राष्ट्रीय पोषण आहार माह सप्टेंबर 2022 मध्ये राबवणीबाबत शिक्षण संचलनालयाचे परिपत्रक

 राष्ट्रीय पोषण आहार माह सप्टेंबर 2022 मध्ये राबवणीबाबत शिक्षण संचलनालयाचे परिपत्रक. 


महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 2 सप्टेंबर 2022 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार राष्ट्रीय पोषण आहार माह सप्टेंबर 2022 मध्ये राबवणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

केंद्र शासनाने देशभरात सप्टेंबर महिना पोषण आहार महा म्हणून राबवण्याचे ठरवले आहे त्याबाबत केंद्र शासनाने विविध कार्यक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिले आहेत त्यानुसार खालील प्रमाणे कार्यक्रम ग्रामपंचायत शाळा तालुका जिल्हास्तरावर राबविण्यात यावे.

प्रत्येक शाळेमध्ये परसबागेचे फायदे या विषयाबाबत विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी सतरा आयोजित करणे व ज्या ठिकाणी परत बागेसाठी जागा उपलब्ध आहे तिथे जास्तीत जास्त शाळांमध्ये परसबाग करण्यावर भर देणे.

शाळा ग्रामपंचायत तालुका जिल्हास्तरावर वेगवेगळ्या वयोगटातील लोकांमध्ये रॅली स्पर्धा राबवून पोषण आहाराचे तसेच पोषण मूल्यांचे महत्त्व पटवून देणे शाळांमध्ये रांगोळी चित्रकला वकृत्व स्पर्धा आयोजन करणे.

किशोरवयीन मुलींमध्ये पोषणमूल्य तसेच आरोग्य विषयी प्रश्नाबाबत जनजागृती करणे.

पोषण मूल्याबाबत प्रत्येक शाळा स्तरावर ऑडिओ व्हिडिओ सत्र तसेच चर्चासत्र आयोजित करणे.

शाळेमध्ये पोषण आहाराबाबत संवेदनशीलता आणण्यासाठी पोषण आहार वेबसाईटवरील ऑडिओ व्हिडिओ चा वापर करणे.

www.mdm.nic.in/mdmwebsite

शाळा परिसरात अंगणवाडी केंद्र असल्यास त्यांनाही उपक्रमांमध्ये समाविष्ट करून घेणे.

विद्यार्थ्यांमध्ये पाण्याचे महत्व रुजवणे व त्याचा वापर व बचत याबाबत माहिती देणे.

पोषण महाअंतर्गत ग्रामपंचायतचा सहभागातून महिला आणि स्वास्थ्य चा प्रचार करणे.

सर्व जिल्ह्यांनी मुख्यत्वे ॲनिमिया शिबिराचे आयोजन करावे व पारंपारिक पाककृतीवर भर द्यावा.

जिल्ह्यांनी खालील स्पर्धेचे पोषण महाअंतर्गत नियोजन करावे सर्व जिल्ह्यांनी सहभाग नोंदवणे आवश्यक राहील.

'अम्मा की रसोई' म्हणजेच 'आजीचे स्वयंपाक गृह' चे आयोजन करणे.

जिल्ह्यांनी त्यांच्या स्थानिक ऋतुमानानुसार उपलब्ध होणाऱ्या धान्यातून पारंपारिक पाककृती यादी तयार करणे तसेच सर्व धान्यातील पोषण मूल्यांची ओळख करून देणे.

इंद्रधनुष्य थाळी तिरंगी थाळी स्पर्धेचे आयोजन करणे.

गणपती बाप्पा पोषक थाळी सट चे आयोजन करणे.

लायन्स क्लब रेड कॉस रोटरी क्लब मदतीने विद्यार्थ्यांचे वाढ मोजमाप चे आयोजन करणे.

गावातील सदर विषयाची तज्ञ व्यक्ती डॉक्टर ग्रामपंचायत सभासदांचा या अभियानातील सहभाग निश्चित करण्यात येऊन त्यांचेही मार्गदर्शन घेण्यात यावे पोषण उपक्रम जास्तीत जास्त यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात यावा.

शाळांतर्गत शिक्षक पालक बैठकी घेण्यात याव्यात.

सदर कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी आपल्या अधिनिस्त सर्व संबंधांना तात्काळ सूचना देण्यात याव्यात व राबवलेले उपक्रमाचे एचडी फोटो व व्हिडिओ जतन करून संचालनालयास सादर करण्यात यावेत.

वरील प्रमाणे निर्देश शिक्षण संचालक प्राथमिक माननीय महेश पालकर यांनी सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.




वरील शिक्षण संचालक प्राथमिक यांचे शालेय पोषण आहार सप्ताह बाबतचे परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर Download क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.