महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी(TET) 2019 गैर प्रकारात समाविष्ट कार्यरत शिक्षकांचा शालार्थ आयडी गोठवणार - शिक्षण संचालक आदेश

 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2019 गैर प्रकारात समाविष्ट कार्यरत शिक्षकांचा शालार्थ आयडी गोठवणार - शिक्षण संचालक आदेश.


महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी घोटाळा 2019 या यामध्ये दोषी आढळून आलेल्या कार्यरत शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी जे शिक्षक जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, अथवा अनुदानित, अंशतः अनुदानित शाळेवर कार्यरत आहेत व त्यांना शालार्थ आयडी प्राप्त आहे अशा शिक्षकांसंदर्भात पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2019 परीक्षा दिनांक 19 जानेवारी 2020 या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारे झालेल्या गुन्ह्यांचे अनुषंगाने ग्रेड प्रकारांमध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादनूक रद्द करणे व शासकीय निश्चित करणे याबाबत आयुक्त परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून दिनांक 3 ऑगस्ट 2022 अन्वये 7874 अपात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे.

ज्या अर्थी शासन पत्र दिनांक दहा जून 2022 मधील मुद्दा क्रमांक चार अन्वय सदर यादीतील परीक्षार्थी जि प व खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित शाळेत कार्यरत असल्यास व सदर सेवेच्या अनुषंगाने त्यांना शालार्थ आयडी प्रदान केलेला असल्यास शिक्षण संचालक यांनी त्यांचे स्तरावरून प्रथमता सदर शालार्थ आयडी पुढील आदेशापर्यंत गोठवण्यात यावेत असे निर्देश आहेत.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 मधील 7874 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे चौकशांती त्यांना अपात्र केले आहेत सदर उमेदवारांची यादी दिनांक 10 ऑगस्ट 2022 नुसार महाआयटी मुंबई यांनी नावानुसार व आधार क्रमांकानुसार मॅपिंग करण्यासाठी देण्यात आली होती महा आयटी कडून मॅपिंग करून प्राप्त यादी नुसार अपात्र उमेदवारांपैकी 576 उमेदवार राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका कटक मंडळे खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण सेवक सहशिक्षक पदावर कार्यरत आहेत आणि शालार्थ प्रणाली द्वारे वेतन अनुदानित घेत आहेत.

शासन पत्र दिनांक 10 जन 2022 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक 17 ऑगस्ट 2022 च्या संदर्भात चर्चा आदेशान्वयुक्त प्रकरणी महायुती मुंबई यांच्याकडून प्राप्त यादीनुसार प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत व शालार्थ आयडी धारक सोबतच्या यादीतील एकूण 576 उमेदवारांची शालार्थ आयडी पुढील आदेशापर्यंत गोठवण्यात आलेले आहे.

उपरोक्त गोठवण्यात आलेल्या शालार्थ आयडी उमेदवारांची नावे माहे ऑगस्ट 2022 च्या वेतन देयकामध्ये समाविष्ट असण्याची शक्यता असल्याने सदरची वेतन देयक रद्द करून संबंधितांचे नाव देखातून वगळून माहे ऑगस्ट 2022 चे वेतन देत तयार करून अन्य कर्मचाऱ्यांची वेतन अनुदान अदा करण्याची कार्यवाही करावी. तसेच शालार्थ आयडी गोठविण्यात आलेल्या उमेदवारांची माहे ऑगस्ट 2022 पासून ऑनलाईन अथवा ऑफलाइन वेतन अनुदान आधार होणार नाही याची सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी दक्षता घ्यावी सदर प्रकरणी उमेदवारांना वेतन अनुदान अथवा फरक देख अदा झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर नियमानुसार कार्यवाही प्रस्तावित केली जाईल याची नोंद घ्यावी.

शालार्थ आयडी गोठवल्यामुळे काय होणार? 

शालार्थ आयडी गोठवल्यामुळे सदर दोशी शिक्षकांचे यापुढील कुठलेही वेतन भत्ते अदा केली जाऊ शकणार नाहीत.

शालार्थ आयडी म्हणजे काय? 

महाराष्ट्र राज्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते व इतर देयके अदा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शालार्थ वेतन प्रणाली विकसित केली आहे. या ऑनलाइन वेतन प्रणाली मध्ये प्रत्येक शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांचा वैयक्तिक असा शालार्थ आयडी देण्यात आलेला आहे. सदर शालार्थ आयडीवर सदर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन देयके व भत्ते अदा केले जातात.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.