शालेय पोषण आहार महत्त्वाचे अपडेट - दररोज नोंदवण्याची माहिती राहून गेलेली असल्यास अशी बॅक डेटेड माहिती भरण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध

 शालेय पोषण आहार महत्त्वाचे अपडेट - दररोज नोंदवण्याची माहिती राहून गेलेली असल्यास अशी बॅक डेटेड माहिती भरण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध. 

(Shaley-Poshan-Aahar-Update-back-dated-daily-Information-facility-Available-on-MDM-Portal-Maharashtra) प्राथमिक शिक्षण संचालनालयातील शालेय पोषण आहार कक्षाने दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत. 

उपरोक्त विषयांवर शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमार्फत दैनंदिन आहार घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या उपस्थितीची माहिती एमडीएम पोर्टलवर मोबाईल ॲप व वेबपोर्टल च्या माध्यमातून अद्यावत करण्यात येते. शाळांनी ऑनलाइन भरलेल्या माहितीच्या आधारे इंधन भाजीपाला तसेच धान्यदीमालांची देयके जनरेट करण्यात येऊन शाळांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येते. कोविड-19 साठीच्या प्राऊद दूर भावामुळे मागील दोन वर्षापासून शाळांचे ऑनलाईन उपस्थिती माहिती भरण्याचे काम बंद असणे तसेच दरम्यानच्या कालावधीमध्ये कोरड्या स्वरूपातील धान्य मालाचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आल्यामुळे ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्यात आलेली नाही. माही मार्च 2022 पासून शाळा स्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे तथापि अनेक शाळांचे ॲप अद्यावत नसणे शिक्षकांची नोंदणी नसणे किंवा इतर काही तांत्रिक कारणामुळे दैनंदिन उपस्थितीची माहिती भरण्याचे प्रलंबित असल्याचे निवेदने संचालनालयास प्राप्त झाली आहे. 

फक्त बाबत सर्व जिल्ह्यांना सुचित करण्यात येते की शाळांनी मागील कालावधीतील माहे मार्च ते सप्टेंबर 2022 अखेर दैनंदिन प्रलंबित उपस्थिती भरण्याकरिता केंद्रप्रमुख लॉगिन तथा तालुका लॉगिन वर दिनांक 28 सप्टेंबर 2022 ते 4 ऑक्टोबर 2022 या दरम्यान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे सदरच्या कालावधीत आपल्या जिल्ह्यातील काही शाळांनी दैनंदिन उपस्थिती भरण्याची प्रलंबित असल्यास सदर दैनंदिन माहिती अद्यावत करून घेण्यात यावी तदनंतर तसेच संचालनालय स्तरावरून देयके जनरेट करण्यात आल्यानंतर अशा प्रकारची कोणतीही सुविधा शाळांना उपलब्ध करून देण्यात येणार नसल्याबाबतचे शाळांना अवगत करून देण्यात यावे. तसेच शालेय पोषण आहार योजनेस पात्र सर्व शाळा एमडीएम पोर्टलवर उपस्थितीची माहिती अद्यावत करीत असले बाबत नियमितपणे आढावा घेण्यात यावा. 

असे निर्देश माननीय प्राथमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी शिक्षण अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना दिले आहेत. 

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.