आजचे जिल्हा अंतर्गत बदली अपडेट.

 शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव यांनी आज दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत ऑनलाइन 2022 बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


जिल्हा परिषदेच्या कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हाअंतर्गत बदलांची संदर्भीय शासन निर्णय सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे सदरील बदलांचे कामकाज विहित कालमर्यादित ऑनलाईन करावयाचे आहेत सदरची बदली प्रक्रिया शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणाली टी टी एम एस वर सुरू आहे.

मान्य उपसचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे दिनांक 26 ऑगस्ट 2022 चे पत्र्यातील बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक अशी स्पष्ट तरतूद संदर्भीय शासन निर्णयातील व्याख्येत नमूद आहे त्यामुळे दिनांक 3 जून 2022 च्या पत्रासोबतच्या स्पष्टीकरणात्मक मुद्द्यातील अनुक्रमांक आठ येथील मुद्द्याबाबतचे स्पष्टीकरण रद्द करण्यात येत आहे असे नमूद आहे.

सबब शासन निर्णय दिनांक ७ एप्रिल 2021 मधील वरील तरतूद विचारात घेतात ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल मग अशी सेवा अवघड क्षेत्रातील एका किंवा अधिक शाळातील असली तरीही अशा शिक्षकांच्या बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक संवर्गात समावेश करणे आवश्यक आहे त्यामुळे अशा शिक्षकांच्या बाबतीत बदल्याबाबतच्या संगणक प्रणालीमध्ये एकापेक्षा अधिक अवघड क्षेत्रातील शाळेतील सेवा असल्यास ते यापूर्वी कार्यरत असलेल्या सर्वात अगोदरच्या अवघड क्षेत्रातील शाळेचा हजर झाल्याचा दिनांक हा अवघड क्षेत्रात रुजू दिनांक म्हणून नमूद करावा.

जेणेकरून अशा शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त होत असेल असे शिक्षक शासन निर्णयातील तरतुदीनुसार संगणक प्रणालीमध्ये बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून अर्ज करू शकतील. तथापि संबंधित शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सलग सेवा असल्याची संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधित मूळ सेवा पुस्तक आवश्यक कागदपत्र याची पण खात्री करून तसेच प्रमाणित करून तशी दुरुस्ती असल्यास संबंधित शिक्षकाची जॉइनिंग डेट मध्ये दुरुस्ती करून रिमार्क मध्ये अपडेटली आहे तसेच डाटा या कार्यालयास सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी आपले स्वाक्षरीनिशी दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी सादर करावी ज्या गटांची मुदतीत माहिती प्राप्त होणार नाही त्यांचे नावे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निदर्शनास आणून देण्यात येतील याची नोंद घ्यावी असे निर्देश सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव यांनी दिले आहेत.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.