२०२६-२७ यु-डायस प्लस प्रणालीत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन व अपार आयडी काढणे आदेश 31/07/2026

सन २०२६-२७ यु-डायस प्लस प्रणालीमधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन व अपार आयडी काढण्याची कार्यवाही पूर्ण करणेबाबत 


महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/२०२६-२७/

प्रति, 

१) मा. आयुक्त, महानगरपालिका, सर्व

२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.

३) विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई.

विषयः सन २०२६-२७ यु-डायस प्लस प्रणालीमधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन व अपार आयडी काढण्याची कार्यवाही पूर्ण करणेबाबत.

संदर्भ: १) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O.No.१-२७/२०२३-DIGED-Part (२) दि. १० एप्रिल, २०२६.

२) शिक्षण सहसंचालक, प्रशासन, अंदाज व नियोजन, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे क्र. आशिका/२०२६/ध.आं/आस्था-क१४४ दि. २३ जुलै, २०२६ रोजीचे पत्र.

उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे यु-डायस प्लस प्रणालीमधून आधार व्हॅलिडेशन व अपार आयडी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही दि. ३० जून, २०२६ पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून कळविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने संदर्भिय क्र. २ नुसार शिक्षण सहसंचालक, प्रशासन, अंदाज व नियोजन, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयाकडून दि. ०१ जुलै, २०२६ रोजी आढावा घेण्यात आला. यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार विद्यार्थी आधार व्हॅलिडेशनमध्ये मुंबई, पालघर, धुळे, ठाणे, नंदुरबार या जिल्ह्याच्या आधार Validation मध्ये मागे असल्याबाबत दिसून आले आहे आणि अपार आयडी तयार करण्यामध्ये धुळे, मुंबई, नागपूर, नांदेड, लातूर सर्वात मागे असल्याबाबत दिसून आले आहे. याबाबत जिल्हा कार्यालयाकडून कळविण्यात येते की, दि. १५ ऑगस्ट, २०२६ पर्यंत आधार उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांची अपार आयडी काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी.

आधार व अपार आयडी काढतांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्याकरिता जिल्हा व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करून प्रशिक्षण देण्यात यावे व झालेल्या प्रगतीचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात यावा. व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये शाळेमधील यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदविलेल्या विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण झाले असल्याची खात्री करण्यासाठी सूचित करावे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण झाले आहे त्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याकरिता यु-डायस प्लस प्रणालीमधून नोंदणी करण्यासाठी मुख्याध्यापकांना कळविण्यात यावे.

तसेच मुख्यध्यापकांना येत असलेल्या अडचणी सोडविण्याकरिता जिल्हा व तालुका स्तरावरील संगणक प्रोग्रामर, MIS-Coordinator व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना आपल्या स्तरावर आदेशित करावे. जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी जिल्ह्यातील अपार नोंदणीबाबत सर्व अडचणी एकत्रिक करून या कार्यालयास उपलब्ध करून देण्यात यावे, या कार्यालयाकडून आवश्यकते तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल.

सोबत : संदर्भिय पत्र व जिल्हानिहाय अहवाल.


Digitally signed by Sanjay

(संजय यादव, मा.प्र.से.) 

राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.

प्रत माहितीस्तव :

१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

२) मा. आयुक्त शिक्षण, आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत : उचित कार्यवाहीस्तव,

१) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

३) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.

४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.

५) शिक्षणाधिकारी (माध्यमिक व उच्च माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.

६) शिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी, महानगरपालिका, सर्व.

 यू डायस 2026-27 मध्ये शाळा लॉगिन मध्ये पुढील सुविधा सुरू झाल्या आहे 

सर्व स्टुडेंट व शिक्षक यांचे आधार व्हॅलिडेशन 30 जून 2026 पूर्ण करणे 

स्टुडेंटबाबत -

• सर्व वर्ग व क्लास चे प्रमोशन पूर्ण करून फायनल करणे 

• प्रमोशन पूर्ण झाल्यानंतर आधार व्हॅलिडेशन पूर्ण करणे 

• आधार व्हॅलिडेशन पूर्ण झाल्यानंतर अपार साठी request टाकणे

• अपार साठी स्टुडन्ट माहिती पूर्ण भरणे आवश्यक नाही फक्त आधार व्हॅलिडेशन असणे आवश्यक आहे

• सदर कार्यवाही 30 जून 2026 पर्यत पूर्ण करावी

• या बाबत काही अडचण असल्यास तालुका/जिल्हा/राज्य स्तरावर संपर्क करणे (कम्प्युटर प्रोग्रॅमर ,एआयएस कोओर्डीनेटर व ऑपरेटर )

शिक्षक यांचे आधार व्हॅलिडेशन

o शिक्षकाचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण नसल्यास 30 जून 2026 पर्यत पूर्ण करावे

o शिक्षकांची माहीती अपडेट करण्याची सुविधा सुरू झाली आहे.

Udise plus Portal Link

https://udiseplus.gov.in/#/en/page/oldlink/127



🥊अत्यंत महत्त्वाचे

🕕काल मर्यादित


*विषय: UDISE Plus 2026-27 मध्ये विद्यार्थी प्रमोशन बाबत सूचना* 


सर्व प्राचार्य/ मुख्याध्यापक यांना कळविण्यात येते की, जवळपास आता सर्व शाळांचे निकाल लागलेले आहेत. काही विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी TC घेऊन जाण्यासाठी येत असतील. त्या अनुषंगाने Udise plus 2026 विद्यार्थी ऑनलाइन प्रमोशन करावे लागणार आहे हे करताना  शाळेने खालील प्रमाणे काळजी घ्यावी.

