जिल्हयातील शैक्षणिक संस्थांकरीता घरगुती गॅसचा आढावा व वितरणाबाबत महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक 2026 रोजी जिल्हाधिकारी सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
प्रति,
जिल्हाधिकारी सर्व,
विषयः जिल्हयातील शैक्षणिक संस्थांकरीता घरगुती गॅसचा आढावा व वितरणाबाबत...
संदर्भ: १) केंद्र शासन आदेश क्र. १३०१७ (११)/१/२०२६-LPG-PNG, दि. ०९.०३.२०२६ रोजीचे आदेश
२) केंद्र शासनाची दि. ०९.०३.२०२६ रोजीची अधिसूचना.
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, केंद्र शासनाने शैक्षणिक संस्थाकरीता १०० टक्के गॅस सिलेंडर उपलब्ध करुन देण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.
आपल्या जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, वसतीगृहे, शासकीय खानावळ, मध्यान्ह भोजन योजना, अंगणवाडी, शैक्षणिक संस्थांतर्गत चालविल्या जाणाऱ्या खानावळी इत्यादींना एलपीजी गॅस सिलेंडरच्या १००% वाटपाबाबतची कार्यवाही करावी. आणि त्याबाबतचा अहवाल शासनास दररोज सादर करण्यात यावा.
(अशोक आत्राम)
सह सचिव, महाराष्ट्र शासन
प्रतः
१. अमुस (अनापुवग्रासं) यांचे स्वीय सहायक
२. मा. मंत्री (अनापुवग्रासं) यांचे खाजगी सचिव
३. मा. राज्यमंत्री (अनापुवग्रासं) यांचे खाजगी सचिव
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.



0 Comments