सन 2022 मधील पद भरतीसाठी जिल्हा निवड समिती सुधारित करणेबाबत व कालबद्ध पदभरती कार्यक्रम राबवणे बाबत - शासन निर्णय

 सन 2022 मधील पद भरतीसाठी जिल्हा/ प्रादेशिक/ राज्य निवड समिती सुधारित करणेबाबत व कालबद्ध पदभरती कार्यक्रम राबवणे बाबत - शासन निर्णय. 


पदभरती संदर्भात या अगोदरचे शासनादेश अधिक्रमित करण्यात येऊन एकत्रित मार्गदर्शक सूचना दिनांक 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयात देण्यात आले आहेत त्या पुढील प्रमाणे. 

यावर्षीपासून पद भरतीसाठी स्तरीय समिती स्थापन केली जाणार. 

जिल्हा निवड समिती. 

प्रादेशिक निवड समिती. 

राज्य निवड समिती. 

संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष असतील तर प्रादेशिक निवड समितीचे प्रादेशिक विभाग प्रमुख हे प्रादेशिक निवड समितीचे अध्यक्ष प्रति राज्य निवड समिती चे अध्यक्ष हे संबंधित विभागाचे विभाग प्रमुख  असतील. 

तीनही समित्यांना  त्यांच्या अंतर्गत पदे सरळ सेवेने भरण्यासाठी अधिकार असतील. 

राज्य लोकसेवा आयोगाच्या अधिकार कक्षेत नसलेली गट ब अराजपत्रित, गट क आणि ड संवर्गातील पुढील वर्षीच्या 31 ऑगस्टपर्यंत संभाव्य रिक्त पदे भरण्याचा अधिकार राहील.

निवड समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व पदांची जाहिरात एकाच वेळी प्रसिद्ध करणे आवश्यक राहील व सर्व पदांसाठी एकाच वेळी पदभरती कार्यक्रम राबवला जाईल. 

पद भरतीसाठी निश्चित कालमर्यादा शासन निर्णयानुसार ठरवून देण्यात आली आहे. 

जिल्हा परिषद मधील पदे ही ग्राम विकास विभाग एकत्रित येत्या कालबद्ध कार्यक्रम राबवून भरणार आहे. 

रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करताना उमेदवाराने अर्ज कसा करावा परीक्षेचे स्वरूप परीक्षेचा अभ्यासक्रम इत्यादी सूचना जाहिरातीत नमूद करण्यात येतील. 

पदभरती करताना ची स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. 

पदभरती निवड प्रक्रियेसाठी कंत्राट कंपनीकडे देण्यात येईल. कंपनीशी सामंजस्य करार करण्यात येईल. 

परीक्षेत एकूण शंभर प्रश्न व त्यांना 200 गुण असतील म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला दोन गुण ठेवण्यात येतील. 

अधिक माहितीसाठी पुढली शासन निर्णय डाऊनलोड करा व वाचा. 


वडील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download



दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏



 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.