वर्ग दहावी SSC व बारावी HSC च्या परीक्षेच्या EXAM 2023 तारखा जाहीर या तारखांना होणार परीक्षा संपूर्ण वेळापत्रक

वर्ग दहावी SSC व बारावी HSC च्या परीक्षेच्या EXAM 2023 तारखा जाहीर या तारखांना होणार परीक्षा संपूर्ण वेळापत्रक.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे च्या दिनांक एकोणवीस सप्टेंबर 2022 रोजी च्या पत्रानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता दहावी फेब्रुवारी मार्च 2022 परीक्षांच्या वेळापत्रक बाबत पुढील प्रमाणे सूचना प्रकटन निर्गमित केले आहे.


फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नव विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता दहावी च्या लेखी परीक्षा खालील संभाव्य कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

1) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा सर्वसाधारण व द्विलक्षी विषय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम म्हणजेच बारावीच्या लेखी परीक्षा मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 ते सोमवार दिनांक 20 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीची लेखी परीक्षा गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 ते शनिवार दिनांक 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.


उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांक निहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक अधिकृत

www.mahahsscboard.in

या वरील संकेतस्थळावर दिनांक 19 सप्टेंबर 2022 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शाळा कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाची नियोजन करण्याची हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील काम कमी होण्याचे दृष्टीने वरळी मार्च 2022 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सअप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.

प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळमार्फत शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल.

सदर वेळापत्रकाबाबत काही सूचना हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे पंधरा दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. तदनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही.

उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

वरील प्रमाणे निर्देश राज्य मंडळ पुणे च्या सचिव माननीय अनुराधा ओक यांनी सदर प्रकटनाद्वारे दिल्या आहे.



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे ची सचिव यांचे वर्ग दहावी व वर्ग बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत पत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा.

Download


राज्य मंडळांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर वर्ग दहावीचे विषयनिहाय संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे ते वेळापत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.