शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी शाळांच्या वार्षिक तपासणी बाबत पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
स्मरणपत्र-१
क्र. शिसंमा-२६/ शाळा तपासणी/एस-१/1832134
दि. 07 APR 2026
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग सर्व.
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जि. प. सर्व
३) शिक्षण निरीक्षक (उ/द/प), मुंबई
विषय- शाळांची वार्षिक तपासणी
संदर्भ :-
१) दि. २२/०८/२०२५ च्या ऑनलाईन बैठकीमध्ये दिलेल्या सुचना
२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा-२५/शाळा तपासणी/एस-१/१७०८०९२, दि.०५/०२/२०२६
वरील विषयाच्या अनुषंगाने आपल्या विभागातील शाळांची १०० टक्के वार्षिक तपासणी पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही. आपल्या अधिनिस्थ सर्व शाळेची वार्षिक तपासणी पूर्ण करून वार्षिक तपासणीचा अहवाल दि.३१/०३/२०२६ पर्यंत संचालनालयास सादर करण्याबाबत संदर्भ क्र.२ अन्वये कळविण्यात आले होते.
अद्यापही आपल्या विभागातील शाळांची १०० टक्के वार्षिक तपासणीचा अहवाल संचालनालयास अप्राप्त असल्याचे दिसून येते. शाळा तपासणी अंती आढळलेल्या चांगल्या बाबी बाबत स्वतंत्र अहवाल सादर करावा. तसेच शाळा तपासणी अंती निदर्शनास आलेल्या भौतिक व गुणवत्ता विषयक उणीवाच्या अनुषंगाने उपाययोजना बाबत स्वतंत्र अहवाल देखील सादर करावा.
तरी पुनःश्च आपणास कळविण्यात येते की, आपल्या विभागातील शाळांची १०० टक्के वार्षिक तपासणीचा अहवाल सोबत दिलेल्या विवरण पत्रामध्ये तात्काळ संचालनालयास सादर करण्यात यावा.
Digitally signed by
PALKAR MAHESH MADHUKAR Date: 07:04,2026, 16:12:27 (डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत :- मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे यांना माहितीस्तव सादर.
शाळा वार्षिक तपासणी अहवाल.
कोरा फॉर्म (पीडीएफ/PDF)
शाळांना दरवर्षी शाळा वार्षिक तपासणीला सामोरे जावे लागते ही शाळा तपासणी कोणत्या मुद्द्यांच्या आधारे होते हे समजून घेण्यासाठी कोरा शाळा तपासणी अहवाल पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत.
सदर शाळा वार्षिक तपासणी अहवाल पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
वरील पीडीएफ स्वरूपातील शाळा वार्षिक तपासणी अहवाल डाउनलोड करून त्याची प्रिंट आउट आपण घेऊ शकतात किंवा आपल्याकडे सेव्ह करून ठेवू शकता तो दरवर्षी आपल्याला उपयोगी पडेल.
शाळा वार्षिक तपासणी अहवाल 2021-22
शाळा वार्षिक तपासणी अहवाल 2022-23
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏



0 Comments