यावर्षी शिक्षक नवीन पद भरती होण्याचे संकेत - शिक्षण संचालक प्राथमिक यांचे पत्र.

यावर्षी शिक्षक नवीन पद भरती होण्याचे संकेत 
- शिक्षण संचालक प्राथमिक यांचे पत्र. 

सन 2021-22 संच मान्यतेनुसार मागविला रिक्त पदांचा अहवाल. 

महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयातील दिनांक 31 मार्च 2022 च्या पत्रानुसार शिक्षक संवर्गातील माहे डिसेंबर 2021 अखेरच्या रिक्त पदांची माहिती सादर करणेबाबत विभागीय उपसंचालक, शिक्षण निरिक्षक मुंबई,  शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी अथवा प्रशासनाधिकारी महानगरपालिका सर्व, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका या सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना उद्देशून सदर पत्र निर्गमित करण्यात आले आहे. 
सर्व विभागाचे विभागीय उपसंचालक त्यांच्या वर्गातील सर्व नगरपालिका, नगरपरिषद कँटोन्मेंट बोर्ड येथील शाळांतील व्यवस्थापन व माध्यम निहाय रिक्त पदांची माहिती देतील. 
संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद खाजगी अनुदानित खाजगी अंशतः अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळेतील व्यवस्थापन व माध्यम निहाय रिक्त पदांची माहिती संचालकांना देतील. 
तर सर्व जिल्ह्यांमधील शिक्षणाधिकारी माध्यमिक हे जिल्ह्यातील खाजगी अनुदानित, खाजगी अंशतः अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळां मधील व्यवस्थापन व माध्यम निहाय रिक्त पदांची माहिती देतील. 
शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर, पश्चिम आणि दक्षिण हे त्यांच्या क्षेत्रातील खाजगी अनुदानित, खाजगी अंशतः अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांची माहिती देतील. 
शिक्षणाधिकारी किंवा प्रशासन अधिकारी महानगरपालिका हे संबंधित महानगरपालिकेमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची व्यवस्थापन व माध्यम निहाय रिक्त पदांची माहिती संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना उपलब्ध करून देतील. 
शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका हे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील व्यवस्थापन व माध्यम निहाय रिक्त पदांची माहिती संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना उपलब्ध करून देतील. 
वरील प्रमाणे शिक्षण संचालक प्राथमिक यांनी संबंधित विभागासाठी संबंधित जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करून त्यांच्याकडून राज्यातील सर्व शाळांमधील माध्यम व व्यवस्थापन निहाय शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती 2021 22 संच मान्यतेनुसार मागितली आहे. 

वरील संपूर्ण पत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा


वरील माहिती शिक्षण संचालक यांना प्राप्त झाल्यानंतर राज्यात नेमक्या किती शिक्षकांच्या जागा रिक्त आहे ही प्राथमिक शिक्षण संचालक म्हणजेच महाराष्ट्र शासनाला समजेल व त्यानुसार पुढील शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाईल अशी अपेक्षा आहे. 
शिक्षक भरती प्रक्रिया घोटाळ्याचा पार्श्वभूमीवर यापुढील शिक्षक भरती प्रक्रिया नेमकी कशी होते? 
खाजगी शाळांना शिक्षक भरती करण्याची परवानगी शासन देईल का? 
सर्व जिल्हा परिषद अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शाळांना आवश्यक शिक्षक मिळतील का? 
या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य शासन त्यावर काय निर्णय घेते हे जाणून घेण्यासाठी आपण सर्वच उत्सुक आहोत. 

लवकरात लवकर संपूर्ण राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जावी अशी अपेक्षा डी एड बी एड पूर्ण झालेले भावी शिक्षक मात्र खूप वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रिया व्हावी याची वाट पाहत आहे. 

दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.