IGOT Karmayogi साधना सप्ताह ४ कोर्स पूर्ण करण्या साठी मुदतवाढ!
महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणायुक्तांनी दिनांक 30 एप्रिल 2018 26 रोजी दिनांक दोन ते आठ एप्रिल 2026 या कालावधीत साधना सप्ताह राबविण्याबाबत पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
क्रमांक : आशिका २०२६ / साधना सप्ताह I GOT/ आस्था-अ१०७
प्रति,
१. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
२. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे
३. अध्यक्ष, म.रा. माध्य व उच्च माध्य शिक्षण मंडळ पुणे (राज्य)
४. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) म.रा.पुणे
५. शिक्षण संचालक (प्राथमिक) म.रा.पुणे
६. संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) म.रा.पुणे
७. संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे
८. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
विषयः- दि. २ ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत साधना सप्ताह राबविण्याबाबत
संदर्भ :- शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.५/प्राशि-५ दि.२५.०३.२०२६
उपरोक्त संदर्भाधीन शासन पत्र व सहपत्र यांचे अवलोकन व्हावे (प्रत संलग्न)
विषयांकित प्रकरणी भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि कर्मयोगी भारत' यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मा. अपर मुख्य सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २७.०३.२०२६ रोजी झालेल्या VC द्वारे प्राप्त निर्देशान्वये दि.२ एप्रिल ते दि.८ एप्रिल. २०२६ या कालावधीत साधना सप्ताह' आयोजित करण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. (पत्रांची प्रत सोबत जोडली आहे). त्यास अनुसरुन राज्यामध्ये प्रस्तुत कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या (IGOT पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे) कार्यालय प्रमुखांना मे, २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या "TECH-वारी २.०" या कार्यक्रमावेळी प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
साधना सप्ताहाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी
अ) सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी IGOT कर्मयोगी पोर्टलवरील सोबत जोडलेल्या यादीतील कोर्सेस पूर्ण करावेत. पूर्ण केलेल्या कोर्सेसचा एकूण कालावधी किमान ४ तास असावा.
ब) सदर कोर्सेस दि.२ एप्रिल ते दि.८ एप्रिल. २०२६ या कालावधीत पुर्ण करावेत.
क) आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांना साधना सप्ताह अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याकरीता सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सक्रियरित्या सहभागी व्हावे.
Digitally signed by
SACHINDRA PRATAP SINGH Date: 30-03-2026 22:00:13
(सचिन्द्र प्रताप सिंह, भा.प्र.से.)
आयुक्त, (शिक्षण)
साधना सप्ताहात करावयाच्या कोर्सेसची यादी लिंकसह पीडीएफ डाउनलोड
विभाग निहाय कोणते ४ कोर्स पूर्ण करावे?
IGOT KARMAYOGI ONLINE TRAINNING courses
विभागाचे नाव
कोर्स चे नाव
सामान्य प्रशासन विभाग
01) INTRODUCTION OF E-OFFICE 02) Artificial intelligence (AI) 03) CODE OF CONDUCT FOR GOVT.EMPLOYEES 04) STRESS MANAGEMENT 05) OFFICE PROCEDURES 06) RECORD MANAGEMENT
पंचायत विभाग
01) आपती व्यवस्थापन आणि तयारी 2) sansad adrash graam yojana 3) खरेदीदारासाठी GEM ची ओळख 4) RTI AND GOOD GOVERNANCE 5)COMMUNICATION SKILLS
शिक्षण (प्रा.) विभाग
1)FUNDAMENTAL OF PHYSICAL EDUCATION 2) समावेशी शिक्षा 03) शिक्षण की चार चरणीय विधी 4) WOMEN SELF DEFENCE TECHNIC COURSE
पशुसंवर्धन विभाग
01) पशुपालन अवसंरचना विकास निधी.02) रेबीज मॅनेजमेंट 03) राष्ट्रीय पशुधन मिशन 2021 04)Human-animal interface management. 05) Wound management
आरोग्य विभाग
1). Yoga break at workplace 2) meditation principle and practices 3) self leadership 4) critical thinking 5) stress management
ल.पा./ पा.पु. विभाग
1). Code of conduct MCSR 2).Atal Bhujal Yojana 3) Department of Drinking water and sanitation - know your department 4) Rainwater harvesting 5)Right to information act
समाज कल्याण विभाग
1)Scheme for welfare of Safai karmchari 2) schemes for welfare of transgender persons 3) scheme for welfare of senior citizens 4) scheme for welfare of SCs 5) ministry of social justice and empowerment
महिला व बाल कल्याण विभाग
1)Prevention of sexual harassment at workplace 2) maternal infant and young child nutrition 3) essential nutrition for pregnant women 4) tackling violence against women and girls
वित्त विभाग
1). Accounting procedure of advance accounting process 2. Analysis of financial statements 3. Auditing standards and procedures 4. Bank Reconciliation Statement 5. Cash flow statement 6. Accounting Software
पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन
1) SUSTAINABLE SANITATION AND WATER MANAGEMENT 2) INTRODUCTION OF WATERSHED MANAGEMENT 3) स्वच्छता हि सेवा-२०२४ 4) Department of Swachh Bharat Mission department 05) Right to information act
कृषी विभाग
1)Farming systems approach 2) integrated pest management 3) crop residue management 4) work ethics
बांधकाम विभाग
01) Orientation module on mission life 02)Smart social media practices for public servants 03) Rajbhasha Hindi 04) Procurement
दि.२ ते ८ एप्रिल, २०२६ या कालावधीत 'साधना सप्ताह' राबविण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने
क्रमांक : संकीर्ण-२०२६/प्र.क्र.०५/प्रशि-५
दिनांक : २५ मार्च, २०२६.
