शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना मिळणार दोन गणवेश - शासन स्तरावरून अनुदान वितरित.

 शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना मिळणार दोन गणवेश - शासन स्तरावरून अनुदान वितरित. 


चालू होणाऱ्या सन 2022-23 सत्रात महाराष्ट्र शासनाच्या गणवेश योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच दोन गणवेश मिळणार यासाठी सर्व तयारी शिक्षण विभागाने केली आहे अशी माहिती ती महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून दिली आहे. 

विद्यार्थ्यांना या वर्षी मिळणार पहिल्याच दिवशी कोरी करकरीत नवी पुस्तके.

विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच दोन गणवेश मिळावीत यासाठी राज्य शासनाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व जिल्ह्यांसाठी रू. २१५ कोटी ५३ लाखांचा निधी वितरीत केला आहे.


हा निधी तालुकास्तरावरून संबंधित शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या खात्यात त्वरित पाठविला जावा,असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा दर्जा चांगला असावा, अशा सूचनाही शासनस्तरावरून देण्यात आल्या आहेत.  

समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व मुली व सर्व मागासवर्गीय मुलांना दर वर्षी दोन गणवेश मोफत दिले जातात. या योजनेचा लाभ राज्यातील ३५,९२,९२१ विद्यार्थ्यांना होणार आहे.

विद्यार्थ्यांचे गणवेश खरेदी करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला विद्यार्थी गणवेश डीबीटी मधून वगळले

याशिवाय राज्यातील ६५,६२० शासकीय शाळांना पायाभूत गरजा भागविण्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या संयुक्त शाळा अनुदानापोटी रु. ८९.५९ कोटी देखील जिल्हा प्रशासनाला वर्ग केले आहेत. उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांनी आनंदाने व तयारीनिशी शाळेत यावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. वरील ट्विट माननीय शिक्षणमंत्री यांच्या ट्विटर अकाउंट वर पाहण्यासाठी येथे क्लिक करा


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.