फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेची आवेदन पत्र ऑनलाइन सादर करणेबाबत राज्य मंडळाच्या सचिवांचे पत्र

 फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेची आवेदन पत्र ऑनलाइन सादर करणेबाबत राज्य मंडळाच्या सचिवांचे पत्र. 


राज्य मंडळाच्या सचिव माननीय अनुराधा ओक यांनी फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीच्या परीक्षेची आवेदन पत्रे ऑनलाइन सादर करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी मार्च 2023 परीक्षेचे स्पष्ट होऊन इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदन पत्रे ऑनलाइन पद्धतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख हा मार्फत सरल डाटाबेस वरून भरावयाची आहे.

व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र एन्डोलमेन्ट सर्टिफिकेट प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी प्रायव्हेट कॅंडिडेट तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय आयटीआय प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ प्रिंट घेणारे विद्यार्थी चे विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदन पत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख मार्फत प्रचलित पद्धतीने भरावयाची आहे सदरची आवेदन पत्रे

www.mahahsscboard.in

या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालील प्रमाणे आहे.

उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय मार्फत शास्त्र कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदन पत्रे सरल डाटाबेस वरून ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या तारखा.

नियमित शुल्कासह

शनिवार दिनांक एक ऑक्टोबर 2022 ते शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत भरावयाची आहेत.


उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय मार्फत अभ्यासक्रम एच एस सी वोकेशनल स्क्रीन शाखांचे नियमित विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय आयटीआय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदन पत्रे प्रचलित पद्धतीने ऑनलाइन भरावयाच्या तारखा नियमित शुल्कासह पुढीलप्रमाणे.

शनिवार दिनांक 22 ऑक्टोबर 2022 ते शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर 2022.


उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क आरटीजीएसद्वारे भरणा करणे व आरटीजीएस किंवा एनएफटी पावती चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळवण्यात येईल याची सर्व शाळा प्रमुख प्राचार्य यांनी नोंद घ्यावी. 


सर्व विद्यार्थ्यांची आवेदन पत्रे भरून सबमिट केल्यानंतर आवेदन पत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिन मधून प्रिलिस्ट उपलब्ध करून दिलेली असेल कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदन पत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टर नुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी सदर  प्रिलिस्ट माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. 

इयत्ता बारावीची आवेदन पत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदन पत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाइन आवेदन पत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. 

शासन निर्णय दिनांक 14 ऑगस्ट 2017 नुसार उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाकडून ऑनलाईन आवेदन पत्रे स्वीकारण्यासाठी सरल डाटाबेस मध्ये विद्यार्थ्यांची नोंद आवश्यक आहे सदर सरल डाटावरूनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदन पत्रे भरावयाची आहे. 

व्यवसाय अभ्यासक्रम एच एस सी वोकेशनल शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांची माहिती सरल डाटाबेस मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदन पत्र प्रचलित पद्धतीने ऑनलाईनच भरावयाची आहे त्यांच्या तारखा वरील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहेत. 

नियमित शुल्काने आवेदन पत्र भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. 


फेब्रुवारी मार्च 2022 वर्ग दहावी व वर्ग बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रकराज्य मंडळाच्या सचिव माननीय अनुराधा ओक यांचे प्रकटन पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.