दिनांक 14 ऑगस्ट 2022 हा दिवस "विभाजन विभिषिका स्मृती दिवस" म्हणून घोषित करणे बाबत शासन परिपत्रक

 दिनांक 14 ऑगस्ट 2022 हा दिवस "विभाजन विभिषिका स्मृती दिवस" म्हणून घोषित करणे बाबत शासन परिपत्रक.


सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ हा दिवस विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून घोषित करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


केंद्र शासनाकडील संस्कृती मंत्रालय या विभागामार्फत दिनांक पाच ऑगस्ट 2022 रोजी अर्ध शासकीय पत्रांमुळे कळविण्यात आले आहे की दिनांक 14 ऑगस्ट 2022 हा दिवस फाळणी स्मृतिदिन म्हणून पाळण्यात यावा याविषयीची घोषणा माननीय पंतप्रधान यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी च्या लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात केली होती.

फक्त दिवस दिनांक 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या फाळणी दरम्यान हजारो लोकांना ज्या यातना झाल्या मनस्ताप आणि दुःख भोगावे लागले याची कल्पना यावी या दृष्टीने घोषित करण्यात आला आहे.

फाळणी बाधित लोकांच्या दुःखद घटना अनुभव इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट यांनी एकत्रितरीत्या इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये डिजिटल फॉरमॅटमध्ये तयार केली असून सदर माहिती पुढील वेबसाईटवर उपलब्ध आहे.

http://amritmahotsav.nic.in/partition-horror-remembarance-day.htm


सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात येते की सदरचा स्मृतिदिवस विभागीय स्तरावर जिल्हा स्तरावर साजरा करण्याचे प्रस्तावित आहे परिच्छेद तीन मध्ये नमूद माहितीचा उपयोग करून फाळणी स्मृतिदिनावर आधारित प्रदर्शन महत्त्वाच्या अशा ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक सदर प्रदर्शन पाहू शकतील अशा ठिकाणी लावण्यात यावे. सदर प्रदर्शन हे गांभीर्यपूर्वक व संयमाने प्रदर्शित करावे विशेषतः समाजातील कोणत्याही एखाद्या घटकाच्या गटाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची विशेषत्वाने काळजी घ्यावी. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात दिनांक 14 ऑगस्ट 1947 रोजीच्या घडामोडींबाबत वर्तमानपत्रातील कात्रणे नियतकालिके उपलब्ध करून घेऊन तसेच दिनांक 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या घडामोडी व ज्या लोकांचे त्या दिवशी बलिदान झाले आहे त्या व्यक्तीविषयी अथवा समूहा विषयी माहिती प्रदर्शित करून त्याचे प्रदर्शन भरण्यात यावे.

मुक्त प्रदर्शनाच्या कार्यक्रमाकरिता आदर्श कार्यप्रणाली स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर निश्चित केली असून त्याची इंग्रजी भाषेतील सूची व परिपत्रक सोबत जोडण्यात आलेले आहे. त्याची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे.


प्रदर्शनाकरिता महत्त्वाच्या सूचना:-

सदर प्रदर्शन महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी उदाहरणार्थ बँक, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, शॉपिंग मॉल, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, पेट्रोल पंप, स्किल डेव्हलपमेंट सेंटर, वेकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इत्यादी ठिकाणी भरवण्यात यावे.

जास्तीत जास्त प्रसिद्धी दर्शनीयता आणि प्रवर्धन याकरिता अधिकाधिक प्रयत्न करावेत.

प्रदर्शन डिजिटल मीडिया याद्वारे देखील शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये करता येऊ शकेल.

कार्यक्रमांमध्ये स्वातंत्र्य सैनिक महत्त्वाची वरिष्ठ नागरिक जनप्रतिनिधी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याबाबत विनंती करावी.

उद्घाटनाच्या वेळी राष्ट्रभक्तीपर गीते लावावी प्रसार माध्यमांना कळविण्यात यावे हळदीमध्ये बाधित झालेल्या व्यक्तींना प्रदर्शनात बोलवण्यात यावे कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात यावा प्रदर्शनाच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार सुरक्षा व्यवस्था करावी.

सदर प्रदर्शन गांभीर्य व संयमाने आयोजित करावयाचे आहे अन्य कोणत्याही समुदायाच्या समाज घटकाच्या अन्य कोणत्याही समुदायाच्या भावनांना न दुखवता फाळणीची शोकांतिका आणि जनसामान्याचे दुःख प्रकट करण्याच्या दृष्टीने हे परिपत्रक आहे ही बाब लक्षात घ्यावी तसेच सदरचा कार्यक्रम संपूर्ण राज्यात पाळणे आवश्यक आहे.

वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे व हे प्रदर्शन यशस्वीरित्या राबवावे.

अशा सूचना ग्रामविकास विभागाने सदर शासन परिपत्रकानुसार दिले आहे.





वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.