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.