समग्र शिक्षा अंतर्गत मिळालेल्या 50% संयुक्त शाळा अनुदानाची रक्कम अगोदर खर्च करा त्यानंतरच मिळणार उर्वरित 50% रक्कम

 समग्र शिक्षा अंतर्गत मिळालेले 50% संयुक्त शाळा अनुदान अगोदर खर्च करा त्यानंतरच मिळणार उर्वरित 50% रक्कम.


महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई चे उपसंचालक वैशाली वीर यांचे स्वाक्षरीने दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार संयुक्त शाळा अनुदान(Composite School Grant) तरतूद विनियोग करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

सन 2022 23 मधील संयुक्त शाळा अनुदान प्राथमिक मंजूर तरतूद व संयुक्त शाळा अनुदान माध्यमिक मंजूर तरतूद निधीपैकी 50 टक्के निधी संबंधित जिल्हा परिषद महानगरपालिकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच सदर निधीचा विनियोग करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

तथापि प्रबंध पोर्टलवर उपलब्ध असलेल्या तपशिलानुसार असे आढळून आले आहे की अनेक जिल्हा परिषद व महानगरपालिका यांनी चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 2022 23 दरम्यान या उपक्रमांतर्गत खूप कमी खर्च केला आहे किंवा कोणताही खर्च केला नाही म्हणून आपणास विनंती आहे की आपण या बाबीकडे लक्ष द्यावे आणि समग्र शिक्षा अंतर्गत संयुक्त शाळा अनुदानाचा जास्तीत जास्त विनियोग सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दिनांक 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत या कार्यालयास सादर करावा.

सदर निधीचा विनियोग झाल्यानंतरच उर्वरित पन्नास टक्के निधी वितरित करण्यात येणार आहे अशी सूचना देखील सदर पत्रानुसार सर्व महानगरपालिकेचे आयुक्त व सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.वरील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे अनुदानासंदर्भातील महत्त्वपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.