संच मान्यता आधार कार्ड वरच का? शैक्षणिक संस्थांकडून डुप्लिकेट विद्यार्थी न्यायालयाच्या निकालानुसार वसुली... शिक्षण संचालक यांचे पत्र

 संच मान्यता आधार कार्ड वरच का? 

शैक्षणिक संस्थांकडून डुप्लिकेट विद्यार्थी न्यायालयाच्या निकालानुसार वसुली... 

शिक्षण संचालक यांचे पत्र.. 


सरल पोर्टल स्टूडेंट पोर्टल वर विद्यार्थ्यांची आधार कार्ड संलग्न  करून त्यानंतर ज्यांची आधार कार्ड सरल पोर्टल वरील माहिती जुळलेले असेच विद्यार्थी ग्राह्य का धरले जातात? 

ह्या प्रश्नांची उत्तरे आपणास पुढील शिक्षण संचालक यांचे पत्रामध्ये मिळतील.. 

महाराष्ट्र राज्य दिनांक 3 ते 5 ऑक्टोबर 2011 या कालावधीत शाळांमध्ये विशेष पटपडताळणी घेण्यात आली होती आणि या पटपडताळणी मध्ये ज्या शाळांमध्ये विद्यार्थी कमी उपस्थित आढळले अशा शाळांना दंड म्हणून जेवढे विद्यार्थी डुप्लिकेट असतील तेवढ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर शासनाने केलेला खर्च वसूल करण्यासाठी दिनांक 2/5 /2012 ला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. या शासन निर्णयानुसार शैक्षणिक संस्थांवर कार्यवाही करून त्यांच्याकडून डुप्लिकेट विद्यार्थ्यांवर अखर्चित रक्कम वसूल करण्याबाबत नमूद होते.

बिजमोहन मिश्रा यांनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात यासंदर्भात एक याचिका दाखल केली होती या जनहित याचिकेचा निकाल दिनांक 28 सप्टेंबर 2018 रोजी आला होता यानुसार देखील संबंधित शैक्षणिक संस्थांकडून डुप्लिकेट विद्यार्थ्यांवर खचित रक्कम वसूल करण्याचे निर्देश होते.

परंतु तसे न झाल्यामुळे ब्रिजमोहन मिश्रा यांनी परत न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आणि त्याचा निकाल देखील दिनांक 2 जुलै 2019 न्यायालयाने दिला सदर निकाल पुन्हा  ब्रिज मोहन मिश्रा यांच्याकडून लागला. 

महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी सदर रक्कम वसुलीबाबत तब्बल या अगोदर दहावेळा आदेश निर्गमित केले आहे तरीदेखील संपूर्ण रक्कम वसुली झाली नसल्यामुळे दिनांक 19 फेब्रुवारी 2022 पुन्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना शिक्षण संचालक प्राथमिक यांनी पत्र देऊन रोमन याचिकेवरील सुनावणी मध्ये न्यायालयाची निर्देशानुसार दोषी शाळांकडून वसूल पात्र रक्कम वसूल करून शासन खाती जमा करून दिनांक 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत वसुलीच्या चलाना सह अहवाल पाठविण्याची मुदत दिली होती.

न्यायालयाच्या म्हणण्यानुसार बोगस विद्यार्थी नोंदविल्या मुळे शिक्षकांच्या पदांमध्ये वाढ होऊन त्यांचे वेतन यावरील खर्चात वाढ झाली तसेच स्कॉलरशिप व ईबीसी सवलत यांची प्रतिपूर्ती केल्यामुळे खर्चात वाढ झाली. सदर वाढीव रक्कम संबंधित दोषी शाळांनी शासनाच्या खात्यावर चलन द्वारे भरणे अनिवार्य होते.

सदर परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी यावर्षीची संच संच मान्यता ही आधार संलग्नित विद्यार्थ्यांच्या संख्या वरच करण्यात येईल असे शासनाचे धोरण आहे हे आपणास लक्षात येते.


प्रस्तुत प्रकरणात जर विहित कालावधीत शिक्षणाधिकारी आणि सदर शैक्षणिक संस्थांकडून कार्यवाही न झाल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची ताकीद देखील वरील पत्रात देण्यात आलेली आहे. 

यावरून आपल्या लक्षात येते की सदर प्रकरण शासन आणि प्रशासन पातळीवर किती गांभीर्याने घेतले गेले आहे.

वरील संदर्भित पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर Download क्लिक करा

Download

यामुळे यावर्षी आपणास शाळेतील 100% विद्यार्थ्यांची आधार कार्ड सरल पोर्टल वर अचूक नोंदवणे किती गरजेचे आहे हे लक्षात येईल.. 

सरल पोर्टल वर आपल्या मोबाईलवरून आधार कसे संलग्नित करावे यासाठी.. 

येथे क्लिक करा


संच मान्यता आणि तिच्या तारखा व मुदत कोणती हे समजून घेण्यासाठी.. 

येथे क्लिक करा




अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.