पाठ्यपुस्तकात वही सारखी कोरे पाने जोडावीत का? आपले मत नोंदवा पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या लिंक वर.

पाठ्यपुस्तकात वही सारखी कोरे पाने जोडावीत का? आपले मत नोंदवा पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या लिंक वर.


https://academics.balbharati.in/notebook/

वरील लिंक वर टच करा व पाठ्यपुस्तकात वही सारखी कोरे पाने जोडावीत का? व जोडल्यास किती जोडावी याबाबत आपला अभिप्राय नोंदवा.

"पाठ्यपुस्तकात पाने जोडण्याबाबत शिक्षकांसाठी, पालकांसाठी ऑनलाइन फाॅर्म विकसित केला आहे. कृपया, हा फॉर्म आपण भरावा तसेच आपल्या परिचयातील  शिक्षकांना (माध्यमिक स्तरापर्यंत)/ पालकांना भरण्यासाठी प्रोत्साहित करावे, ही विनंती."

अशा प्रकारचे आवाहन पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळांनी सर्व पालक शिक्षक यांना केले आहे.

पाठ्यपुस्तकात कोरे पेजेस जोडल्यास त्याचा किती फायदा होईल याबाबत शिक्षक पालक यांचे मत जाणून घेण्यासाठी सदर लिंक बनवण्यात आलेली आहे.

या लिंकवर आतापर्यंत जवळपास 50 हजार लोकांनी आपला अभिप्राय नोंदविला आहे.

पाठ्यपुस्तकात कोरे पाने जोडल्यास ते कितपत उपयोगी ठरतील व त्याचे परिणाम काय होतील याबाबत आपण आपला अभिप्राय देऊ शकता.


आमच्या मते जर पाठ्यपुस्तकात पुरेशी कोरे पाने जोडल्यास पाठ्यपुस्तकाची जाडी वाढेल. व मर्यादित कोरी पाने जोडल्यास ती अपुरी पडतील व विद्यार्थ्यांना वही व पुस्तक दोन्ही शाळेत आणावे लागेल यामुळे दप्तराचे ओझे अधिकच वाढेल व याचा मूळ उद्देश नाहीसा होईल त्यामुळे पाठ्यपुस्तकात कोरी पेजेस जोडण्याचा निर्णय योग्य की अयोग्य ते आपणच ठरवावे.

पाठ्यपुस्तकात कोरी पेजेस जोडण्याऐवजी जर विद्यार्थ्यांना सेपरेट वह्याच दिल्या तर ते योग्य राहील असे आम्हाला वाटते.

अर्थात शासनाने पुस्तकासोबतच वही किंवा वहीची कोरे पेजेस विद्यार्थ्यांना पुरवणे याबद्दल शासन विचार करत आहे या बाबीचे मात्र आम्ही स्वागतच करतो.

कारण खेड्यापाड्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वही मिळत नाही त्यांच्यासाठी कोरी पान देखील पुरेशी ठरतील.


पाठ्यपुस्तकातच वह्यांची पाने लावण्याचा निर्णय; अंमलबजावणी करण्यापूर्वी जाणून घेतली जात आहेत शिक्षकांची मतं.

मुलांच्या पाठ्यपुस्तकातच वह्यांची पाने लावण्याचा निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्यातील शिक्षकांचे मत जाणून घेण्यासाठी मंडळाच्या वतीने शिक्षकांना प्रश्न विचारले जात आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्यावतीने पाठ्यपुस्तकातच वह्याची पाने देण्यासंदर्भात नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यापूर्वी आणि याची अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्यभरातील शिक्षकांकडून त्यांची मतं जाणून घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी पाठ्यपुस्तकातच लिहिण्यासाठी वह्यांची पानं लावण्याच निर्णय घेण्यात आला होता.


यामध्ये इयत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रमुख विषयांसाठी किती पानांच्या वह्या लागतात याची माहिती शिक्षकांना भरायची आहेत. त्यासोबतच आणखी प्रश्न या संदर्भात शिक्षकांची मत जाणून घेण्यासाठी विचारले आहेत.


शिक्षकांना नेमके कोणते प्रश्न विचारले जात आहेत...


कोणत्या इयत्तेपासून पाठाच्या नोंदी वह्यांमध्ये काढतात ?


वह्याची पाने पाठ्यपुस्तकात दिल्यात विद्यार्थ्यांना कितपत फायदा होईल ?


वह्यांची पाने पाठ्यपुस्तकात दिल्यास वहीचा वापर थांबेल का ?


या योजनेचा लाभ वर्गातील किती टक्के विद्यार्थ्यांना होईल ?


वर्गात शिकत असताना विद्यार्थी या पानांवर महत्त्वाच्या नोंदी नोंदवतील का ?


या योजनेबद्दल आपण आपले मत नोंदवावे ?


वास्तववादी माहिती मिळवण्यासाठी छोटीशी प्रश्नावली


पाठ्यपुस्तकांमध्ये प्रामुख्याने क्रमिक पाठ्यक्रमावर आधारित पाठ्यांश दिला जातो. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था ही गोरगरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत एकसमान शिक्षण देण्यासाठी निर्माण केलेली आहे. पाठ्यपुस्तके ही त्याचाच एक भाग आहे. गरिबांच्या किंवा गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना वह्या विकत घेणे देखील अनेकदा परवडत नाही. त्यामुळे त्यांचे शाळेमधील शिक्षण/ वर्ग कार्य योग्य प्रकारे घडत नाही. हे लक्षात घेऊन पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांची पाने देण्याबाबतचे नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून, शाळेत प्रत्यक्ष शिकवणाऱ्या शिक्षकांकडून या संदर्भाने वास्तववादी माहिती मिळवण्यासाठी ही छोटीशी प्रश्नावली तयार केली असल्याचा बालभारतीकडून सांगण्यात आलं आहे


या सगळ्या प्रश्नांचा विचार करून राज्यभरातील शिक्षकांचं या पाठ्यपुस्तकातच वह्यांची पान देण्याच्या निर्णयावर एकत्रित मत विचारात घेऊन लवकरच पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पान जोडली जाण्याची शक्यता आहे.


बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.