स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद) शाळांशी संबंधित माहिती सादर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक आठ एप्रिल 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
क्रमांक :- संकीर्ण-२०२६/प्र.क्र.७४/एसडी-१
दिनांक : ०८ एप्रिल, २०२६
प्रति,
आयुक्त (शिक्षण),
शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद) शाळांशी संबंधित
माहिती सादर करण्याबाबत. संदर्भ :- १) शासनाचे समक्रमांकाचे पत्र, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२६
२) शासनाचे समक्रमांकाचे पत्र, दिनांक २३ मार्च, २०२६
महोदय,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्र. १ येथील पत्रान्वये दिनांक ०४ मार्च, २०२६ रोजीपर्यंत तसेच संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये दिनांक २४ मार्च, २०२६ रोजी दुपारी ०४.०० वा. पर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद) शाळांशी संबंधित खालील दोन मुद्यांची माहिती शासनास सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
१) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद) किती शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गामध्ये बसण्यासाठी बॅचेस उपलब्ध नाहीत, अशा शाळांचा जिल्हानिहाय तपशील (UDISE आय.डी. सह) व एकूण संख्या. तसेच अशा शाळांच्या वर्गामध्ये बॅचेस उपलब्ध करुन द्यावयाचे झाल्यास त्यांची अंदाजित संख्या.
२) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद) किती शाळांकडे पाच एकरपेक्षा अधिक जागा आहे अशा शाळांचा जिल्हानिहाय तपशील (UDISE आय.डी. सह).
२. वरील दोन्ही मुद्यांची माहिती अद्यापपर्यंत प्राप्त झालेली नाही. प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने मा. मंत्री (शालेय शिक्षण) हे पुढील आठवड्यामध्ये बैठक घेण्याची शक्यता आहे. सबब, उपरोक्त माहिती कोणत्याही
परिस्थितीमध्ये शुक्रवार, दिनांक १० एप्रिल, २०२६ रोजी दुपारी ०२.०० वा. पर्यंत शासनास उपलब्ध करून देण्यात यावी, ही विनंती.
आपला.
ANIRUDDHA AVINASH KULKARNI
(अ.अ. कुलकर्णी)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत :-
१) मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई यांना माहितीस्तव अग्रेषित.
२) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आवश्यक त्या तातडीच्या कार्यवाहीसाठी
अग्रेषित.
३) निवडनस्ती (एस. डी. १)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परीषद) शाळांशी संबंधित माहिती सादर करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 23 मार्च 2026 रोजी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय
डॉ अॅनी बेंझट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे-४११००१
दूरध्वनी क्र. (०२०) २६१२५६९२
ई-मेल-depmah2@gmail.com
जा.क्र.प्राशिसं/टे-३०१/२०२६
दिनांक- २३/३/२०२६
प्रति,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व
विषयः- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परीषद) शाळांशी संबंधित माहिती सादर करणेबाबत
संदर्भ-शासनचे पत्र क्र संकीर्ण-२०२६/प्र.क्र.७४/एसडी-१/दि.२६/२/२०२६
उपरोक्त विषयाबाबत शासनाचे संदर्भीय पत्रान्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद) शाळांशी संबंधित मुद्द्यांबाबत तात्काळ माहिती सादर करणेबाबतचे निर्देश संचालनालयास प्राप्त झालेले आहेत. शासनपत्रात नमूद मुद्द्यांच्या अनुषंगाने खालील तक्त्यात नमूद माहिती दि.२५/३/२०२६ पर्यंत संचालनालयास सादर करावी.
अ.क्र.
जिल्हा
तालुका
शाळेचे नाव
युडायस क्र.
विदयार्थी संख्या
उपलब्ध बेंचेस संख्या
आवश्यक बॅचेस संख्या
शाळा निहाय माहिती घेऊन संचालनालयास माहिती सादर करताना तालुकानिहाय जिल्हयांचा गोषवारा सादर करावा.
२. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद) शाळांच्या पाच एकर पेक्षा अधिक जागा असणा-या शाळांचे नाव व युडायस क्रमांक यांची माहिती सादर करावी.
Digitally signed by SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 23-03-2026 17:15:55
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य पुणे-१
प्रत माहितीस्तव सविनय सादर
मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.



0 Comments