जुनी पेन्शन, बक्षी समिती खंड दोन, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे, पदोन्नत्या बाबत मुख्यमंत्री सकारात्मक - महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ सोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त

जुनी पेन्शन, 4% डी ए, बक्षी समिती खंड दोन, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे, पदोन्नत्या बाबत मुख्यमंत्री सकारात्मक 

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ सोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त.


महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने 27 सप्टेंबर 2022 रोजी राज्यव्यापी लक्षवेध दिन पाळण्याचा निर्णय घेतला होता. तथापि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिनांक 28 जुलै 2022 रोजी भेट प्रसंगी दिलेले मी संदीप आश्वासन तसेच दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या 14 प्रश्नांबाबत आश्वासक चर्चा होऊन केलेल्या अहवालानुसार महासंघाने लक्षवेध दिन आंदोलनास स्थगिती दिली होती.

या पार्श्वभूमीवर दिवाळी सणाच्या अवचित त्यावर मागण्याबाबतचे निर्णय व्हावेत अशी अपेक्षा होती मात्र निर्णय झाल्यामुळे राज्यभरातील अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, आंदोलनात्मक पवित्रा घेण्यासाठी महासंघावर दबाव वाढला आहे. तरी सर्वांना जुनी पेन्शन योजना, माननीय बक्षी समितीच्या खंड दोन अहवालाची अंमलबजावणी करणे, सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य 25 राज्यांप्रमाणे साठ वर्षे करणे, अधिकारी कर्मचाऱ्यांची कौटुंबिक आरोग्य विषयक हेळसांड थांबविण्यासाठी पदोन्नतीच्या बाबतीत महसूल विभाग वाटप अधिनियम 2021 लागू करण्यात येऊ नये, आधी महत्त्वाच्या मागण्यांबाबत प्राधान्याने दिनांक 15 नोव्हेंबर 2022 पूर्वी निर्णय व्हावेत,  तसेच अधिकाऱ्यांच्या असंतोषाची गांभीर्याने दखल घेऊन केंद्राने नुकत्याच जाहीर केलेल्या चार टक्के महागाई भत्ता बरोबर इतर महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांबाबत देखील विहित कालमर्यादित निर्णय व्हावे. असे आग्रही निवेदन माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दिले आहे.महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीचे कार्यरत देखील सदर निविदानासोबत जोडले आहे ते पुढील प्रमाणे.

1) एक नोव्हेंबर 2005 नंतर राज्यसेवेत आलेल्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.. 
2) माननीय बक्षी समितीच्या खंड दोन अहवालाची विनाविलंब अंमलबजावणी करणे. 
3) सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य 25 राज्यांप्रमाणे साठ वर्षे करणे.
4) अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक आरोग्य विषयक हेळसांड थांबवण्यासाठी पदोन्नतीच्या बाबतीत महसूल विभाग वाटप अधिनियम 2021 लागू करण्यात येऊ नये तसेच सद्यस्थितीत सदर अधिनियमाचा फेर डबा घेऊन सरळ सेवा भरतीसाठी सुद्धा त्याची वस्तुस्थितीनिष्ठ उपयुक्तता तपासण्यात यावी.
5) सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची ग्रॅज्युएटीची सध्याची रुपये 14 लाख ही कमाल मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर रुपये वीस लाख इतकी करणे.
6) राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त पदे कंत्राटी पद्धती ऐवजी नियमित मार्गाने समय मर्यादित भरणे.
7) विविध प्रशासकीय विभागातील रखडलेल्या पदोन्नती प्रक्रिया सुरळीत करून पदोन्नती पात्र अधिकाऱ्यांना निवृत्तीपूर्वी त्याचा लाभ मिळेल याची काळजी घेणे.
8) सर्व खात्यातील गट-अ व गट व अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्या तातडीने करणे.
9) महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या ठिकाणी सुयोग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देणे.. 
10) राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गट विमा हप्त्यांमध्ये सातव्या वेतन आयोगाची सुसंगत सुधारणा करणे बाबत.
11) केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील वाहतूक हत्यासह इतर सर्व देय भत्ते मिळणे बाबत.
12) सेवा स्वास्थ्य वैद्यकीय खर्चाची प्रतिकृती विमा क्षेत्राचे अवाजवी हप्ते कमी करण्याबाबत.
13) सातव्या आयोगाच्या अनुषंगाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वाहन खरेदी अग्रीमाच्या कमाल मर्यादित वाढ करणे बाबत.
14) अधिकाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा भरती सुविधेचा नियमित आढावा घेऊन त्याबाबतची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यास संबंधित विभागांना निर्देश देणे.
15) राज्याच्या प्रशासकीय प्रकल्पासाठी आवश्यक कार्य संस्कृती तसेच पगारात भागवा अभियानाचा महासंघातर्फे प्रचार आणि प्रसार.

वरील सर्व बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयाचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीला अपर मुख्य सचिव सेवा माननीय नितीन गद्रे मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव माननीय श्री विकास खारगे यांच्यासह सामान्य प्रशासन वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि अधिकारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व मुद्द्यांच्या बाबत माननीय मुख्यमंत्री यांनी संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करणेबाबत निर्देश दिले आहेत.


वरील महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची निवेदन व मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचे कार्यवृत्त पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadबदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.