प्रति,
१. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मुंबई-४०००३२.
२. सर्व विभागीय आयुक्त
विषयः दि.२ ते ८ एप्रिल, २०२६ या कालावधीत 'साधना सप्ताह' राबविण्याबाबत.
महोदय/महोदया,
भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि 'कर्मयोगी भारत' यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२ एप्रिल ते दि.८ एप्रिल, २०२६ या कालावधीत 'साधना सप्ताह' आयोजित करण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. (पत्रांची प्रत सोबत जोडली आहे). त्यास अनुसरुन राज्यामध्ये प्रस्तुत कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या (GOT पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे) खालील कार्यालय प्रमुखांना मे, २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या "TECH-वारी २.०" या कार्यक्रमावेळी प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे:-
अ) मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव (खुद्द विभाग अधिनस्त सर्व क्षेत्रिय कार्यालये)
ब) विभागीय आयुक्त (विभागीय आयुक्त कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालये विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हापरिषदा)
०२. साधना सप्ताहाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी:-
अ) सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी IGOT कर्मयोगी पोर्टलवरील सोबत जोडलेल्या यादीतील कोर्सेस करावेत. पुर्ण केलेल्या कोर्सेसचा एकूण कालावधी किमान ४ तास असावा. (GOT पोर्टलवरील आकडेवारीनुसार)
ब) सदर कोर्सेस दि.२ एप्रिल ते दि.८ एप्रिल, २०२६ या कालावधीत पुर्ण करावेत.
क) आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांना साधना सप्ताह अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याकरीता सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात.
राज्यात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सक्रियरित्या सहभागी व्हावे, ही विनंती.
आपली,
व्ही. राधा
अपर मुख्य सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन
सहपत्र :- वरीलप्रमाणे
प्रत :-
१. सर्व जिल्हाधिकारी
२. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी
३. सर्व IGOT MDO Leader
संपूर्ण परिपत्रक PDF डाउनलोड करण्यासाठी
साधना सप्ताहात करावयाच्या कोर्सेसची यादी लिंकसह पीडीएफ डाउनलोड
शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालयातून दिनांक 17 MAR 2026 रोजी निर्गमित आदेशानुसार शासकीय शाळांतील शिक्षकांना शाळा सुरक्षितता या ऑनलाईन कोर्सला प्रवेशित करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व.
विषय : शासकीय शाळांतील शिक्षकांना शाळा सुरक्षितता या ऑनलाईन कोर्सला प्रवेशित करण्याबाबत..
संदर्भ : नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांचे दिनांक १६ जून, २०२५ रोजीचे पत्र.
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांचे दिनांक १६ जून, २०२५ नुसार शासकीय शाळांतील शिक्षकांना शाळा सुरक्षितता या ऑनलाईन कोर्सला प्रवेशित करण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये संचालनालयास कळविण्यात आले आहे. (संदर्भिय पत्राची प्रत सोबत जोडली आहे).
संदर्भाधीन पत्रान्वये दिनांक १६ जून, २०२५ नुसार IGOT कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर शिक्षकांसाठी शाळा सुरक्षितता या विषयावर ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहे. शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व उपयुक्त असणाऱ्या या कोर्स ची माहिती शिक्षकांपर्यंत पोहचवण्यात यावी.
(डॉ. सुचिता पाटेकर)
शिक्षण उपसंचालक
माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालनालय महा. राज्य पुणे.
प्रत : माहितीस्तव.
१. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.
२. National Institute of Disaster Management, Ministry of Home Affairs, Gov.of India. Mobile No: 09989528699, naziz.ccdrr@gmail.com.
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.





0 Comments