संच मान्यता 2021-22 बाबत शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक यांचे महत्त्वाचे परिपत्रक

 संच मान्यता 2021-22 बाबत

 शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक यांचे

 महत्त्वाचे परिपत्रक. 


संच मान्यता 2021 22 संदर्भात उपसचिव शालेय शिक्षण विभाग यांचा आदेश


प्राथमिक शिक्षण संचालनालय या कार्यालयातुन दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी शिक्षण संचालक माध्यमिक व शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या सहीने निर्गमित झालेल्या परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष सन 2021 22 ऊस ची संच मान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करणेबाबत शासन निर्देश आहेत त्यानुसार दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजीच्या आधार क्रमांक नोंदणी असलेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारित तात्पुरती संच मान्यता देण्यात आलेली होती तसेच या कार्यालयाने या अगोदर निर्गमित केलेल्या पत्रानुसार समितीमार्फत पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्या अनुषंगाने समितीमार्फत करण्यात आलेल्या पडताळणीचा अहवाल सरल पोर्टल वर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

संच मान्यता सत्तेसाठी आधार नोंदणी आवश्‍यक का?

पडताळणी समिती मार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने सोबतच्या प्रपत्र मधील माहिती बैठकीपूर्वी ती मेल द्वारे सादर करावी असे संचालकांनी निर्देश दिले आहे. 

आधार क्रमांक नोंद नसल्यास पडताळणी समिती बाबत परिपत्रक

पडताळणी अहवाल सरल पोर्टल वर भरणे बाबत देण्यात आलेल्या सुविधेबाबत माहिती देण्याकरिता दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी दुपारी तीन वाजता झूम मीटिंग आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीसाठी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई व प्रशासन अधिकारी मनपा नफा व न प सर्व यांनी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पडताळणी केलेल्या शाळांच्या अहवालासह स्वतः संबंधित तांत्रिक कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहण्याबाबत देखील शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक यांनी निर्देश दिले आहेत. 


याचा अर्थ लवकरच 2021-22 ची संच मान्यता अंतिम होण्याच्या मार्गावर आहे. 


वरील परिपत्रक पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


या अगोदर प्राप्त उपसचिव शालेय शिक्षण विभाग यांच्या आदेशानुसार 15 एप्रिल 2022 पर्यंत संच मान्यता होणे अपेक्षित होते व त्यानंतर 30 एप्रिल पर्यंत समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करणे देखील अपेक्षित होते. 

संच मान्यता वेळेवर न झाल्यामुळे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया देखील लांबणीवर पडते का? 

हे येणारा काळच ठरवेल. . 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.