1. जर  विद्यार्थी आपल्या शाळेतुन पास , TC घेऊन जात असेल तर त्याला TC देण्यापूर्वी  त्या विद्यार्थ्यांचा अथवा पालकांचा मोबाईल नंबर शाळेत जतन करून ठेवावा 

2. आपल्या शाळेतील कोणत्याही वर्गातील विद्यार्थी शाळा सोडून  पुढील  शिक्षणासाठी इतर कुठे,  जात आहे हि महिती सदरील विद्यार्थ्यां/ पालकाकडून घेऊन आपल्या दप्तरी जतन करून ठेवावी .

2. तसेच विद्यार्थी 10 वी pass होऊन ITI, POLYTECNIC किंवा इतर कोणत्याही होकेशनल किंवा कोणत्याही  कोर्ससाठी शिकायला , व्यवसाय व नौकरी इ साठी जात असेल तर  त्याची सविस्तर माहिती त्याच्या कडून घेऊन शाळेने जतन करून शाळेतच ठेवावी जेणे करून शाळेस 

DROPBOX मधील विद्यार्थी कमी करण्यासाठी त्या माहितीची मदत होणार आहे. 

    या वरील सर्व बाबींचे काटेकोर पणे पालन करावे व आपल्या शाळेच्या DROPBOX मध्ये कोणताही विद्यार्थी राहणार नाही याची शाळांनी दक्षता घ्यावी.

✍️ गशिअ यांनी आपल्या तालुक्यातील सर्व शाळांना याबाबत अवगत करावे व आपल्या तालुक्यातील dropbox zero दिसला पाहिजे याची काळजी घ्यावी.

 टीप : यावर्षी 2 री ते 12 कोणत्याही विद्यार्थ्यांची नवीन एन्ट्री होणार नाही असे वरिष्ठ कार्यालया कडून कळविण्यात आले आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी_



महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई ने दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार सन 2023 24 प्लस प्रणाली मध्ये शाळा शिक्षक व विद्यार्थी पोर्टलचे काम पूर्ण करणे तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन करून ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थी संख्या कमी करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

राज्यातील सर्व शाळांनी सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, शिक्षक व विद्यार्थी पोर्टलचे काम १००% करणेबाबत आपण पत्राव्दारे, Zoom Meeting घेऊन व व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून वारंवार कळविण्यात आले आहे, तरी देखील राज्यातील शासकीय, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील युडायस प्लसची माहिती संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी अद्यापही पूर्ण केलेली नाही.

राज्यातील सर्व शिक्षकांचे व विद्याथ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करणेसाठी जिल्हानिहाय य तालुकानिहाय Adhar Validation Report नियमितपणे पाठविण्यात येत आहे. परतू Adhar Validation चे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. याबाबत केंद्र शासनाकडूनही वारंवार पाठपुरावा केला जात आहे. तरी आपल्या जिल्हयातील संबंधित सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांकडून उर्वरित शिक्षक व विद्यार्थी यांचे Adhar Validation थे काम दि.३१/०१/२०२४ पर्यंत पूर्ण करून घ्यावे.

आपणास ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी संख्या कमी करण्याकरिता कळविण्यात आले आहे मात्र अनेक शाळांचा ड्रॉप बॉक्स अद्यापही शून्य झालेला दिसत नाही यासाठी आपल्या स्तरावरून कॅम्प घेऊन मुख्याध्यापकांकडून ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी त्वरित कमी करून घ्यावे अन्यथा आपल्या जिल्हयाच्या Performance Grading Index गुणांवर याचा विपरित परिणाम होईल त्यामुळे राज्याच्या शैक्षणिक निर्देशकांमध्ये (PGI) घट होईल.

याशिवाय केंद्र शासनाच्या दि.२२ जानेवारी, २०२४ च्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

सन २०२३-२४ करिता युडायस प्लस डेटाचा स्नॅपशॉट दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी रात्री ११ वाजता घेण्यात येईल, दि. ३१ जानेवारी, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी डेटा पूर्ण करण्याच्या व तपासून खात्री करून घेण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

उपरोक्त सूचनांनुसार दि. ३१ जानेवारी, २०२४ रोजीचा युडायस प्लस डेटा प्रमाणित करणेकरिता वापर करण्यात येईल.

ज्या शाळांचा डेटा अपूर्ण भरलेला असेल त्या शाळांचा संपूर्ण डेटा दि. ३१ जानेवारी, २०२४ नंतर सिस्टीमद्वारे पूर्णपणे डिलिट करण्यात येईल.

दि. ३१ जानेवारी, २०२४ नंतर डेटामधील कोणतेही बदल अॅप्लिकेशन रिअल टाइममध्ये अपडेट होईल, परंतु सन २०२३-२४ च्या डेटासाठी सदर अपडेट विचारात घेतले जाणार नाही. युडायस प्लस डेटामध्ये कोणतेही बदल तांत्रिक टीमद्वारे दि. ३१ जानेवारी, २०२४ नंतर केले जाणार नाहीत.

तरी आपल्या स्तरावरून दि. ३१ जानेवारी, २०२४ पूर्वी मुख्याध्यापकांकडून युडायस प्लस सन २०२३-२४ पोर्टलवरील संपूर्ण डेटा भरून घ्यावा.


सोबत: 1. School Profile Status as on dt.23/01/2024

2. Teacher Profile Status as on dt.23/01/2024 3. Student Profile Status as on dt. 23/01/2024

4. Student Adhar Validation Status as on dt. 23/01/2024 5. Teacher Adhar Validation Status as on dt.23/01/2024

6. Drop Box Status Std.1 to 12 as on dr.23/01/2024


(समीर सावंत)

राज्य प्रकल्प समन्वयक

तथा सहसंचालक (प्रशा.)


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.