बदली अपडेट - जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया आज पासून सुरू! संवर्ग एक व दोन करिता महत्त्वाची माहिती.

जिल्हानंतर्गत बदली प्रक्रिया विशेष.


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया.



संवर्ग 1 व 2 करिता महत्त्वाचे


ऑनलाइन बदली पोर्टल 31 ऑक्टोंबर पासून सुरू होणार.


दिनांक 5 नोव्हेंबर 2022 पर्यंत शिक्षकांनी पोर्टलवर कोणतेही काम करायची गरज नाही.



दिनांक 31 ऑक्टोबर 2022 ते 4 नोव्हेंबर 2022 पर्यंत फक्त शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेच लॉगिन होऊ शकणार आहे. शिक्षक लॉगिन होणार नाही. 

शिक्षकांना दिनांक 5 नोव्हेंबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत फक्त बदली हवी किंवा नको एवढेच पोर्टलमध्ये लॉगिन करून नोंदवायचे आहे.

बदलीसाठी अर्ज लगेच भरता येणार नाही त्यासाठी अगोदर 2022 जिल्हा अंतर्गत बदली मध्ये दिनांक 05/11/2022 ते 07/11/2022 या कालावधीत संवर्ग 1 व संवर्ग 2 यांनी बदली पोर्टल वर त्यांना बदली हवी किंवा नको या बाबत Online माहिती भरणे आवश्यक आहे. 


 या टप्यात फक्त संवर्ग 1 व 2 मध्ये मोडत असल्यास बदली हवी किंवा नको हाच पर्याय नोंदविणे आहे.


यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये.. 

आपला संवर्ग 1 किंवा संवर्ग 2 मधील दावा मान्य झाल्यास 30 गावांचा पसंतिक्रम संवर्ग 1 करता 24/11/2022 ते 26/11/2022 पर्यंत राहील


संवर्ग 2 करीता 01/12/2022 ते 03/12/2022


या कालावधीत भरावे लागणार आहेत


जिल्हा परिषद शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली सुधारित वेळापत्रक


जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिका निवडणुका लांबणीवर


बदली पोर्टल ओपन केले असता आपल्याला दिसून येते की सध्या बदली पोर्टलवर लॉगिन होऊ शकत नाही. जर आपण बदली पोर्टलवर लॉगिन करण्याचा प्रयत्न केला व आपला मोबाईल नंबर टाईप केला तर खाली "लॉगिन डिसेबल" असा मेसेज दिसून येतो.

तसेच बदली पोर्टलवर सर्व शिक्षक बांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. व दिनांक 31 ऑक्टोबर 2022 पासून जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेची सुरुवात होणार असल्याची सूचना देखील बदली पोर्टलवर आपल्याला दिसून येते.



 

बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.