आपली वेतन प्रमाणपत्र मिळवा आपल्या मोबाईल वरून.... कसे ते पाहण्यासाठी.

आपली वेतन प्रमाणपत्र मिळवा आपल्या मोबाईल वरून....  कसे ते पाहण्यासाठी. 👇


आपले वेतन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही ते आपण आपल्या मोबाईल वरून देखील डाऊनलोड करू शकतो कसे ते आपण टप्प्याटप्प्याने पाहूया.


आपल्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन.. 

Get payslip असे सर्च करा.

किंवा खालील Download वर क्लिक करा.

Download


ॲपवरील ॲप्लिकेशन डाऊनलोड करून मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर सुरुवातीला लॉगिन करताना

कर्मचारी यांनी प्रथम वेळी लॉगिन करताना स्वतःचा सेवार्थ आयडी अथवा शालार्थ आयडी हा युजर आयडी म्हणून टाकावा व नंतर

zpbuldana हा डिफॉल्ट पासवर्ड टाकावा.


त्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रथम वेळी लॉगिन करताना संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल व स्वतःचा पासवर्ड तयार करावा लागेल.
कर्मचाऱ्यांनी त्यांची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केल्यानंतर त्यांनी रजिस्ट्रेशन करताना टाकलेल्या ई-मेल ला व्हेरिफिकेशन लिंक जाईल कर्मचारी जोपर्यंत ईमेलवर आलेली व्हेरिफिकेशन लिंक ला व्हेरिफाय करणार नाही तोपर्यंत त्याला एप्लीकेशनला लॉगिन करता येणार नाही.
रजिस्ट्रेशन करताना टाकलेल्या ई-मेल वर खालील प्रमाणे व्हेरिफिकेशन लिंक जाणार आहे जोपर्यंत व्हेरिफाय ईमेल ऍड्रेस करणार नाही तोपर्यंत एप्लीकेशनला लॉगिन करता येणार नाही त्यामुळे आपल्या मोबाईल मधील मेल बॉक्स ओपन करून त्यातील ईमेल उघडून व्हेरिफाय ईमेल ऍड्रेस करावा लागेल.
व्हेरिफिकेशन लिंक ला व्हेरिफाय केल्यावर खालील प्रमाणे कर्मचारी लॉगिनचे होमपेज दिसणार आहे.
ज्या महिन्याची सेलरशिप पहायची आहे तो महिना व वर्ष सिलेक्ट केल्यानंतर वरील प्रमाणे त्याचे वेतनाची माहिती त्याला एप्लीकेशन मध्ये दिसून पडणार आहे सोबतच ती पगार पत्रकाच्या स्वरूपात किंवा वेतन प्रमाणपत्राच्या स्वरूपात पीडीएफ मध्ये डाउनलोड सुद्धा करता येणार आहे आणि त्याची प्रिंट सुद्धा काढता येणार आहे.
पीडीएफ स्वरूपात आपल्या मोबाईल मध्ये वेतन प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्या त्याची प्रिंट काढून मुख्याध्यापक अथवा कार्यालय प्रमुखाचा सही व शिक्का घेतल्यानंतर सदर वेतन प्रमाणपत्र आपण कुठेही वापरू शकता.
कर्मचारी यांना शेवटचे वर्षी इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन साठी संपूर्ण वर्षाचे वेतनाची माहिती सुद्धा पाहता येणार आहे सोबतच ती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड सुद्धा करता येणार आहे व त्याची प्रिंट देखील काढता येणार आहे.
जिल्हा परिषद बुलढाणा कार्यालयाकडून एखादा आदेश व सूचना दिलेली असल्यास ती नोटिफिकेशन मध्ये दिसणार आहे व आदेशाची कॉपी डाऊनलोड सुद्धा करता येणार आहे.

वरील प्रमाणे आपण बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असाल तर आपल्याला आपले वेतन प्रमाणपत्र आपल्या मोबाईल वरून मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे केव्हाही कुठेही पाहता येणार आहे.


मार्गदर्शन पर संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.